फुलशेती विषयी प्राथमिक माहिती

फुलशेती विषयी प्राथमिक माहिती

आज शेतकरी बांधव शेतात नवीन नवीन प्रयोग करत आहे. फुलशेती हा असाच एक यशस्वी प्रयोग आहे. मात्र अनेक शेतकरी प्राथमिक माहिती नसताना फुलशेती करतात आणि आर्थिक नुकसानीच्या विळख्यात सापडतात. चला तर पाहुयात फुलशेतीची प्राथमिक माहिती….
∆फुलशेती करताना खालील मुद्दे खूप महत्वाचे आहे.
*योग्य हवामान आणि जमीन
*सिंचन सुविधा
*शेडनेट किंवा पॉलीहाऊस
*योग्य खत व्यवस्थापन
*तोडणी, प्रतवारी आणि पॅकिंग
*मार्केटिंग 

∆कोणत्या फुल पिकांची लागवड करावी ?
*गुलाब
*जरबेरा
*कार्नेशन
*मोगरा
*अस्टर
*शेवंती
*झेंडू
*ऑर्किड
*स्टाटीस
*निशिगंध
*जाई आणि जुई
*अंथुरियम

∆कोणत्या फुलांना मार्केट मध्ये सतत मागणी असते ?
*गुलाब
*झेंडू
*जरबेरा
*ऑर्किड
*कार्नेशन
∆कोणत्या हंगामात फुलाची मागणी जास्त असते ?
फेब्रुवारी महिन्यात गुलाब फुलांची मागणी भरपूर असते.
श्रावण, दिवाळी, दसरा या भारतीय सणाच्या काळात झेंडू, शेवंती, जाई जुई या फुलांना चांगले मार्केट असते.
पंचतारांकित हॉटेलात, कॉर्पोरेट ऑफिसमध्ये जरबेरा, कार्नेशन, ऑर्किड अश्या विदेशी फुलांची १२ महिने मागणी असते.
मोगरा, जाई व जुई अश्या फुलापासून गजरे बनवितात म्हणून अश्या फुलांना नेहमी लोकल मार्केट मध्ये चांगला भाव मिळतो.
सणासुदीच्या काळात, श्रावण महिन्यात, लग्न समारंभ, व्हॅलेंटाईन विक मध्ये सामान्य ग्राहकाकडून फुलांची मागणी वाढते. त्यामुळे योग्य काढणी आणि मार्केटिंग नियोजन करूनच फुलशेती करावी ही विनंती.

°फुलशेती विषयी प्राथमिक माहिती –
•फुल पिके हे नाजूक असतात.
•बदलत्या वातावरणचा त्यांचावर लगेच परिणाम दिसून येतो.
•ऊन, पाऊस, आद्रता, तापमान, सूर्यप्रकाश यासाठी ही पिके संवेदनशील असतात.
•वरील बाबीचा विचार करून शक्यतो फुल लागवड शेडनेट किंवा पॉली हाऊस मध्ये करावी.
•काढणी नंतर फुल पिके ठराविक काळापर्यंत फ्रेश राहतात.
•फ्रेश असताना त्यांची खरेदी ग्राहकाकडून केली जाते. त्यामुळे काढणी नंतर लवकरात लवकर फुले मार्केट किंवा ग्राहकापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
•मार्केट मधील फुलांची खरेदी किंमत ही प्रतवारी नुसार ठरते. त्यामुळे काढणी आणि प्रतवारी करताना मानके पूर्ण करावीत.
खालील पिकांना फुले येण्याकरीता १२ तासापेक्षा जास्त सूर्यप्रकाश लागतो.
•गुलाब
•अस्टर
•झेंडू
•कार्नेशन
•निशिगंध
•मोगरा
∆फुल पिकासाठी आवश्यक हवामान
निशिगंध
उष्ण हवामान
सरासरी २० ते ३५° तापमान
गुलाब
हवेतील आर्द्रता ६० ते ६५ %
दिवसा तापमान २२ ते २८° डिग्री
रात्रीसाठी तापमान १५ ते १७° डिग्री सेल्सिअस
जरबेरा – 
हवेतील आर्द्रता ५० ते ६० %
दिवसा तापमान १२ ते २४° डिग्री सेल्सिअस
रात्रीचे तापमान १२ ते १५° डिग्री सेल्सिअस 
कार्नेशन
दिवसा तापमान २५ ते ३०° आणि रात्रीसाठी १६° सेल्सिअस 
ऑर्किड
वातावरणात ७० ते ९० % आर्द्रता
नियंत्रित तापमान
मोगरा
दिवसा २५ ते ३२° आणि रात्री १६ ते २२° तापमान गरजेचे
हवेतील आर्द्रता ५५ ते ६५% सेल्सिअस
मार्केटचा पूर्ण अभ्यास करून, काही फुल उत्पादक शेतकरी बांधवाची प्रत्यक्ष भेट घेवून आणि योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केल्यास फुलशेती ही खूप फायद्याची आहे.

असेच नवनवीन कृषि विषयक ब्लॉग साठी या ब्लॉग ला fallow करा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कढीपत्ता लागवडीबाबत माहिती

कृषी सुधारणा विधेयकं(MSP) : फायदे व तोटे

_NPK जिवाणू म्हणजे काय?_* *_NPK जीवाणूंचे काम काय ?