कशी कराल फळबाग लागवडीची पूर्वतयारी
कशी कराल फळबाग लागवडीची पूर्वतयारी राज्यामध्ये सन 1990-91 पासून रोजगार हमी अंतर्गत 100 टक्के अनुदानित फळझाड लागवड हि महत्त्वाकांक्षी योजना सुरु झाली. तेव्हा पासून फळबाग लागवडीची संकल्पना राज्यातील शेतकर्यांच्या मनावर रुजली. फळबाग लागवडीची संकल्पना राज्यातील पडीक जमिनीला मिळालेले वरदान ठरली, अस म्हटल तर वावग ठरू नये. राज्यात आता पर्यंत 18 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर फळबागा उभ्या आहेत. परंतु अद्याप फळबाग लागवडीमध्ये अपेक्षित असे यश मिळालेले नाही हि वस्तूस्थिती आहे. अशा परिस्थितीत फळबाग लागवड यशस्वी होण्यासाठी फळबाग लागवडीची पूर्वतयारी आणि नियोजन या महत्वाच्या बाबी आहेत. फळबागेच्या यशस्वी लागवडीकरिता महत्वाच्या बाबी कोणत्या? आपल्याकडे जमीन कोणत्या प्रकारची आहे? आपल्या जमिनीत फळझाडे येतील का? बारमाही पाण्याची व्यवस्था आपल्याकडे आहे का? आपल्या हवामानात फळझाडे कोणत्या प्रकारची येऊ शकतील? मातीची व पाण्याची तपासणी केली आहे काय? बागेसाठी उत्तम जातीवंत कलमे कोठून उपलब्ध होऊ शकतील? जी बाग आपण लावणार आहोत त्यास बाजारपेठ उपलब्ध आहे काय? प्रक्रिया उद्योग आहेत काय? अशा सर्व बाबींचा विचार केल्यानंत...