सातबारा म्हणजे काय असते भाऊ ?

सातबारा म्हणजे काय असते भाऊ ?

सातबारा हा प्रत्येक शेतकरी बांधवाचा सर्वात ओळखीचा सरकारी कागद. मात्र आजही सातबारा विषयी काही बाबी शेतकरी बांधवांना माहीत नाही. चला तर आज जाणून घेऊ, सातबारा म्हणजे काय असते.
7/12 सातबारा उतारा म्हणजे काय असते ?
°यावरून आपल्याला जमीनीची मालकी कुणाकडे आहे. हे समजते.
°जमिनीवर कर्ज आहे का ? असेल तर किती आहे ? एकूण क्षेत्र, पिक पाहणी म्हणजे जमिनीवर किती क्षेत्रावर कोणते पिक लावले याची प्राथमिक माहिती समजते.
°जलसिंचन साधन, कुळाचे हक्क, इतर हक्क, खाते नंबर, लागवड योग्य क्षेत्र इत्यादी सर्व बाबीची माहिती कळते.
विशेष माहिती
°दर १० वर्षांनी ७/१२ नोंद नव्याने लिहिली जाते. 
पिक पाहणी नोंद दरवर्षी करणे खूप गरजेचे आहे. कारण यामुळे योजना, अनुदान, विमा, शासकीय नुकसान भरपाई मिळण्यास मदत होते.
कोणतीही फेरफार नोंद झाल्यास लगेच ती ७/१२ वर अपडेट करून घ्यावी.
•सातबारा उतारा नेहमी काळजीपुर्वक वाचावा. त्यात काही चूक असल्यास लगेच आपल्या गावातील तलाठी कार्यालयात जाऊन चौकशी करावी.
°सातबारा आणि आठ अ उताऱ्यावर महाराष्ट्र शासन आणि ई महाभुमी प्रकल्पाचा लोगो असणार आहे.
गावाच्या नावाबरोबर आता गावाचा कोड ( एल डी जी कोड ) सुद्धा असणार आहे.
LDG Code – Local Government Directory
°लागवडी योग्य क्षेत्र मोजमाप एकक हेक्टर आर चौरस मीटर असणार आहे.
°लागवडी योग्य क्षेत्र आणि पोट खराब क्षेत्र वेगवेगळे दाखविले जाईल. आणि दोन्ही क्षेत्राची बेरीज एकूण क्षेत्र म्हणून नमूद असेल.
°बिनशेतीचे जमिनीचे मोजमाप एकक आर चौरस मीटर राहणार आहे. यात पोट खराब क्षेत्र, विशेष आणि जुडी आकारणी, इतर हक्कातील कुळ व खंड हे रकाणे वगळले आहे.
°बिनशेतीच्या सातबाऱ्यात सर्वात शेवटी ” सदरचे क्षेत्र अकृषक क्षेत्रामध्ये रूपांतरित झाले असल्याने याकरिता गाव नमुना नंबर १२ ची गरज नाही. ” असा स्पष्ट उल्लेख असेल.
 आठ अ उतारा म्हणजे काय असते भाऊ ?

दोन खातेदाराच्या नावात स्पष्टपणे दिसेल अशी रेषा असणार. ज्यामुळे पाहता क्षणी दोन खातेदार आहे हे लक्षात येईल.
खाते क्रमांक खातेदाराच्या नावासमोर दर्शविला जाणार आहे.
प्रलंबित फेरफार ही इतर हक्क रकान्यात नमूद करण्यात आली आहे.
जुने फेरफार नोंदी आता स्वतंत्र व नवीन रकान्यात लिहिण्यात आल्या आहेत. या रकान्याचे नाव ‘ जुने फेरफार क्रमांक ‘ असे आहे.
मयत खातेदार, ई करार नोंदी, कर्ज बोझ इत्यादी नोंदी भोवती कंस करून त्यावर आडवी रेषा मारण्यात आली आहे.
शेवटचा फेरफार क्रमांक आणि त्याची दिनांक आता इतर हक्क रकान्यात नमूद आहे. 

 संदर्भ: कृषिराष्ट्र

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कढीपत्ता लागवडीबाबत माहिती

कृषी सुधारणा विधेयकं(MSP) : फायदे व तोटे

_NPK जिवाणू म्हणजे काय?_* *_NPK जीवाणूंचे काम काय ?