*द्राक्ष फळपिक व्यवस्थापन

 *द्राक्ष फळपिक व्यवस्थापन*




तपशील


शेती पद्धत


जमीन


जमीन योग्य निचरा असलेली, हलकी ते मध्यम असावी. चुनखडीचे प्रमाण ८ % पेक्षा जास्त असू नये, तसेच विद्युत वाहकता २ डे.सी. प्रति मीटर पेक्षा कमी नसावी. सामू ६.१ ते ७.५ च्या दरम्यान असावा.


हवामान


द्राक्ष हे थंड प्रदेशातील पीक असूनही समशीतोष्ण वातावरणात चांगले उत्पादन देत आहे. द्राक्षाला उष्ण व कोरडे हवामान मानवते. तापमान २५ ते ३५ अंश सेल्सिअस, ६०० मि.मी पेक्षा कमी पर्जन्यमान द्राक्षाला मानवते. आर्द्रता ६० % पेक्षा जास्त असल्यास रोगांचा प्रादुर्भाव वाढतो.


लागवड व निगा


लागवडीची पद्धत: १) स्वमुळावर २) खुंटावरील लागवड


खुंटाची लागवड फेब्रुवारी महिन्यात दक्षिणोत्तर करावी. ५० दिवसांनी रिकट घेऊन २ ते ३ सशक्त फुटी निवडून त्यांना आधार द्यावा. ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यात जमिनीपासून सव्वा ते दीड फुट उंचीवर ८- १० मी.मी. जाड काडीवर सशक्त, रोगमुक्त, परिपक्व सायन काडी घेऊन पाचरकलम करावे.


लागवाडीचे अंतर


भारी जमीन: मध्यम वातावरण १०’ x ६’, कोरडे वातावरण ८’ x ५’


मध्यम जमीन: मध्यम वातावरण ९’ x ६’, कोरडे वातावरण ८’ x ५’


हलकी जमीन: मध्यम वातावरण ९’ x ५’, कोरडे वातावरण ८’ x ४’


सुधारीत वाण


पांढरी: थॉमसन सीडलेस व त्याच्या उत्परीवर्तीत जाती (तास ए गणेश, सोनाका, माणिक चमन इ.) , मांजरी नवीन


रंगीत: शरद सीडलेस, फँन्टसी सीडलेस, क्रीमसन सीडलेस


संजीवकांच्या मात्रा


फुले उमलण्यापुर्वी १०- २० पी.पी.एम. जी.ए.ची फवारणी करावी. २५ % टोप्या पडल्यानंतर २० पी.पी.एम. व ७५ % टोप्या पडल्यानंतर ४० पी.पी.एम. जी.ए.मध्ये घड बुडवणी करावी. फलधारणा झाल्यानंतर ४० पी.पी.एम. जी.ए.चा फवारा द्यावा.


पाणी व्यवस्थापन


छाटणीनंतर दिवस


महिना


पाण्याची मात्रा (लि/ एकर/ दिवस)


खरड छाटणी


१- ३०


एप्रिल- मे


१३४४० - २०१६०


३१- ४०


एप्रिल- मे


१३४४० - २०१६०


४१- ६०


मे- जून


४४८० - ५६००


६१- १२०

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कढीपत्ता लागवडीबाबत माहिती

कृषी सुधारणा विधेयकं(MSP) : फायदे व तोटे

_NPK जिवाणू म्हणजे काय?_* *_NPK जीवाणूंचे काम काय ?