हिरवळीच्या खताचा मानबिंदू (गिरिपुष्प
*_ब्लॉग विषय : हिरवळीच्या खताचा मानबिंदू (गिरिपुष्प )_*
_महाराष्ट्रातील जमिनीत सेंद्रिय पदार्थांचा अभाव असल्याने आपल्या पिकांची उत्पादकता कमी आहे. त्यासाठी जमिनीत दरवर्षी सेंद्रिय खते टाकली पाहिजेत. परंतु शेणखत, कंपोस्ट यांसारखी नेहमी उपयोग करण्यात येणारी सेंद्रिय खते दुर्मिळ होत चालली आहेत. ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर प्रमुख समस्या आहे. त्यावर पर्याय म्हणून हिरवळीची खते वापरणे हा एक उपाय आहे. हिरवळीची खते दोन प्रकारची असतात, एक हंगामी व दुसरी बहुवर्षीय. हंगामी पिकांत सण (ताग) धैंचा, सस्बेनिया आणि बहुवर्षीय पिकांत सर्वांत महत्त्वाचे झाड गिरिपुष्प (ग्लिरिसिडीया) हे होय. जंगलात आढळणारे छोटे, मध्यम उंचीचे व पानांचा हिरवा गडद रंग असलेले झाड. गिरिपुष्प (ग्लिरिसिडीया) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या झाडाला "गिरिपुष्प' असे सुंदर नाव दिले आहे. गिरिपुष्प हे द्विदल वर्गातील जलद वाढणारे झाड आहे. शिवाय ते अत्यंत काटक आहे. त्यामुळे ते केवळ पावसाच्या पाण्यावर होऊ शकते. या झाडाला १६ ते २० वर्षे आयुष्य आहे. या झाडाला जून ते ऑगस्ट या महिन्यांत भरपूर फुटवा येतो. झाड पानांनी भरून जाते._
_गिरिपुष्पाच्या झाडाला एप्रिल-मे महिन्यांत शेंगा येतात. त्या वाळल्या म्हणजे त्यात चपट्या आकाराचे तपकिरी रंगाचे बी येते. हे झाड तमिळनाडू, केरळ, महाराष्ट्र, ओरिसा, आसाम आणि पश्चिम बंगाल या भागांत अधिक प्रमाणात आढळून येते. या झाडाच्या पानांचा उपयोग हिरवळीचे खत म्हणून केला जातो आणि फांद्यांचा वापर जळणासाठी होतो_
*_गिरीपुष्पाची लागवड :_* _गिरिपुष्पाची लागवड शेतजमिनीत करणे फायदेशीर ठरते, कारण त्यापासून मिळणारी हिरवी पाने व फांद्या कापून जमिनीत मिसळून दिल्यास जमिनीची सुपीकता वाढविता येते, तसेच खडकांची झीज होऊन जमीन चांगल्याप्रकारे तयार होण्यासही मदत होते. या झाडाची लागवड दोन पद्धतीने केली जाते. त्यात पहिली पद्धत छाट कलम तयार करणे व दुसरी पद्धत झाडांच्या बियांपासून रोप तयार करून करता येते. छाट कलम तयार करण्याच्या पद्धतीत झाडाचे छाट कलम साधारणपणे एक वर्ष वयाच्या झाडापासून किंवा त्याच्या फांदीपासून तयार करावे. फांदीची जाडी १.५ ते २ सें.मी. व लांबी ५० ते १०० सें.मी. असावी. लागवड करताना छाट कलमाची खालची बाजू जमिनीत साधारण २० ते ५० सें.मी. खोल रुजवावी. लागवड पावसाळ्यात जमिनीत ओलावा...._
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा