पोस्ट्स

जमीन सुधारना लेबलसह पोस्ट दाखवत आहे

जमिनीत शेणखत मिसळताना घ्यावयाची काळजी..

इमेज
जमिनीत शेणखत मिसळताना घ्यावयाची काळजी.. शेणखताच्या नियमित वापरामुळे जमिनीच्या कणांच्या रचनेत बदल होऊन भौतिक गुणधर्मांमध्ये लक्षणीय बदल होत असतात. यामुळे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. पांढऱ्या मुळीची चांगली वाढ झाल्यामुळे झाडातील संजीवकांची निर्मिती चांगल्याप्रकारे होते. बरेच शेतकरी शेतात शेणखत अगदी सहजपणे मिसळून निवांत राहतात. शेणखताबरोबरच इतर स्रोतांपासून मिळणाऱ्या अन्नद्रव्यांचा देखील वापर करणे तितकेच महत्वाचे आहे. शेणखत जमिनीच्या आरोग्यासाठी एक प्रकारे पूरक म्हणून कार्य करते. जमिनीत शेणखत मिसळताना घ्यावयाची काळजी – 1) लहान क्षेत्र असलेले शेतकरी शेतातील उकिरड्यात, खड्ड्यात वर्षभर साठवलेले शेण हे खत म्हणून शेतात मिसळतात. असे शेण चांगले कुजलेले असणे गरजेचे आहे. शेणाखतामध्ये हुमणी, कॉकचाफर भुंगे, नारळावरील गेंड्या भुंग्याच्या अळ्या इत्यादी किडींच्या अळी आढळून येते. ज्यास बरेचसे शेतकरी ‘शेणकिडे’ म्हणून संबोधतात. अशा अळ्या शेणखताद्वारे पसरून शेतातील मुख्य पिकास नुकसान पोचवितात. 2) भुंगेरावर्गीय किडींची मादी मे किंवा जून महिन्यात शेणासारख्या कुजणाऱ्या पदार्थांमध्य...