जाणून घ्या फळधारणा न होण्याची कारणे

 *_🌳जाणून घ्या फळधारणा न होण्याची कारणे_*


*_🍇🐓🐟🍅🐄🌾🥦🍉🐛🌶🦗🌹_*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*

_फळझाडांचे उत्पादन हे फूल व फळधारणेवर अवलंबून असते. फळबागांची या अवस्थेमध्ये काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. फळधारणा न होण्यामागील कारणे जाणून घेऊन ती टाळल्यास फळबागेतून चांगले उत्पादन मिळविणे शक्य होते.


_अलीकडे अनेक फळझाडांमध्ये फळधारणा न होण्याची समस्या दिसून येते. एखाद्या झाडाची शाखीय वाढ चांगली होत असली तरी त्याला फळे येत नाहीत. फळबागेमध्ये अशा फळे न देणाऱ्या झाडांची संख्या वाढल्यास उत्पादनामध्ये घट होते. परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये मोठी घट होऊन फळबाग न परवडण्याची स्थिती निर्माण होते.


*_फळधारणा न होण्याची कारणे :_*

_◆शाकीय वाढ व पुनरुत्पादन याचा समतोल बिघडणे: फळझाडांमध्ये शाकीय वाढ आणि पुनरुत्पादनासाठी आवश्यक त्या क्रिया सुरू होण्याची प्रक्रिया यामध्ये समतोल बिघडल्यास फुले न लागणे, कमी प्रमाणामध्ये फळ सेटिंग होणे या बाबी दिसून येतात. त्याचा विपरीत परिणाम हा फलधारणा कमी किंवा न होण्यामध्ये होतो.

_◆झाडाच्या क्षमतेपेक्षा चालू वर्षी जास्त उत्पादन घेणे: एखाद्या वर्षी झाडाच्या क्षमतेपेक्षा जास्त उत्पादन घेतल्यास, दुसऱ्या वर्षी फळधारणेचे प्रमाण कमी होते किंवा होत नाही.


*_वंधत्व :_* _अनुवांशिकरीत्या वंधत्व असलेल्या झाडांना फळे येत नाहीत.


*_फळधारणेवर परिणाम करणारे मुख्य घटक_*


*_हवामानाशी संबंधित बाह्य घटक_*


*_हंगाम :_* _फळझाडांची लागवड कोणत्या हंगामात केली आहे, यावरूनही त्यांच्यात फळधारणा होणे ठरत असते. उदा. आंबा.

*_तापमान :_* _तापमान हे फळपिकाच्या फूल व फळ धारणेवर विविध प्रकारे परिणाम करते. तापमान शून्य अंशापेक्षा कमी झाल्यास, फुलकळ्या मरून जातात, परागकणाची जगण्याची क्षमता कमी होते. उदा. एप्रिल ते मे महिन्यामध्ये तापमानात वाढ झाल्यामुळे संत्रा पिकामध्ये फुले गळणे व सेटिंग झालेली फळे गळणे ही समस्या उद्भवते. तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त किंवा अतिशय कमी झाल्यास मधमाश्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊन परागीभवन घटते. फलधारणा कमी होते.

*_हवेतील आर्द्रता :_* _फुलोरा अवस्थेमध्ये अवकाळी पाऊस आल्यास त्याचा विपरीत परिणाम परागीभवन व पराग अंकुरण्यावर होतो.

*_प्रकाश :_* _प्रकाश हा वनस्पतीमधील अन्न तयार करण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. फळझाडावर सूर्यप्रकाश व्यवस्थित पडत नसल्यास वनस्पतीतील कर्बोदकांची निर्मिती कमी होते. परिणामी फूल व फळधारणा कमी प्रमाणात होते. फळझाडामध्ये दाट कॅनोपी (पानांची संख्या जास्त) ठेवल्यास खालील पानांपर्यंत सूर्यप्रकाश योग्य प्रमाणात पोचत नाही. परिणामी अकार्यक्षम पाने झाडाला पोसावी लागतात. त्याचा विपरीत परीणाम फळधारणेवरही होतो. फळगळीचे प्रमाण वाढते.

*_वारा :_* _परागीभवनासाठी वारा गरजेचा आहे. मात्र, प्रमाणापेक्षा जास्त वारा असल्यास फुलांमधील गर्भधारणेसाठी आवश्यक घटकांना इजा पोचते. परिणामी फलधारणा कमी होते.


*_झाडाशी संबंधित बाह्य घटक :_*


*_◆झाडवाढीचा जोम :_* _झाडाची वाढ समतोल होणे गरजेचे असते. अन्यथा केवळ शाकीय वाढ वेगाने झाल्याने फळधारणेवर विपरीत परीणाम होतो. संतुलित वाढीमुळे झाड समान फलधारणा करते व फळाचा संपूर्ण भार पेलू शकते.

*_◆जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण :_* _झाडाच्या वाढीमध्ये जमिनीतील नत्र, स्फुरद व पालाश या मुख्य अन्नद्रव्य घटकांचा समतोल आवश्यक असतो. तो बिघडल्यास फळधारणा होत नाही.

*_◆कलम :_* _कलमीकरणाची प्रक्रिया योग्य न झाल्यास फलोत्पादनावर परिणाम होतो. उदा. एकसारखी कलम काडी किंवा खुंटरोप न वापरणे.

*_◆छाटणी :_* _झाडांची छाटणी अतिशय महत्त्वाची असते. छाटणीचे प्रमाण, वेळ योग्य असावी लागते. त्यासाठी हवामानातील घटकांचा विचार करणे आवश्यक असते. चुकीच्या छाटणीमुळे झाडांमधील संतुलन बिघडल्यास शाकीय वाढ जास्त होऊन, फूल व फळधारणेचे प्रमाण कमी होते.


*_वनस्पतीमधील अंतर्गत घटक :_*

_◆उत्क्रांती प्रवृत्तीमध्ये झाडाच्या जाती व प्रजातीमध्ये अनेक घटक कार्यरत असतात. त्या प्रक्रियेमध्ये खालीलपैकी एखादी क्रिया विकृती निर्माण झाल्यास फळधारणा होण्यामध्ये अडचणी येतात.

*_◆फूल गर्भपात होणे :_* _मादी आणि नर भाग तयार होत असताना अडथळे येतात. गर्भधारणेशी संबंधित भाग अर्धवट विकसित झाल्यास फलधारणा अल्प प्रमाणात किंवा अजिबात न होणे. स्त्रीकेसरातील अडचणीमुळे डाळिंबाला फळधारणा होत नाही.

*_◆अकार्यक्षम परागकण :_* _काही वेळेस फुलांमधील परागकण अकार्यक्षम असतात किंवा ते लगेचच मरतात. उदा. मुस्कडाईन जातीच्या द्राक्षामध्ये असे अकार्यक्षम परागकण असल्यामुळे फलधारणा होत नाही.

*_◆वंध्यत्व :_* _काही फळझाडामध्ये विशिष्ट प्रकारच्या अनुवांशिक घटकामुळे साधारणतः पराग, मादीमधील अंडाशय, गर्भ, भ्रूणकोष तयार होत नाहीत. परिणामी फळ धारणा होत नाही. बाह्य वंध्यत्व हे प्रथमतः अंडाशयाचा गर्भपात झाल्यामुळे होते.

*_◆परागनलिकाची मंद वाढ :_* _वातावरणातील बदल, अन्नद्रव्यांचा असमतोल व संप्रेरकातील बदल यामुळे परागनलिकेची वाढ मंद होते.


*_फळगळचे नेमके कारण जाणून करा योग्य उपाययोजना_*

_एकूण फळागळीमध्ये ७० ते ८० टक्के फळे ही वनस्पतीमधील आंतरीक बदलांमुळे तर ८ ते १७ टक्के फळगळ ही कीटकांमुळे होते. ८ ते १० टक्के फळे ही विविध रोगकारकांमुळे गळून पडतात. मृग व आंबिया या दोन बहारापैकी अंबिया बहारात सर्वाधीक फळ गळ दिसून येते. फळगळचे नेमके कारण शोधून त्यानुसार उपाययोजना कराव्यात.


_फळगळीची प्रामुख्याने वनस्पतीशास्त्रीय आंतरीक बदल, किडी आणि रोग ही तीन कारणे आहेत.


*_वनस्पतीशास्त्रीय आंतरीक बदलांमुळे होणारी फळगळ_*

_◆फळधारणेनंतर होणारी बरीचशी फळगळ प्रामुख्याने या कारणामुळे होते. साधारणत: फळ ०.५ ते २.० सेंमी व्यासाची असण्याच्या म्हणजे वाढीच्या स्थितीत पाणी, कर्बोदके व संजीवके यासाठी स्पर्धा वाढते. त्यात पाणी किंवा उच्च तापमानाचा ताण असल्यास गळ वाढते. याउलट रोग किंवा यांत्रिक जखम, कार्बन-नत्राचे असंतुलन, अन्नद्रव्यांची कमतरता, पाण्याचा अभाव, अति आर्द्रता किंवा जमिनीत असणारा जास्त ओलावा या कारणांमुळे फळगळ वाढते. फळांच्या योग्य वाढीसाठी झाडावर पुरेशी पालवी (एका फळांसाठी साधारण ४० पाने हे प्रमाण) असावी.

_◆वातावरणातील तापमान हा घटकसुद्धा फळगळीसाठी कारणीभूत असतो. कमी तापमानात फळगळ कमी असते तर उच्च तापमानात फळगळ अधिक दिसून येते.

_◆खोल काळ्या भारी जमिनीमध्ये लागवड केलेली असल्यास पाण्याचा निचरा न होण्यामुळे पाणी साचून राहते. जमिनीतील हवा व पाणी यांचे संतुलन बिघडते. श्वसन क्रियेकरिता जमिनीत १० टक्के प्राणवायू आवश्यक आहे. अन्नद्रव्ये जमिनीतून घेण्याची क्रिया थांबते व तंतुमय मुळे सडतात. फुलगळ, फळगळ व पाने पिवळी पडणे, पानगळ होणे, पानाचा आकार लहान राहणे, शेंड्याकडून फांद्या वाळणे, सल येणे अशा लक्षणांसह फळगळ आढळते. पावसाळ्यात कधी कधी पाण्याची पातळी १ मीटरपर्यंत येते, परिणामी झाडांची मुळे कुजतात.

_◆जमिनीतील चुनखडीचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास पाणी झिरपण्याची क्रिया मंदावते. परिणामी प्राणवायूचे प्रमाण कमी होते. स्फुरद, झिंक, मग्नेशियम, फेरस, बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्याची उपलब्धता कमी होते. रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. मुळे सडतात. अनेक वेळा झाड आपोआप दगावते.


*_फळगळ रोखण्यासाठी उपाययोजना_*

_◆फळधारणा होण्याच्या कालावधीत बागेची खोल मशागत करू नये. खोल मशागतीमुळे- झाडांची मुळे तुटतात, जमिनीची जलधारणशक्ती वाढते, निचरा होत नाही. परिणामी फळगळ होते.

_◆वाढणाऱ्या फळांचे पुरेसे पोषण होण्यासाठी झाडावर भरपूर पालवी असावी. यासाठी शिफारसीनुसार खतांचा वापर करावा. झाडावर पुरेसे पाने असल्यावरच फवारणीचा अपेक्षित परिणाम होतो.

_◆जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ उदा. ४० ते ५० किलो शेणखत, ७.५ किलो निंबोळी ढेप वापरावी. शेणखतासोबत ट्रायकोडर्मा १०० ग्रॅम, पीएसबी १०० ग्रॅम, सुडोमोनास १०० ग्रॅम ॲझोटोबॅक्टर १०० ग्रॅम प्रति झाड यांचे मिश्रण झाडाच्या परिघामध्ये टाकावे.

_◆रासायनिक खतासोबत झिंक सल्फेट २०० ग्रॅम, बोरॅक्स २५० ग्रॅम मातीत मिसळून द्यावे.

_◆ही खते फवारणीद्वारे द्यावयाची असल्यास झिंक सल्फेट ०.५ टक्के व बोरॉन ०.१ टक्के फवारणी आंबिया फळाकरिता जुलै-ऑगस्ट महिन्यात आणि मृग बहाराच्या फळाकरिता ऑक्टोबर - नोव्हेंबर मध्ये करावी.

_◆अंबिया बहारात झाडाला पाण्याचा ताण बसू देऊ नये. फळांच्या योग्य वाढीसाठी पाण्याचा पुरेसा पुरवठा करावा.

_◆पावसाळ्यात बागेत शक्यतो पाणी साचू देऊ नये. पाण्याचा निचरा योग्य रीतीने होण्यासाठी उताराच्या दिशेने चर खोदावेत.

_◆वेळोवेळी गळून पडलेली फळे ताबडतोब उचलून बागेबाहेर बाहेर कंपोस्ट खड्ड्यात पुरून टाकावीत.

_◆एनएए १० पीपीएम (१ ग्रॅम) किंवा जिब्रेलिक ॲसिड १५ पीपीएम (१.५ ग्रॅम) किंवा २-४-डी १५ पीपीएम (१.५ ग्रॅम) यापैकी एका संजिवकासह युरिया १ टक्का (१ किलो) अधिक कार्बेन्डाझिम ०.०१ टक्के (१०० ग्रॅम) प्रति १०० लिटर पाणी या द्रावणाची फवारणी करावी.

_◆फळे काढणी केल्यावर झाडावरील सल काढावी. सल काढताना फांदीचा हिरवा भाग ५ सेंमी पर्यंत घेऊन सल काढावी. प्रत्येक वेळी सल काढणाऱ्या अवजाराचे निर्जंकिरण करावे. सल काढलेल्या झाडावर बुरशीनाशकाची फवारणी करावी.

_◆अन्नद्रव्यांचा समतोल वापर करावा. अनेकवेळा बोरॉन कमतरतेमुळे मोठी फळे गळतात. या करिता एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे. अधिक व दर्जेदार उत्पादनाकरिता दहा वर्षांवरील झाडाकरिता शिफारसीत मात्रा ५० किलो शेणखत, ७.५ किलो निंबोळी ढेप ८०० ग्रॅम, नत्र ३०० ग्रॅम, स्फुरद ६०० ग्रॅम पालाश प्रति झाड यासह ५०० ग्रॅम व्हॅम, १०० ग्रॅम स्फुरद विरघळवणारे जिवाणू, १०० ग्रॅम ॲझोस्पिरीलम, १०० ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति झाड देण्यात यावे. नत्र हा अमोनियम सल्फेटद्वारे द्यावा.

_◆आंतरपीक घेतांना हिरवळीचे, मूग व उडीद तत्सम पिके घ्यावीत. कपाशी सारखे पीक घेऊ नये.

_◆सतत पावसाचे पाणी साचून राहल्यास व अतिशय आर्द्रतायुक्त परिस्थितीत फळगळ होत असतांना बागेमध्ये तणनाशकाचा वापर टाळावा.

_◆वाफ्याद्वारे पाणी देताना उखरी करताना झाडाच्या मुळ्या तुटणार नाहीत याची काळजी घ्यावी. उखरीनंतर कॉपर ऑक्सिक्लोराईड ३ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा ट्रायकोडर्मा द्रावण वाफ्यात ओतावे. ठिबकद्वारे सिंचन करणाऱ्या बागेत उखरीची आवश्यकता भासत नाही.

_◆वर्षभरात किमान दोन वेळा बोर्डो पेस्ट (१:१:१० या प्रमाणात चुना, मोरचूद व पाणी घेऊन) पावसाळ्याच्या अगोदर व पावसाळ्यानंतर लावणे अत्यंत आवश्यक आहे.

_◆अन्य सर्व फळ पिकांमध्ये फळगळ रोखण्याकरिता पीक उत्तेजकांची शिफारस केली जाते. शिफारशीनुसार त्यांचा वापर करावा.

_◆फळगळ होऊ नये याकरिता बाग सशक्त तसेच रोगमुक्त ठेवणे. रोग आल्यास रोगाचे त्वरित व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.


*_किडींमुळे होणारी फळगळ रोखण्याकरिता उपाययोजना*

_◆लिंबूवर्गीय फळझाडांमध्ये प्रामुख्याने रसशोषक पतंग, फळमाशी, सिट्रस सिल्ला व कोळी या किडींमुळे फळगळ दिसून येते. त्यातही फळमाशी व रसशोषक पतंगामुळे सर्वाधिक फळगळ आढळून येते. ही फळगळ सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात दिसून येते.

_◆फुले येते वेळी सिट्रस सिला या किडीचा प्रादुर्भाव होतो. तो टाळण्यासाठी डायमेथोएट २ मिली किंवा इमिडाक्लोप्रीड ०.५ मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणे १५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.

_◆रसशोषक पतंगाकरिता विषारी आमिषे तयार करुन बागेत ठेवावीत. या करीता मॅलॅथिऑन २० ग्रॅम अधिक गुळ २०० ग्रॅम किंवा खाली पडलेल्या फळांचा रस २ लिटर पाण्यात मिसळून आमिष तयार करावे. रुंद तोंडाच्या दोन बाटल्यात वरील मिश्रण टाकून प्रत्येक २५ ते ३० झाडांमध्ये १ या प्रमाणात ठेवावे.

_◆फळमाशीच्या नरांना आकर्षित करण्यासाठी फळमाशी सापळे प्रती हेक्टरी २५ या प्रमाणात तोडणीच्या साधारण २ महिने आधीपासून बागेत झाडांवर टांगून ठेवावेत.

_◆बागेत १ दिवसाआड सायंकाळी ७ ते रात्री १० च्या दरम्यान ओलसर गवत पेटवून व त्यावर कडूलिंबाच्या ओल्या फांद्या/पाने ठेवून धूर करावा.


*_रोगांमुळे होणारी फळगळ रोखण्याकरिता_*

_प्रामुख्याने कोलेटोट्रीकम ग्लोईओस्पोरिऑईडस, बोट्रीओडिप्लोडिआ थिओब्रोमी व काही अंशी अल्टरनेरिया सिट्री या बुरशीमुळे फळगळ होते.

_कॉपर ऑक्सिक्लोराईड ३ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे १ महिन्याच्या अंतराने जुलैपासून ३ फवारण्या कराव्यात.

_काढलेली सल बागेत न ठेवता तिचा नायनाट करावा.                                           धन्यवाद ।

*_┅┅●◑◑▣◆★✹❂✺✧✺❂✹★◆▣◑◑●┅┅_*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कढीपत्ता लागवडीबाबत माहिती

कृषी सुधारणा विधेयकं(MSP) : फायदे व तोटे

_NPK जिवाणू म्हणजे काय?_* *_NPK जीवाणूंचे काम काय ?