*असे करा गोगलगायींचे एकात्मिक व्यवस्थापन*

🐌 * शंखू गोगलगायींपासून पिकांना धोका* गोगलगाय ही एक बहुभक्षी प्रकारची किड असून. ती विशेषतः रोपावस्थेत पिकाचे नुकसान करते. गोगलगाय किडीच्या नियंत्रणासाठी १) खुराकाच मोकळं पोत एक किलो गुळाच्या पाण्यात बुडवून संध्याकाळी शेतात टाकावीत, त्यावर गोगलगाय आकर्षित होईल नंतर ते जमा करून त्यावर औषधाची फवारणी करावी २) मोसंबी, डाळिंब,व इतर बागेत दरवर्षी खोडावर बोर्डो पेस्ट लावावे म्हणजे गोगलगाय झाडावर चढणार नाही. ३) गोगलगाय नियंञणासाठी मेटाअल्डीहाइड २.५%असणारे स्नेलकिल हे मॉलुस्कीसाईड वापरावे ४) तंबाखू पावडर ची शेताच्या सर्व बाजूने रेषा ओढायची म्हणजे गोगलगाय आत येणार नाही. 🌱सद्य परिस्थितीमध्ये बऱ्याच ठिकाणी सोयाबीन, कापूस, भाजीपाला व विविध फळबागेमध्ये शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी गोगलगायींना वेळीच ओळखून उपाययोजना करावे. 🧐 * असे करा गोगलगायींचे एकात्मिक व्यवस्थापन* 👇 ▪️शेताचे बांध स्वच्छ ठेवावे, त्यामुळे गोगलगायींना लपण्यास जागा र...