सोयाबीन राखून ठेवा : कृषी विभागाचे आवाहन*

 *💥 सोयाबीन राखून ठेवा : कृषी विभागाचे आवाहन*



🎯 यावर्षी खरीप हंगामात मॉन्सून परतीच्या पावसाने सोयाबिन पिकाचे काढणीच्या अवस्थेत नुकसान झाले असल्यामुळे पुढील खरीप हंगामात सोयाबिन बियाण्यांची टंचाई भासण्याची शक्यता नाकारता येत नाही. 


📍 त्यामुळे पुढील खरीप हंगामात सोयाबिन बियाण्यांची टंचाई भासू नये याकरिता सोयाबिन बियाण्यांचे जतन करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.


💁‍♂️ ज्या शेतकऱ्यांना पुढील वर्षी सोयाबिन लागवड करावयाची आहे, त्यांनी आपल्या गावातच किंवा आपल्या परिसरातील ज्या शेतकऱ्यांनी सोयाबिन राखून ठेवले आहे, त्यांचेकडून आत्ताच सोयाबिन खरेदी करून ठेवावे म्हणजे उत्पादन खर्चात सुद्धा बचत होईल व पुढील हंगामात बियाणे न मिळाल्यामुळे होणारा मनस्ताप टाळता येईल,


👉 त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांकडे ओलीताची सोय आहे व काही प्रमाणात शेत रिकामे असेल अशा शेतकऱ्यांनी १५ जानेवारीपर्यंत अर्धा ते एक एकर क्षेत्रावर फक्त बिजोत्पादनाकरीता सोयाबिनची पेरणी करावी. 


📌 या बिजोत्पादन क्षेत्राची चांगली देखभाल ठेवल्यास खरिपा एवढे नाही पण खरिपाच्या ५० टक्के एवढे नक्कीच चांगले उत्पादन व चांगल्या प्रतीचे बियाणे उत्पादित होऊ शकते. 


💁‍♀️ त्यामुळे अशा शेतकऱ्यांची स्वत:ची व गावातील इशारही शेतकऱ्यांची गरज भागविता येऊ शकते.


🌳 या बाबत वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांनी उन्हाळी सोयाबिन लागवडीचे तंत्रज्ञान विकसित केले असून, या तंत्रज्ञानाप्रमाणे लागवड करता येईल. 


👉 शिवाय उन्हाळी सोयाबिनची उगवण क्षमता चांगली राहते. त्यामुळे खरीप हंगामामध्ये २२ ते २५ किलोच एकरी सोयाबिन पेरणी करिता लागेल व यामुळे सुद्धा उत्पादन खर्चात बचत होईल. सोयाबिन पिकास सुधारित ज्वारी लागवड करणे हा चांगला पर्याय ठरू शकतो. याकरिता पुढील खरीप हंगामामध्ये उशिरा पक्व होणाऱ्या ज्वारीच्या सुधारित वाणाची पेरणी करावी.


💁‍♀️ आज सुधारित ज्वारीचे असलेले बाजारभाव पाहता ज्वारी व कडव्यापासून चांगले उत्पन्न किंबहुना सोयाबिन ऐवढेच उत्पन्न शेतकऱ्यांना मिळू शकते. 


💡 प्रत्येक गावात शेतकऱ्यांनी सामुहिक स्वरूपात ज्वारीची लागवड केल्यास वन्यप्राणी व पक्षांपासून ज्वारी पिकाचे रक्षण करता येऊ शकते. आजकाल बाजारामध्ये नायलॉन दोरीच्या जाळ्या कमी भावात मिळतात, त्यामुळे सामूहिकपणे अशा जाळ्या शेताचे सभोवताली लांबल्यास वन्य प्राण्यांपासून ज्वारीचे रक्षण करता येऊ शकतेे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी केले आहे.


*🎯 कृषी विभागाने केलेल्या सूचना*


💁‍♀️ पुढील खरीप हंगामात सोयाबिन बियाण्यांची टंचाई भासण्याची शक्यता


👉 सोयाबिन बियाण्यांची टंचाई भासू नये याकरिता सोयाबिन बियाण्यांचे जतन करा 


📍गावातच किंवा परिसरातील शेतकऱ्यांकडून आत्ताच सोयाबिन खरेदी करून ठेवा


👨‍🌾 शेतकऱ्यांनी १५ जानेवारी पर्यंत अर्धा ते एक एकर क्षेत्रावर फक्त बिजोत्पादनाकरीता सोयाबिनची पेरणी करा


*वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या तंत्रज्ञाना प्रमाणे लागवड करा*


💥

⚡ *_कृपया ही माहिती शेअर करा ज्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांनाही फायदा होईल...!_*



*_📲 जाहिरातीसाठी संपर्क - 7028767243

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कढीपत्ता लागवडीबाबत माहिती

कृषी सुधारणा विधेयकं(MSP) : फायदे व तोटे

_NPK जिवाणू म्हणजे काय?_* *_NPK जीवाणूंचे काम काय ?