कलिंगड पिक व्यवस्थापन
*_🍉कलिंगड पिक व्यवस्थापन 🍉_*
तपशील
शेती पद्धत
*जमीन*
मध्यम काळी, पाण्याचा चांगली निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू ६.५ ते ७ असावा.
*हवामान*
थंड व कोरडे हवामान कलिंगडाला मानवते. साधारणतः कडक उन्हाळा व पावसाळ्याचा काळ सोडला तर वर्षभर कलिंगड लागवड करता येते. वेलीच्या चांगल्या वाढीसाठी २४- २५ अंश सेल्सियस तापमान उपयुक्त असते.
*लागवडीची वेळ*
उन्हाळा: जानेवारी ते मार्च, पावसाळा: जून ते ऑक्टोबर
*सुधारीत वाण*
शुगर बेबी, अर्का माणिक, असाही यामाटो, अर्का ज्योती,
किरण-१, शुगर क्वीन, किरण-२
*बियाणे*
३५०- ४०० ग्रॅम/एकर
*रोपवाटिका*
९८ कप्पे असलेला प्रो ट्रे वापरून कोकोपिट भरुन एका कप्प्यात एक बी पेरावे. कॅप्टन किंवा कार्बेंडाझीम २.५ ग्रॅम/ किलो प्रमाणे बियाणेप्रक्रिया करावी. १६- २४ दिवसात रोपांची पुनर्लागवड करावी.
*लागवडीचे अंतर*
२ x ०.५ मीटर (६० से.मी. रुंद व १५ से.मी. उंच गादीवाफ्यांवर )
*संतुलित खतमात्रा*
एकरी ५ टन शेणखत, २०: २०: २० किलो नत्र, स्फुरद, पालाश प्रति एकरी लागवडीपूर्वी व २० किलो प्रति एकरी नत्र एक महिन्याने द्यावे.
*छाटणी*
वेलीची वाढ एकसारखी होण्यासाठी, पानाचा आकार मोठा, कीड रोगांपासून वेलाची प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी मध्यभागचा शेंडा व अनावश्यक बगल फुटी छाटून टाकाव्यात.
*पाणी व्यवस्थापन*
ठिबक सिंचनासाठी ३० से.मी. अंतरावर एमिटर असलेल्या इनलाईन लॅटरल २ लिटर प्रति तास क्षमतेच्या वापराव्यात. दोन लॅटरलमधील अंतर ७ फुट असावे. फळधारणेनंतर व फळांची वाढ होताना एकसारख्या प्रमाणात पाणी द्यावे. फळे परिपक्वतेवेळी पाण्याचे प्रमाण कमी केल्यास फळामधील साखरेचे व गराचे प्रमाण उत्तम राहते.
*पिक संरक्षण*
*भुरी :* नियंत्रणासाठी ट्रायडेमॉर्फ किंवा कार्बेन्डाझिम १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
*केवडा :* नियंत्रणासाठी २५ ग्रॅम मेटॅलॅक्झिल अधिक मॅंकोझेब
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा