थंडीतील कलिंगड पिकातील फळ सेटिंग समश्या व त्यावरील उपाय
*_🍉थंडीतील कलिंगड पिकातील फळ सेटिंग समश्या व त्यावरील उपाय🍉_*
*_🍇🐓🐟🍅🐄🌾🥦🍉🐛🌶🦗🌹_*
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
_◆कलिंगड पिकांत नर व मादी फुले असतात.नर फुले परागीकन तयार करतात तर मादी फुले फळे तयार करतात.साधारणतः रोपे लागवडीनंतर २० ते २५ दिवसानंतर नर फुले वेलीवर दिसतात.प्रत्येक पेऱ्यावर एक नर फुल असते व अस्या साधारणतः सात फुलानंतर मादी फुल लागते._
_◆परागीभवन होऊन फळ तयार होण्यासाठी नर फुलातील परागीकन मादी फुलावर येणे गरजेचे असते कलिंगड पिकातील नर फुलातील परागकण हे थोडेसे चिकट असतात त्यामुळे त्यांचे वहन वाऱ्यामुळे होत नाही व त्यासाठी मदमाशी किंवा इतर माश्याची गरज असते._
_◆मधमाशी थंडीच्या दिवसात कमी प्रमाणात सक्रीय असतात व तापमान १३ डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी झाल्यास त्या बाहेर पडत नाहीत._
_◆जर योग्य प्रकारे परागीभवन झाले नाही तर खालीलप्रमाणे नुकसान होते._
*१)* _परागीभवन झाले नाही तर फळ पिवळे पडून गळून जाते._
*२)* _कमी परागीभवन झाल्यास फळाचा आकार चंबूसारखा होतो व फळ आकाराने लहान मिळते._
*३)* _फळ तयार झाल्यानंतर आतमध्ये पांढरा रंग येतो._
*४)* _कमी फळ सेटिंग झाल्यामुळे उत्पन्न कमी मिळते._
*_📌उपाय_*
_◆प्रोटेकटंट पी, हे मधमाशी आकर्षित करणारे औषध 4 ग्राम प्रति ली प्रमाणे निवळी तयार करून आठवड्यात 2 वेळा फवारणी करावी._
_◆कलिंगडाचे फुल फक्त एकच दिवस आपले फुल उघडे ठेवते त्यामुळे ते त्याच दिवशी परागीभवन होणे गरजेचे असते.पूर्णपणे परागीभवन होण्यासाठी मधमाशी किमान सात वेळा त्या फुलावर येणे गरजेचे असते._
_◆कलिंगडाचे फुल साधारणतः सूर्योदयानंतर उमलते व दुपारी १२ वाजेनंतर ती फुले मिटलेली दिसतात. त्यामुळे सकाळचीच वेळ हि परागीभवनासाठी योग्य असते. त्यामुळे सकाळी किंवा दुपारी कुठल्याही प्रकारची फवारणी टाळावी._। धन्यवाद ।
*_┅┅●◑◑▣◆★✹❂✺✧✺❂✹★◆▣◑◑●┅┅_*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा