उन्हाळी तिळ लागवड


उन्हाळी तिळ लागवड 


उन्हाळी हंगामाकरिता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने एकेटी-101 आणि एनटी 11-91 या जातींची शिफारस केली आहे. एकेटी-101 या जातीचे गुणधर्म म्हणजे हा वाण 90-95 दिवसांत पक्व होतो. दाण्याचा रंग पांढरा आहे. तेलाचे प्रमाण 48 ते 49 टक्के असून, उत्पादन प्रति हेक्‍टरी आठ क्विंटल मिळते. तिळाचे पीक चांगला निचरा होणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येते. तिळाचे बियाणे बारीक असल्यामुळे जमीन चांगली, भुसभुशीत तयार करावी. त्यासाठी काडीकचरा वेचून उभी-आडवी वखरणी करावी, पठाल फिरवून सपाट करावी. जमीन तयार करताना चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. उन्हाळी हंगामाकरिता प्रति हेक्‍टरी चार किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास तीन ग्रॅम कार्बेन्डाझिम तसेच चार ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. यामुळे जमिनीतून उद्‌भवणाऱ्या रोगांना आळा बसतो, तसेच बियाण्याची उगवण चांगली होते.


उन्हाळी तीळ पिकाची पेरणी

उन्हाळी तीळ पिकाची पेरणी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पूर्ण करावी. पेरणीला उशीर झाल्यास पीक कापणीच्या वेळेला मॉन्सूनपूर्व पावसात सापडण्याची भीती असते. बियाणे फार बारीक असल्यामुळे समप्रमाणात वाळू मिसळावी. तिफणीने 30 सें.मी.वर पेरणी करावी. माती परीक्षणानुसार पेरणीच्या वेळेस प्रति हेक्‍टरी 12.5 किलो नत्र आणि 25 किलो स्फुरद द्यावे. नत्राचा दुसरा हप्ता 12.5 किलो पेरणीनंतर 30 दिवसांनी द्यावा. कमतरता असल्यास पेरणीच्या वेळेस तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार झिंक व सल्फरच्या मात्रा 20 किलो प्रति हेक्‍टरी या प्रमाणात द्याव्यात. पेरणीनंतर सात-आठ दिवसांनी नांगे भरावेत. पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी पहिली व आठ दिवसांनी दुसरी विरळणी करून, दोन रोपांत दहा सें.मी. अंतर ठेवावे. आवश्‍यकतेनुसार दोन-तीन कोळपण्या देऊन व निंदण करून शेत स्वच्छ ठेवावे. पीक एक महिन्याचे होईपर्यंत शेतात तण होणार नाही, याची काळजी घ्यावी. उन्हाळी पिकास आवश्‍यकतेनुसार पेरणीपूर्व व पेरणीनंतर ताबडतोब व नंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे 12 ते 15 दिवसांनी ओलित करावे. फुलोऱ्यास सुरवात होताना व बोंड्या भरताना ताण पडल्यास सुरक्षित ओलित द्यावे.


संपर्क - 0724-2259262

कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला


🍓 गोड ज्वारी : खरीप ज्वारीस पर्यायी पीक  -


🔹स्ञोत -ॲग्रोवन



- गोड ज्वारी ही आपल्या नेहमीच्या खरीप ज्वारीसारखीच असते. मात्र, जास्त कायीक वाढ आणि तिच्या ताटाच्या रसामध्ये अधिक साखरेचे प्रमाण (ब्रिक्‍स) असल्याने त्यास गोड ज्वारी म्हणतात.

- या ज्वारीच्या ताटामध्ये उसासारखी गोडी असते. त्याच्या रसापासून काकवी किंवा गूळ आणि इथेनॉल बनविता येते. गोड ज्वारीच्या ताटापासून रस काढल्यानंतर राहिलेला चोथा गुरांना चारा म्हणून वापरता येतो.

- गोड ज्वारी लागवड तंत्रज्ञान हे खरीप किंवा रब्बी ज्वारी लागवड तंत्रज्ञानाप्रमाणेच असून, खालील काही मुद्दे वेगळे आहेत. 


🔸 पेरणीची वेळ आणि पद्धत -

गोड ज्वारी ही खरीप आणि उन्हाळी हंगामात घेता येते. खरीप हंगामात ज्वारीची पेरणी योग्य पाऊस झाल्याबरोबर १५ दिवसाच्या आत करावी. उन्हाळी हंगामात गोड ज्वारीची पेरणी डिसेंबरचा शेवटचा आठवडा ते जानेवारीच्या पहिल्या पंधरवाड्यापर्यंत करावी. पेरणीच्या वेळी रात्रीचे तापमान १० ते १२ सेल्सिअस पेक्षा जास्त असावे. सरी वरंबा पद्धतीने लागवड केल्यास जमिनीत ओलावा कायम टिकून राहतो.


🔸 ओळीतील अंतर -

गोड ज्वारीसाठी दोन ओळींतील अंतर ६० सें.मी. व दोन झाडामधील अंतर १५ सें.मी. ठेवणे गरजेचे आहे, त्यामुळे झाडाची संख्या एक लाख दहा हजार प्रतिहेक्‍टरी राहील.


गोड ज्वारीचे प्रचलीत वाण - एसएसव्ही-८४  फुले अमृता (आर एस एस व्ही-९), शुगरग्रे, ऊर्जा, सीएसएच-२२, आयसीएसव्ही- ९३०४६, आयसीएसव्ही- २५२७४


🔸 खताची मात्र -

पेरणी पूर्वी १२ ते १५ बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत वापरावे. १०० किलो नत्र, ४० किलो स्फुरद व ४० किलो पालाश प्रति हेक्‍टरी या रासायनिक खताची शिफारस आहे.


🔸 उत्पादन -

- हिरव्या चाऱ्याचे उत्पादन ३६-४० टन प्रतिहेक्‍टरधान्याचे उत्पादन ३-८ क्विंटल प्रतिहेक्‍टर.

- रसातील गोडवा ब्रिक्‍स १७-१८गुळाचे उत्पादन ३०-३२ क्विंटल प्रतिहेक्‍टर.

- इथेनॉलचे उत्पादन १८००-२००० लिटर प्रतिहेक्‍टर. 


वरीलप्रकारे काटेकोर व्यवस्थापन केल्यास गोड ज्वारीचा एकरी १२ ते १५ टन हिरवा चारा मिळू शकतो आणि रसापासून आपणास हेक्‍टरी २००० ते २५०० लिटर इथेनॉल मिळू शकते.


रस काढल्यानंतर शिल्लक राहणारा लगदा ज्वलनासाठी तसेच जनावरांचे पौष्टिक खाद्य म्हणून वापरता येतो. त्याचा वापर दुग्धोत्पादन वाढीला हातभार लावेल, तसेच गोड ज्वारीच्या सिरपला ही मागणी राहील. या सिरपपासून काकवी तयार करण्यासाठी इक्रिसॅटमध्ये संशोधन सुरू आहे. ती मधुमेहीसाठी उपयुक्त असेल. 


*गोड ज्वारी अधिक लाभदायी का?*

- गोड ज्वारीचे पीक हे ४ महिन्यांत येते. दर वर्षी  दोन पीक घेता येतात.

- गोड ज्वारी हे जिरायत पीक आहे. हे पीक जमिनीतील पाण्याचा कार्यक्षमपणे वापर करणारे पीक (सी ४)  म्हणून ओळखले जाते. 

- गोड ज्वारीचा लागवडीचा खर्च कमी.

- गोड ज्वारीमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असून, हा रस इथेनॉलसाठी योग्य.

- बियाण्यांपासून लागवड करू शकतो.

- गोड ज्वारीच्या चोथा पशुखाद्यासाठी उपयुक्त. 

- काही प्रमाणात धान्याचे उत्पादन.

- आर्थिकदृष्ट्या अधिक फायद्याचे. 


📌 अधिक माहितीकरिता संपर्क -

डॉ. हि. वि. काळपांडे,  ०२४५२-२२११४८

(लेखक ज्वारी संशोधन केंद्र, वसंतराव नाईक 

मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी य़ेथे कार्यरत आहेत)


कांदा - चालू घडामोडी


1. प्रतिकूल पाऊसमान / हवामानामुळे रांगडा आणि आगाप उन्हाळ लागणींच्या एकरी उत्पादकतेत / गुणवत्तेत मोठी घट होत असल्याचे कांदा उत्पादकांचे म्हणणे आहे.


2. चीनसह अन्य स्पर्धक देशांच्या तुलनेत भारतीय कांद्याचे  रेट उंच असल्याने *सध्या* निर्यातीला चांगली पॅरिटी / पडतळ मिळत नसल्याचे रिपोर्ट्स आहेत.


3. सध्या भारतात कंटेनरचा तुटवडा भासत असल्याने कांद्याच्या निर्यातीत  अडथळे येत आहेत.


4. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात कांदा-टोमॅटोचे सरप्लस उत्पादन असून,  

इराण-अफगाणीस्तानातील मालावर आयातबंदीची मागणी तेथील शेतकऱ्यांनी केलीय.


5. यंदा राजस्थान, गुजरातमधील व्यापाऱ्यांकडून नाशिक विभागात कांदा चाळ बुकिंगसाठी लवकर हालचाली सुरू झाल्या आहेत. 


6. बांगला देशात स्थानिक कांद्याचा पुरवठा सुरू झाला आहे. आयातीत मालावर दहा टक्के ड्युटी आकारण्यात आलीय. 


7. नाफेडने यंदा 1.5 लाख टन उन्हाळ कांदा खरेदीचे उदिष्ट ठेवले आहे. गेल्या वर्षी एक लाख टन कांदा खरेदी केला होता.

- दीपक चव्हाण, ता. 19 जानेवारी 2021. फेसबूक पोस्ट


पोस्टमधील फोटो :  खामखेडा (ता. देवळा) येथील दीपक बोरसे यांचे रांगडा कांद्याचे मार्केटला निघालेले ट्रॅक्टर. जाळी लावून भरलेल्या ट्रॅक्टरमध्ये 35 क्विंटल कांदा बसतो.   


---

उन्हाळ कांदा पिकवणारी आणि स्टॉक करणारी राज्ये व तेथील प्रमुख विभाग...


महाराष्ट्र - नगर, नाशिक, पुणे, धुळे, बीड

मध्यप्रदेश - शहाजापूर, देवास, उज्जैन, खंडवा, सतना, रेवा

उत्तरप्रदेश - गाजीपूर, वाराणसी, जॉनपूर, कानपूर 

बिहार - पटना, गया

गुजरात - दोराजी ओपलेटा - जुनागड, भावनगर 

राजस्थान -  सीकर, नागौर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कढीपत्ता लागवडीबाबत माहिती

कृषी सुधारणा विधेयकं(MSP) : फायदे व तोटे

_NPK जिवाणू म्हणजे काय?_* *_NPK जीवाणूंचे काम काय ?