लसूण लागवड

 *लसूण लागवड*

🎯 *लसूण* हे कंद कुलातील एक मसाल्‍याचे पीक आहे. अन्‍नपदार्थ स्‍वादीष्‍ट होण्‍यासाठी दैनंदिन आहारात लसणाचा उपयोग करतात. लसणात प्रोपील डायसल्‍फाईड व लिपीड ही द्रव्‍ये असतात. 


📍 *चटण्‍या,* भाजी व लोणचे यात लसणाचा वापर केला जातो. पोटाच्‍या विकारावर पचनशक्‍ती, कानदुखी डोळयातील विकार डांग्‍या खोकला इत्‍यादीवर उपचारासाठी गुणधर्मही लसणात आहेत.


📌 *महाराष्‍ट्रात* जवळ जवळ 5000 हेक्‍टर जमीन हया पिकाखाली असून नाशिक, पुणे, ठाणे तसेच मराठवाडा व विदर्भात लागवड केली जाते.


⛈️ *हवामान व जमीन*


👉 समशितोष्‍ण हवामान लसूण लागवडीस उपयुक्‍त असते. मात्र अति उष्‍ण व अति थंड हवामान या पिकास मानवत नाही.


👉 *समुद्रसपाटीपासून* 1000 ते 1300 मीटर उंचीपर्यंत लसणाची लागवड करता येते. 


👉 *पिकाच्‍या* वाढीच्‍या काळात 75 सेमी पेक्षा जास्‍त पाऊस पडत असल्‍यास पिकाची वाढ चांगली होत नाही. 


👉 *या करता ऑक्‍टोबर* महिन्‍यात केलेली लागवड अधिक उत्‍पादन देते. दिवसाचे 25 ते 28 अंश सें. ग्रे. व रात्रीचे 10 ते 15 अंश सें.ग्रे. तापमानात गडडयांची वाढ चांगली होते.


📍 *मध्‍यम खोलीच्‍या* भरपूर सेंद्रीय खते घातलेल्‍या रेती मिश्रित कसदार तणविरहित जमिनीत पीक चांगल्‍याप्रकारे घेता येते. हलक्‍या प्रकारच्‍या जमिनी, चिकण मातीच्‍या जमिनी लागवडीस योग्‍य नसतात.


🌱 *पूर्वमशागत*


👉 *मध्‍यम खोलीची* नांगरट करुन ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी. जमीन तयार करते वेळी हेक्‍टरी 30 गाडया (15 टन) शेणखत मिसळावे. वर पाणी देण्‍यास सोईस्‍कर अशा आकाराचे (3×2) अथवा (3.5×2मी) सपाट वाफे तयार करावेत.


🎯 *जाती व लागवड*


👉 *महाराष्‍ट्रात पांढ-या* रंगाच्‍या *जामनगर* जातीची तसेच *गोदावरी, श्रवेता* या जातीची लागवड केली जाते. 


🌱 *लसणाची लागवड* 


👉 *ऑक्‍टोबर-नोव्‍हेबर* महिन्‍यात साध्‍या वाफयात कोरडया 10×7.5 सेमी वर करतात. 


👉 *गडडे फोडून* पाकळया किंवा काडया सुटया करुन टाकून मातीने झाकतात. त्‍यासाठी हेक्‍टरी 500 ते 600 किलो कुडयाच्‍या स्‍वरुपात बियाणे लागते. *लागण झाल्‍यानंतर कुडया निघणार नाहीत असे पाणी द्यावे.*


🎯 *बियाण्‍याची निवड*


👉 *लसणाच्‍या* गाठया एकावर एक अशा गोलाकार पाकळयांनी बनलेली असते. 


👉 *गाठयातील* पाकळया सुटया करण्‍यासाठी गडडे पायाखाली तुडवून मग ऊफवून साफ केल्‍या जातात. 


👉 *लागवडीसाठी* मोठया निरोगी व परिपक्‍व पाकळयांच्‍या उपयोग करावा.


🌱 *खते* 


👉 *लावणीच्‍या वेळी* लसणास हेक्‍टरी 50 किलो युरीया 300 किलो सुपर फॉस्‍फेट व 100 किलो म्‍युरेट ऑफ पोटॅश मिसळून द्यावा म्‍हणजे पिकांची वाढ जोमदार होते.


🎯 *आंतर मशागत*


👉 *लसणाच्‍या* पाकळया लावल्‍यानंतर *एक महिन्‍याने खुरपणी* करुन गवत काढून घ्‍यावे. त्‍यानंतर तण पाहुन 1-2 वेळा निंदणी करावी. 


👉 *लागवडीनंतर* अडीच महिन्‍यांनी लसणाचे गाठे धरण्‍यास सुरुवात होते. यावेळी हात कोळपणी करुन माती चांगली मोकळी ठेवावी म्‍हणजे मोठया आकाराचे व चांगले भरदार गाठे धरण्‍यास मदत होते. त्‍यानंतर खुरपणी अथवा कोळपणी करु नये.


🎯 *पाणी देणे*


👉 *लावणीनंतर* पाण्‍याची पहिली पाळी सावकाश द्यावी. दुसरी पाळी त्‍यानंतर 3-4 दिवसांनी आणि पुढच्‍या हवामानानुसार 8 ते 12 दिवसांनी द्याव्‍यात. गडडे पक्‍के होताना वर पाण्‍याच्‍या दोन पाळीतील अंतर वाढवावे. काढणीच्‍या दोन दिवस अगोदर पाणी द्यावे. त्‍यानंतर वरपाणी देऊ नये. म्‍हणजे गडडे काढणे सोपे जाते व गडडे फुटले जात नाही.


🐛 *किड व रोग*


📍 *किडी*

◼️ *बोकडया :* ही किड पानातील रस शोषुन पीक अशक्त बनवतात.


👉 *उपाय*

सायपर मेथ्रीन 25 टक्‍के प्रवाही 5 मिली 10 लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी.


📍 *रोग*

◼️ *करपा व भुरी :* या दोन्‍ही रोगांमुळे अनुक्रमे पाने गर्द तांबडया रंगाची व पांढ-या रंगाची होतात व अटळ स्थितीत झाडे मरतात.


👉 *उपाय*

ताम्रयुक्‍त बुरशीनाशकाचा वापर करावा.


🚜 *काढणी व उत्‍पादन*


👉 *लावणीनंतर* साडेचार ते पाच महिन्‍यांनी हे पीक काढणीस योग्‍य होते. पिवळी पडावयास लागली म्‍हणजे गाठे काढावयास तयार झाले असे समजावे. 


👉 *लसूण पातीसह* तसाच बांधून ठेवावा म्‍हणजे *8 -10 महिने टिकतो.* विक्रीसाठी पाती कापून गडडे स्‍वच्‍छ करुन आकाराप्रमाणे प्रतवारी करुन बाजारात पाठवतात. 


👉 *जमिनीचे पोत,* खते व जात यावर लसणाचे उत्‍पादन अवलंबून असते. *दर हेक्‍टरी 9 ते 10 टन उत्‍पादन मिळते*


💥

⚡ *_कृपया ही माहिती शेअर करा ज्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांनाही फायदा होईल...!_*

                                     धन्यवाद

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कढीपत्ता लागवडीबाबत माहिती

कृषी सुधारणा विधेयकं(MSP) : फायदे व तोटे

_NPK जिवाणू म्हणजे काय?_* *_NPK जीवाणूंचे काम काय ?