पोस्ट्स

शेतजमीन लेबलसह पोस्ट दाखवत आहे

सातबारा म्हणजे काय असते भाऊ ?

इमेज
सातबारा म्हणजे काय असते भाऊ ? सातबारा हा प्रत्येक शेतकरी बांधवाचा सर्वात ओळखीचा सरकारी कागद. मात्र आजही सातबारा विषयी काही बाबी शेतकरी बांधवांना माहीत नाही. चला तर आज जाणून घेऊ, सातबारा म्हणजे काय असते. 7/12 सातबारा उतारा म्हणजे काय असते ? °यावरून आपल्याला जमीनीची मालकी कुणाकडे आहे. हे समजते. °जमिनीवर कर्ज आहे का ? असेल तर किती आहे ? एकूण क्षेत्र, पिक पाहणी म्हणजे जमिनीवर किती क्षेत्रावर कोणते पिक लावले याची प्राथमिक माहिती समजते. °जलसिंचन साधन, कुळाचे हक्क, इतर हक्क, खाते नंबर, लागवड योग्य क्षेत्र इत्यादी सर्व बाबीची माहिती कळते. विशेष माहिती – °दर १० वर्षांनी ७/१२ नोंद नव्याने लिहिली जाते.  पिक पाहणी नोंद दरवर्षी करणे खूप गरजेचे आहे. कारण यामुळे योजना, अनुदान, विमा, शासकीय नुकसान भरपाई मिळण्यास मदत होते. कोणतीही फेरफार नोंद झाल्यास लगेच ती ७/१२ वर अपडेट करून घ्यावी. •सातबारा उतारा नेहमी काळजीपुर्वक वाचावा. त्यात काही चूक असल्यास लगेच आपल्या गावातील तलाठी कार्यालयात जाऊन चौकशी करावी. °सातबारा आणि आठ अ उताऱ्यावर महाराष्ट्र शासन आणि ई महाभुमी प्रकल्पाचा लोगो असणार आहे...

जमिनीची सुपिकता"

इमेज
शेतकरी मित्रानो       आपल्या शेतीजमिनीत कोणतेही पीक उत्तम यायचे असेल तर "जमिनीची सुपिकता" अत्यंत महत्वाची आहे.त्यासाठी अनेक घटक कारणीभूत ठरतात .     आपण शेतात चालताना शेतजमीन इतकी भुसभुशीत असली पाहिजे की त्या जमिनीवरून चालताना आपण गादीवरून चालत आहोत असा भास झाला पाहिजे, ती जमीन  सुपीक, अशा जमिनीत मोठ्या प्रमाणात सेंद्रिय कर्ब उपलब्ध असतो,जिवाणूंची संख्या एक मूठभर मातीत 10 कोटी पेक्षा जास्त असते , गांडूळ आणि 70 /80 प्रकारचे जिवाणू असतात. ज्या जमिनीचा सामू 6.5 आहे ज्या जमिनीचा EC  0.5 च्या आत आहे ज्या जमिनीची सेंद्रिय कर्बाची पातळी 0.8 च्या पुढे आहे ज्या जमिनित क्षारांची पातळी योग्य आहे असे खुप महत्वाचे घटक आहेत, कि ज्यावर आपल्या जमिनीची सुपीकता अवलंबून असते.आपण शेतीतून उत्पन्न घेतो, ज्याकाही पिकांचे आपण उत्पन्न घेतो त्यासाठी  वेगवेगळ्या प्रकारच्या 16 अन्न घटकांची आवश्यकता असते . पिकास आवश्यक असणारे " मूळ अन्न द्रव्ये - घटक " 16 आहेत. आपल्या सोयी साठी याचे 4 भाग पाडले आहेत .  (1) नैसर्गिक अन्न घटक = 3 ;  ...

खतांची गुणवत्ता ओळखण्याच्या टिप्स!रासायनिक खतांचा वापर करता,तरअशा पद्धतीने ओळखा खतांची गुणवत्ता

इमेज
खतांची गुणवत्ता ओळखण्याच्या टिप्स!रासायनिक खतांचा वापर करता,तरअशा पद्धतीने ओळखा खतांची गुणवत्ता पिकांच्या चांगल्या उत्पादनासाठी आणि जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी अनेकदा रासायनिक खतांचा वापर केला जातो. खरेतर सुपीक जमिनीमध्ये पुन्हापुन्हा पीक उत्पादन घेतल्यामुळे हळूहळू जमिनीची सुपीकता कमी होऊ लागते. म्हणून जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी वेळोवेळी माती परीक्षण केले पाहिजे.   आता अधिक उत्पादन देणाऱ्या जातींच्या वापरामुळे आणि आरोग्य माती व्यवस्थापनामुळे मातीची प्रजननक्षमता कमी होण्यास सुरूवात झाली आहे.  पिकास कोणत्या प्रकारचे खते आवश्यक आहेत. त्यांचे गुणधर्म काय आहेत आणि त्याची उत्पादनक्षमता कशी वाढवायची या विषयी संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे. पिकांना नत्राचा पुरवठा करण्यासाठी युरिया, स्फूरदचापुरवठा करण्यासाठी डीएपी, एस एस पी किंवा एन पी केआणि पालाशचा पुरवठा करण्यासाठी एम ओ पी किंवा एनपीकेचा वापर केला जातो.तसेच जस्त चा पुरवठा करण्यासाठी झिंक सल्फेटचा वापर केला जातो . आता आपण खतांची गुणवत्ता कशी तपासली जाते हे पाहू.  अशा पद्धतीने खतांचे गुणवत्ता तपासावी य...

शेतकऱ्यांनी केव्हां, काय, का लावावे? म्हणजे भरपूर फायदा होईल.

इमेज
शेतकऱ्यांनी केव्हां, काय, का लावावे? म्हणजे भरपूर फायदा होईल. दरवर्षी १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारी व जूनच्या पहिल्या आठवड्यात काकडी लावावी. म्हणजे जुलै, ऑगस्टमध्ये आणि ऐन थंडीत काकडीचे पैसे हमखास होतात.  महाशिवरात्रीस कांद्याचे रोप टाकून कांद्याची पात गुढी पाडव्यास लावावी. म्हणजे उन्हाळ्यात व आषाढी एकादशीपर्यंत पातीचे पैसे होतात.  १७ मार्च ते १९ मे किंवा हल्लीच्या बदलत्या पावसाच्या हवामानात मृग किंवा आर्द्रा कोरडे जाते, तेव्हा ७ जूनपर्यंत दर आठ दिवसांनी पाण्याची उपलब्धता असेल तर ५ ते १० गुंठ्याचे कोथिंबीरीचे प्लॉट करावेत. म्हणजे उन्हाळ्यात कोथिंबीरीचे पैसे होतात.  जून-जुलैमध्ये झेंडूचे बी टाकून रोप तयार करावे. म्हणजे हमखास झेंडूचे दसरा-दिवाळीत पैसे होतात. ऑगस्ट महिन्यामध्ये गेल्यावर्षी एप्रिल-मे महिन्यात केलेल्या आल्याच्या लागवडीस वर्षभर जैविक औषधे सेंद्रिय खत वापरून आले ले 'न लागलेले आले' गणपतीपासून काढण्यास सुरुवात करावी, म्हणजे आल्याचे पैसे हमखास होतात.  सप्टेंबरमध्ये हस्त बहार धरून लिंबाला भाव मिळून पैसे होतात.  द्राक्षाची एप्रिल, ऑक्ट...

नत्र / युरिया केव्हा द्यावे

इमेज
* _नत्र / युरिया केव्हा द्यावे_ * _◆नत्र युक्त खते हि पिकाच्या वाढीच्या काळात द्यावीत, पिक लागवडी पुर्वी देवु नयेत._ _◆नत्र युक्त खते वापरण्यापुर्वी जमिनीत सेंद्रिय पदार्थ जी पुर्णपणे कुजलेली असतिल केवळ तीच, योग्य प्रमाणात असावीत._ _◆ज्या जमिनीचा सामु जास्त आहे, मात्र जमिन भारी आहे, अशा जमिनीत युरिया किंवा अमोनियम सल्फेट कशाचा ही वापर हा फायदेशिर ठरतो._ _◆मात्र ज्या जमिनीचा सामु जास्त आहे, तसेच जमिन हलकी आहे अशा जमिनीत युरिया किंवा अमोनियम सल्फेटचा वापर हा जास्तीत जास्त वेळेस विभागुन असा करवा. हि खते सेंद्रिय पदार्थांसोबत एकत्र करुनच द्यावीत._ _◆ज्या जमिनीचा सामु जास्त आहे, अशा जमिनीत अमोनियम सल्फेटचा वापर हा सामु कमी करणे आणि व्होलाटायझेशन कमी करणे यासाठी देखिल फायदेशिर ठरतो कारण अमोनिमय सल्फेट हे कोणत्याही परिस्थितीत 10 ते 14 टक्के ईतकेच व्होलाटायझेशन होते तर युरिया चे व्होलाटायझेशन हे 20 ते 30 टक्के इतके असते._ _◆जर ह्युमिक अँसिडचा वापर होणार असेल तर त्यात युरिया विरघळवुन त्याचा वापर करावा. कारण ह्युमिक अँसिडची कॅटायन एक्सचेंज कॅपेसिटी ही फार जास्त असते ज्यामुळे व्होलाटा...

रब्बीच्या तोंडावर 'डीएपी' खताचा तुटवडा मग चिंता कशाला हे आहेत पर्याय

इमेज
रब्बीच्या तोंडावर 'डीएपी' खताचा तुटवडा मग चिंता कशाला हे आहेत पर्याय खरीपातील उत्पादन घटण्याचे दु:ख बाजूला सारुन बळीराजा पुन्हा रब्बी हंगामाच्या तयारीला लागला आहे. पुर्वमशागतीचे कामेही पूर्ण झाली आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या समस्या संपण्याचे नाव घेत नाहीत. (Rabi Season) रब्बीतील पिकांची जोमात वाढ होण्यासाठी बाजारात केवळ (DAP fertilizer shortage) डीएपी (डायमोनेम फॅास्फेट) 18:46 या खताचा तुटवडा भासू लागला आहे. हे काय यंदाचीच समस्या नाही. कोणताही हंगाम सुरु झाला की ज्या खतांची मागणी अधिक असते त्याच खताचा तुटवडा हे ठरलेले आहे. सध्या शेतकरी याच खतासाठी कृषी केंद्रावर हेलपाटे मारत आहे. पण खत नसल्याने निराशा होत आहे. मात्र, शेतकऱ्यांनीही याच खताचा अट्टाहास न घेता उत्पादन वाढीसाठी अनेक खत बाजारात आहेत. त्याच्याच बाबतीत आज आपण माहिती घेणार आहोत. खऱीपातील नुकसान भरुन काढण्यासाठी पुन्हा एकदा बळीराजा सज्ज झाला आहे. यंदा अधिकच्या पावसामुले पोषक वातावरणही आहे. शिवाय हरभऱ्याचे उत्पादन वाढणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे वाफसा झाला असेल तर केवळ डीएपी या खतासाठी शेतकऱ्या...

शेतकऱ्यांना माहित असावी अशी अत्यंत महत्वाची माहिती.*

इमेज
* शेतकऱ्यांना माहित असावी अशी  अत्यंत महत्वाची माहिती.* १ हेक्टर = १०००० चौ. मी .  १ एकर = ४० गुंठे  १ गुंठा = [३३ फुट x ३३ फुट ] = १०८९ चौ फुट  १ हेक्टर= २.४७ एकर = २.४७ x ४० = ९८.८ गुंठे १ आर = १ गुंठा  १ हेक्टर = १०० आर १ एकर = ४० गुंठे x [३३ x ३३] = ४३५६० चौ फुट १ चौ. मी . = १०.७६ चौ फुट ७/१२ वाचन करते वेळी पोट खराबी हे वाक्य असत—त्याचा अर्थ पिक लागवडी साठी योग्य नसलेले क्षेत्र —परंतु ते मालकी हक्कात मात्र येत!!!!! नमुना नंबर ८ म्हणजे एकूण जमिनीचा दाखला या मध्ये अर्जदाराच्या नावावर असलेली त्या विभागातील [तलाठी सज्जा] मधील जमिनीचे एकूण क्षेत्र याची यादी असते!!!! जमिनी ची ओळख हि त्याच्या तलाठी यांनी प्रमाणित केलेली आणि जागेशी सुसंगत असलेल्या चतुर्सिमा ठरवितात!!!! * ग्रामपंचायत * एक स्वराज्य संस्था जिथे स्थानिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असते (घटनेच्या चौकटीत राहून) तसेच स्वयंपूर्तीसाठी विविध योजना तयार करून राबविण्याची संपूर्ण अधिकार असलेली घटनात्मक संस्था.  आपणास आवश्‍यक असलेली माहिती कोणत्या नोंदवहीत असते याबाबत ही माहिती.         ...