भुईमुग
*_🥜 भुईमुग 🥜_*
_काही शेतकरी डिसेंबरपासून भुईमूग लागवडीस सुरवात करतात; परंतु उन्हाळी हंगामाची योग्य वेळ १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी आहे. या कालावधीत थंडी कमी होऊन उगवण चांगली होते. पेरणीसाठी फुले उन्नती, फुले आर.एच.आर.जी. ६०२१, फुले उनप (जे.एल. २८६), जे.एल. ५०१, टी.पी.जी. ४१, टी.ए.जी. २४, टी.जी. २६, , एस.बी. ११ या वाणांपैकी निवड करावी. उपट्या प्रकारच्या वाणांसाठी ४० किलो, मोठ्या दाण्याच्या वाणांसाठी ५० किलो आणि निमपसऱ्या व पसऱ्या वाणांसाठी ३२ ते ३४ किलो बियाणे प्रति एकरी लागते. रोपावस्थेत उद्भवणाऱ्या रोगांपासून संरक्षण करण्यासाठी, बियाण्यास ३ ग्रॅम थायरम किंवा २ ग्रॅम कार्बेन्डाझीम प्रतिकिलो बियाणे या प्रमाणात प्रक्रिया करावी किंवा ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ५ ग्रॅम प्रतिकिलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर प्रतिकिलो बियाण्यास प्रत्येकी २५ ग्रॅम रायझोबिअम व स्फुरद विरघळविणाऱ्या जीवाणू संवर्धनाची प्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवून मगच पेरणीसाठी वापरावे._
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा