आंबा _मोहोर संरक्षण वेळापत्रक_

 *_🥭आंबा 🥭_*


*_🍇🐓🍅🐄🌾🥦🍉🐛🌶🦗🌹_*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

*_मोहोर संरक्षण वेळापत्रक_*


*_1️⃣फवारणी :_* _पोपटी रंगाच्या पालवीवर मोहोर येण्यापूर्वी, डेल्टामेथ्रीन (२.८ इसी) ०.९ मिलि प्रतिलिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी. या फवारणीमुळे पावसाळ्यानंतर कोवळ्या फुटीवर येणाऱ्या तुडतुड्यांपासून संरक्षण होते._

*_2️⃣फवारणी :_* _बोंगे फुटताना, लॅमडा सायहॅलोथ्रीन (५ इसी) ०.६ मिलि प्रतिलिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी. या फवारणीमध्ये भुरी नियंत्रणासाठी, हेक्झाकोनॅझोल (५ इसी) ०.५ मिलि किंवा सल्फर (८० डब्ल्यूजी) २ ग्रॅम; तसेच ढगाळ, पावसाळी वातावरण असल्यास, करपा नियंत्रणासाठी कार्बेन्डाझीम + मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी प्रमाणे मिसळून फवारावे._

*_3️⃣फवारणी :_* _दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी, इमिडाक्लोप्रीड (१७.८ एसएल) ०.३ मिलि प्रतिलिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी तिसऱ्या चौथ्या पाचव्या फवारणीवेळी कीटकनाशक द्रावणामध्ये भुरी नियंत्रणासाठी, हेक्झाकोनॅझोल (५ इसी) ०.५ मिलि प्रतिलिटर पाणी प्रमाणे मिसळून वापरावे. हेक्झाकोनॅझोल उपलब्ध नसल्यास सल्फर (८० डब्ल्यूजी) २ ग्रॅम तसेच ढगाळ, पावसाळी वातावरण असल्यास, करपा नियंत्रणासाठी कार्बेन्डाझीम + मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी प्रमाणे मिसळून फवारावे._

*_4️⃣फवारणी :_* _तिसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी, थायमेथोक्झाम (२५ डब्ल्यूजी) ०.१ ग्रॅम प्रतिलिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी._

*_5️⃣फवारणी :_* _चौथ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी, डायमेथोएट (३० इसी) १ मिलि किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन (५ इसी) ०.६ मिलि प्रतिलिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी._

*_6️⃣फवारणी :_* _पाचव्या फवारणीनंतर १५ दिवसांनी, (तुडतुड्यांचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीवर असल्यास) पाचव्या फवारणीसाठी सुचविलेल्या कीटकनाशकांपैकी न वापरलेल्या कीटकनाशकाची फवारणी करावी._

*_┅●◑◑▣◆★✹❂✺✧✺❂✹★◆▣◑◑●┅_*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कढीपत्ता लागवडीबाबत माहिती

कृषी सुधारणा विधेयकं(MSP) : फायदे व तोटे

_NPK जिवाणू म्हणजे काय?_* *_NPK जीवाणूंचे काम काय ?