पोस्ट्स

organic farming लेबलसह पोस्ट दाखवत आहे

हिरवळीची खते"जमिनीची सुपीकता तसेच पिक उत्पादन वाढविण्यासाठी सेंद्रिय उपाय...

इमेज
हिरवळीची खते"जमिनीची सुपीकता तसेच पिक उत्पादन वाढविण्यासाठी सेंद्रिय उपाय...  हिरवळीचे खते: सेंद्रिय पध्दतीने शेती करण्यात हिरवळीच्या खतांचे प्रयोग :- हिरवळीची खते सेंद्रिय पदार्थ तसेच पिकांच्या अन्नद्रव्यांचा जमिनीतील साठा वाढावा यासाठी हिरवे पिक जमिनीत गाडण्याची प्रक्रिया पार पाडली जाते. अशा प्रक्रियेतून तयार झालेल्या खतांना हिरवळीचे खत वा बिवड म्हणतात. पावसाळ्यातील पहिल्या पावसात हिरवळीच्या खताचे बी पेरले जाते, व तयार झालेले पिक जमिनीत गाडले जाते. बरयाचदा करंज, भेंड, अंजन व ग्लीरीसिदिया या वनस्पतीची पानेही जमिनीत गाडली जातात. हिरवळीचे खत तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी पिके/वनस्पती व त्यातील नत्राचे प्रमाण : पिकाचे नाव नत्राचे शेकडा प्रमाण ताग (भोरू) ०.४६ चवळी ०.४२ गवार ०.४९ सुर्यफुल ०.४५ हरभरा ०.५० सोयाबीन ०.७१ उडीद ०.४७ मटकी ०.३५ लसून घास ०.७३ करंज २.६१ अंजन १.४२ ऐन २.०४ भेंड २.९० गिरिपुष्प २.७४ हिरवळीचे खत तयार करताना घ्यावयाची काळजी : पिक लवकर भरपूर वाढणारे असावे. पिक रसरशीत व तंतूचे असावे ज्यायोग्य ते लवकर कुजते. पिक कोणत्याही जमिनीत वाढणारे व शक्यतो शेंगाकुल...

इको-पेस्ट ट्रॅप' सेंद्रीय शेतीतील चिकट सापळा, खर्च होईल कमी

इमेज
इको-पेस्ट ट्रॅप' सेंद्रीय शेतीतील चिकट सापळा, खर्च होईल कमी शेती करत असताना शेतीचा खर्च कमी करण्यासाठी शेतकरी अनेक प्रयत्न करत असतात. सेंद्रिय शेतीमध्ये पैशांची बचत होत असते. कारण त्यात आपण आपल्या जवळ उपलब्ध होणाऱ्या गोष्टींपासून शेती करत असतो. या शेती मधील एक सोपा आणि कमी खर्चातील पर्याय म्हणजे, इको पेस्ट ट्रॅप हे कीटकनाशक ऐवजी उपयोगी ठरते. तर यामध्ये आपण इको पेस्ट ट्रॅप, चिकट सापळाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. शेतकऱ्यांना त्यांचा उत्पादन खर्च कमी करणे व एकात्मिक किड नियोजन करून मानवी शरीराला हानिकारक रासायनिक कीडनाशकांचा कमी वापर करून दर्जेदार शेती उत्पादनासाठी इको-पेस्ट ट्रॅप' हा कमी खर्चात अत्यंत प्रभावी कीड व रोग नियंत्रणासाठी उपयुक्त असे तंत्रज्ञान आहे. इको-पेस्ट ट्रॅप' हा प्रकाश सापळा, चिकट सापळा आणि कामगंध सापळा याचे संयुक्तरित्या काम करते. पिवळ्या आणि निळा रंगाचा चिकट सापळा दिवसा शेतात उडणारे हानिकारक कीटक उदा. पांढरी माशी, तुडतुडे, फळ माशी, फुलकिडे, पंखाचा मावा, नागअळी ची माशी व इतर उडणारे बारीक कीटक त्याला आकर्षित होऊन चिटकतात. तसेच मीज माशी,खोड कि...

निंबोळी पावडर पिकांसाठी संजीवनी ! जाणून घ्या फायदे

निंबोळी पावडर पिकांसाठी संजीवनी ! जाणून घ्या फायदे सेंद्रिय, रेसिड्यूफ्री, नैसर्गिक, जैविक, एकात्मिक, रासायनिक अशा सर्व शेती प्रकारामध्ये वापरण्यात येणाऱ्या निंबोळी पावडर चे कार्य व अनेक फायदे असून ते वापरण्यास सुरक्षित आहे .सध्या रासायनिक निविष्ठांना सुयोग्य पर्याय म्हणून निंबोळी पावडर चा मोठ्या प्रमाणात शेतकरी वापर करत आहेत . पाहुयात निंबोळी पावडर चे कार्य व फायदे . निंबोळी पावडरचे फायदे — अॅझाडीरेक्टीन’ घटक असल्यामुळे मातीमधील हुमणी, खोडकीड, कटवर्म, वाळवी विषाणु, बुरशी या शत्रूकिटकां-रोगांचा ते नायनाट करते. — निंबोळी पावडर हे संपूर्ण नैसर्गिक स्वरुपामधील निंबोळी पावडर असल्याने जमिनीमधील कोणत्याही उपयुक्त जिवाणुंना हानी पोहचत नाही. –निंबोळी पावडर हे रासायनिक खतांमध्ये मिसळून वापरल्याने रासायनिक खतांमधील नत्र टिकून राहते. –निंबोळी पावडर पिकांचे सूक्ष्मकृमींच्या, सुत्रकृमींच्या प्रादुर्भावापासून 100% संरक्षण करते. –निंबोळी पावडर मर रोगाच्या प्रमाणामध्ये घट करते. — निंबोळी पावडरच्या वापरामुळे जमिनीमधील मातीचे कण एकमेकांना चिटकत नाहीत. यामुळे जमिनीमध्ये हवा खेळती राहते. — निंबोळी पावडर ज...

पॉलिसेल्फेटः शाश्वत शेतीसाठी महत्त्वाचे नैसर्गिक खत

इमेज
पॉलिसेल्फेटः शाश्वत शेतीसाठी महत्त्वाचे नैसर्गिक खत पॉलीसल्फेट हे आयसीएल(ICL) द्वारे युकेमध्ये बनविण्यात आलेले बहु-पोषक नैसर्गिक खत आहे. हे एक नैसर्गिक खनिज (डायहाइड्रेट पॉलिहालाईट) आहे. ज्यामध्ये चार प्रमुख पोषक घटक, पोटॅशिअम, सल्फर, कॅल्शिअम आण मॅग्नेशिअम आहेत हे एक नैसर्गिक क्रिस्टल असल्याने पाण्यात हळूहळू विरघळते आणि मातीत आपले पोषक तत्व हळू-हळू सोडत असते. पॉलीसल्फेटची ही विशेषता आहे की, पीक चक्राच्या दरम्यान पोषक उपलब्धता दीर्घकाळासाठी राहत असते. तर इतर पारंपारिक पोटॅश, आणि सल्फेट खतांमधील पोषक द्रव्ये पिकांच्या थोड्याच काळासाठी उपलब्ध असतात. पॉलीसल्फेट (पॉलीहॅलाइट) द्वारे तत्वाचं दीर्घ रिलीज पॅटर्न जास्त पाऊस झाल्यानंतरही गळतीमुळे होणारे पोषक तत्वांचे नुकसान खूप कमी करत असते. पॉलीसल्फेटचे हे वैशिष्टये हे आहे की, शेतीच्या सर्व परिस्थितीमध्ये हे सर्वात उपयुक्त खत बनवतं. MgO 5.5% CaO 16.5% पॉलीसल्फेट सर्व पिकांसाठी आहे उपयुक्त: शेतकऱ्यांसाठी हे कमी उत्पादन खर्चात अधिक सुविधाजनक आणि प्रभावी खत आहे. जे एकासह एकाच खतातून पिकांना चार वेगवेगळ्या आवश्यक पोषक घटक पुरवते. पॉलीसल...

हायड्रोपोनिक्स तंत्र नेमके काय आहे; करा पाण्याविना भाजीपाला शेती

इमेज
हायड्रोपोनिक्स तंत्र नेमके काय आहे; करा पाण्याविना भाजीपाला शेती सध्या कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. बऱ्याचशा कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. बर्‍याच जणांच्या पायावर बेरोजगारीची कुऱ्हाड पडली आहे. अशा चिंताग्रस्त आणि दडपण युक्त वातावरणामध्ये छोट्या छोट्या गोष्टी करून किंवा त्याबद्दलचे ज्ञान मिळवून चांगल्या प्रकारचे अर्थार्जन करता येऊ शकते. नेमके हायड्रोपोनिक्स संकल्पना व तंत्रज्ञान काय असते किंवा त्याचा उपयोग करून आपण आपल्या अर्थार्जन कशा पद्धतीने करू शकतो. हे अजूनही बऱ्याच जणांना माहिती नाहीये. तरी या लेखामध्ये आपण हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भाजीपाल्याचे उत्पादन कसे घेऊ शकतो तेही कुठल्याही मातीविना. वाचून आश्चर्य वाटलं ना. वाटणारच पण हे खरं आहे या लेखामध्ये या बद्दल आपण जाणून घेणार आहोत. काय आहे हायड्रोपोनिक्स तंत्र  हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती व्यवसाय करण्यासाठी आपल्याकडे अंगण किंवा घराचे छत म्हणजेच गच्ची असणे गरजेचे असते. गच्चीवर केलेल्या शेतीला टेरेस फार्मिंग असेही म्हणतात. स...