ठिबक सिंचन – थेंबाथेंबातून समृद्धीकडे !
ठिबक सिंचन – थेंबाथेंबातून समृद्धीकडे ! पीक उत्पादनात पाणी हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. पिकाच्या वाढीवर व पर्यायाने उत्पादनावर गरजेपेक्षा की अथवा अधिक पाणी दिल्यास अनिष्ट परिणाम होतो. याकरिता पिकासाठी पाण्याचे योग्य नियोजन करणे जरूरीचे आहे. पाण्याचे नियोजन हे प्रमुख्याने पीक प्रकार, जमिनीचा प्रकार, पिकाच्या वाढीच्या अवस्था हवामान व हंगाम या बाबींवर अवलंबून आहे. पाण्याचे योग्य नियोजन करणे म्हणजे एखाद्या पिकास हंगामानुसार व त्याच्या गरजेनुसार किती पाणी द्यावे ? पाण्याची गरज भागविण्यासाठी पाण्याच्या किती पाळ्या व प्रत्येक पाळीस किती पाणी द्यावे ? पाणी कसे द्यावे ? या सर्व गोष्टींचा समावेश होतो. उपलब्ध पाण्याचा शेतीसाठी योग्य पद्धतीने वापर व्हावा यासाठी सूक्ष्म सिंचन पद्धती जसे कि ठिबक सिंचन , तुषार सिंचन यांचा प्राधान्याने वापर व्हावयास पाहिजे. पाण्याचे नियोजन: – पिकास पाणी देत असताना जमिनीचा विचार करणे आवशयक आहे. जमिनीतील ओलावा धरून ठेवण्याचे प्रमाण, पाणी मुरण्याचा वेग, पाण्याचा निचरा हे जमिनीच्या प्रकारानुसार बदलत असते. भारी जमिनीमध्ये उपलब्ध पाणी धारणा शक्ती ही हलक्या जमिनी...