सुधारित अवजारे करतात कष्ट कमी

 *🌾सुधारित अवजारे करतात कष्ट कमी🌾*


*_🍇🐓🐟🍅🐄🌾🥦🍉🐛🌶🦗🌹_*

*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*


*वैभव विळा :*

◆गहू, ज्वारी, गवत कापणी जमिनीलगत करता येते.

◆दातेरी पत्यामुळे या विळ्याला धार लावायची गरज नाही.

◆वजनास हलका आणि अधिक चांगली पकड असून समतोल साधून सहज कापणी होते.

◆एका तासामध्ये २ गुंठ्याची कापणी करता येते.


*भेंडी तोडणी कात्री :*

◆भेंडीच्या देठावर एक प्रकारची लव असते. भेंडी काढताना तळहात आणि बोटांना त्यामुळे इजा होते.

◆भेंडी काढण्याण्यासाठी कात्री विकसित झाली आहे. कात्रीचा उपयोग केल्यास हातांना त्रास होत नाही.

◆एका मजुराद्वारे दिवसाला ५० ते ६० किलो भेंडी सहजपणे काढता येते. भेंडी काढण्याचा खर्च कमी होतो.


*भुईमूग शेंगा तोडणी चौकट*

◆यामध्ये २x१x१ आकाराची चौकट असून, त्यावर उलट्या व्ही आकाराचे दाते लावले आहेत.

◆शेंगा तोडण्यासाठी लागणारी मजूर शक्ती व वेळ यांची बचत होते. एकाच वेळी या शेंगा तोडणी चौकटीवर चार स्री मजूरकाम करू शकतात.

◆शेंगा तोडणीची क्रिया शेंगासाहित असलेल्या वेलाला तोडणी चौकटीवर ओढताना मारा देऊन केली जाते. यामध्ये शेंगा फुटण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

◆हाताने शेंगा तोडण्यापेक्षा जवळ जवळ चारपट शेंगा तोडणी जास्त होते.साधारणपणे हाताने शेंगा तोडताना एक स्त्री मजूर ३० ते ३५ किलो शेंगा एका तासात तोडते.तीच स्री मजूर शेंगा तोडणी चौकटीच्या साहाय्याने १२० ते १३० किलो शेंगा एका तासात तोडते.

◆हे अवजार परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केले आहे.


*भुईमूग शेंगा फोडणी यंत्र :*

◆एका तासात एक मजूर सरासरी ५० ते ६० किलो शेंगा सहजपणे आणि जास्त श्रम न करता फोडू शकतो.

◆शेंगा फोडण्याचा वेग वाढल्यामुळे शेंगा वेळेत फोडून होतात, त्यामुळे वेळ,श्रम,पैसा वाचतो.

◆यंत्राने शेंगा फोडल्यास ६ ते ८ टक्के फूट होते. मात्र फुटीचे दाणे खाण्यायोग्य असतात.

◆यंत्रातून निघालेले पूर्ण शेंगदाणे बियाणे म्हणून वापरता येतात.


*मका सोळणी यंत्र :*

◆यंत्राची रचना अगदी साधी असल्यामुळे उपलब्ध साधनसामग्रीतून खेड्यातील कारागीर हे यंत्र तयार करू शकतो.

◆आकाराने लहान व वजनाने हलके, त्यामुळे हातात सहजपणे आणि जास्त श्रम न पडता धरता येते.

◆आठ तासांत साधारणपणे दोनशे किलो वाळलेली कणसे सोलून होतात.

◆लहान प्रमाणावर मका सोलण्यासाठी फार उपयोगी, श्रम कमी करणारे आणि वेळेची बचत करणारे हे यंत्र आहे.


*दातेरी हात कोळपे :*

◆पिकाच्या दोन ओळींत निंदणी करण्यासाठी उपयुक्त.

◆मजुराला उभ्याने कोळपे दोन्ही हातांनी मागे पुढे ढकलून चालविता येते. त्यामुळे कामाचा शीण कमी होतो व मजुराची कार्यक्षमता, उत्साह टिकून काम वेगाने होते.

◆कोळप्याचे पाते १५ सें.मी.लांबीचे असते. त्यामुळे दोन ओळींत १५ सें.मी.पेक्षा जास्त अंतर असलेल्या पिकांमध्ये या कोळप्याने निंदणी, खुरपणी करता येते.

◆कोळप्यामुळे साधारणपणे ३ सें.मी. खोलीपर्यंत जमिनीची खुरपणी होते. सर्व प्रकारच्या पिकात आणि सर्व प्रकारच्या हलक्या, मध्यम तसेच भारी जमिनीत कोळपेसारख्या क्षमतेने वापरता येते.

◆हातकोळप्याचे वजन ७ किलो असल्याने सहज उचलून नेता येते. एक मजूर दिवसाकाठी ०.२ हेक्टर क्षेत्राची निंदणी-खुरपणी करू शकतो.


*सायकल कोळपे :*

◆या यंत्राचा उपयोग १५ सें.मी.पेक्षा जास्त अंतर असलेल्या पिकात कोळपणी, निंदणी, खुरपणी करण्याकरता होतो.

◆५ ते ७ सें.मी.पर्यंत जमिनीत खुरपणी करता येते.

◆एक मजूर दिवसाकाठी ०.२ हेक्टर क्षेत्राची निंदणी, खुरपणी सहजपणे करू शकतो.


*नवीन टोकण यंत्र :*

◆हे एक मनुष्यचलित यंत्र असून मध्यम आकाराच्या बियाणे पेरणीसाठी वापरले जाते.

◆कमी क्षेत्र व डोंगराळ भागात सोयाबीन, ज्वारी, मका, इ. पिकाच्या पेरणीसाठी वापरता जाते.


*चक्रीय टोकण यंत्र :*

◆हे एक मनुष्यचलित यंत्र असून सायकल कोळप्याप्रमाणे पुढे ढकलून चालवले जाते.

ंत्रा यंत्राचा माहेरचा आकार आणि उदा. सोयाबीन, ज्वारी, मका, मूग इ. पेरणी सांगितले.


* बियाणे टोकल बी टोकन यंत्र: *

◆◆ूसूस............................................................................................................................................................................................................................................................................................. प्रत्येक प्रवास बी टोकला वाकावे. सदर पिकाची पेरणी २-३ तास ​​काम करणे अशक्यप्राय असते. या श्रद्धा, जसे की प्रत्येक स्पर्धेत वाकावे प्रक्रियेचा कार्यक्रम आवश्यक असतो; जगाचा वर्षाचा वेळ कमी.

◆ बियाणे टोकन यंत्रणा खर्च टोकन विचार वाकावे खर्च नाही. चालता चालण्यासारखी राहण्याची सोय. आमच्या लग्नातील श्रम आणि थकवा कमी वेळ ग्रंथाची कार्यक्षमता.

वापर यंत्रणेत बसवणे आरामदायक आहे

◆ बियाणे एकसमान क्लेव्हर टोकटा. कोरप वा वाफसा स्टेट ग्रोथ टोकन मे.

ंत्रा यंत्रण बियाणे तपासणी पिशूट बियाणे ठेवणे. पिशवी घटना बांधला.

ंत्रा यंत्राची पाईपची लांबी १०० सेंमी. व्यास १ सेंमी. इतका आहे.

ंत्रा यंत्राच्या बाजूस बिन्या घेऊन नरसाचा आकार फक्त एब्ला आहे, जेनेक आत्मविश्वास दूर होण्यासारखे आहे.

◆ टोकन यंत्रालादिल्ली साहित्याचा यंत्रणा खालचे स्थान आणि बंदिस्त स्थान, तुमच्या खाली बियाणे वाढणार टोकले.


* _┅┅ ● ◑◑▣ ◆ ★ ★ ◆ ▣◑◑ ● ┅┅_ *

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कढीपत्ता लागवडीबाबत माहिती

कृषी सुधारणा विधेयकं(MSP) : फायदे व तोटे

_NPK जिवाणू म्हणजे काय?_* *_NPK जीवाणूंचे काम काय ?