कापूस पिकातील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स

कापूस पिकातील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स BT कापसाला मध्यम व भारी जमीन खुप मानवते.त्यासाठी अशाच जमिनीत कापसाची लागवड करावी. तसेच सिंचन सुविधा नसलेल्या हलक्या जमिनीत कापुस लागवड शक्यतो टाळावी.जमिनीच्या प्रकारानुसार समतल पेरणी,जमिनीच्या उताराला आडवी पेरणी,सरी वरंबा पध्दतीने मशागत इ. मुलस्थानी जलसंधारण तंत्राचा अवलंब करावा.कोरडवाहू क्षेत्रामध्ये बिगर बी.टी.कपाशीच्या सरळ वाणांची अतिघन पध्दतीने लागवड केल्यास बी.टी. वाणा इतकेच उत्पादन मिळू शकते.सरळ वाणांचे बियाणे घरच्या घरी तयार करुन त्याचा वापर करावा.बीबीएफ यंत्राचा वापर करुन पेरणी करावी, जेणेकरुन पावसाचे पाणी साठवून ठेवण्यास मदत होऊन ओलावा अधिक काळ टिकतो व अतिपावसाच्या वेळी पाण्याचा निचरा होण्यास मदत होते.यामुळे बियाणे, खत व मजुर खर्चात बचत होते. कापूस पिकात भूईमूग (१:१), मूग किंवा उड़ीद (१:१), सोयाबीन (१:१ किंवा २:१) या आंतरपीक पध्दतीचा अवलंबकरावा.आपल्या विभागामध्ये कृषि विद्यापीठाने शिफारस केलेल्य योग्य कालावधीमध्ये पेरणी केल्यास कीड व रोग यांचा प्रादुर्भाव टाळता येतो.तण नियंत्रणासाठी पेरणीपुर्व तणन...