बटाटा पीक व्यवस्थापन

 *बटाटा पीक व्यवस्थापन*


बटाटा पिकाचे लागवड पुणे, सातारा, नाशिक, अहमदनगर, बीड, औरंगाबाद आणि नागपूर या जिल्ह्यात केली जाते. बटाट्यामध्ये प्रथिने, चुना, फाँस्फरस या सारखी खनिजे, ब आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. बटाट्याचा उपयोग खाद्य पदार्थाशिवाय अनेक उद्योगधंद्यात मोठ्या प्रमाणात होतो.


हवामान


बटाटा हे थंड हवामानातील पिक आहे. या पिकास सरासरी १६ ते २१ सेल्सिअस तापमान लागते. पिकाच्या सुरवातीच्या काळात २४ सेल्सिअस पोषक असून बटाटे पोसण्याच्या काळात २० सेल्सिअस तापमान अनुकूल असते. बटाटे लागवडीच्या वेळी उष्ण हवामान व बटाटे पोसण्याचे वेळी थंड हवामान या पिकास पोषक असते.


जमीन


मध्यम ते हलक्या गाळाच्या जमिनीत बटाट्याची लागवड चांगल्या रीतीने करता येते. जमीन कसदार भुसभुशीत व उत्तम निचऱ्याची असावी. जमिनीचा सामू ६ ते ८ च्या दरम्यान असावा.


पूर्वमशागत


जमीन नांगरानी २० ते २५ सेंमी नांगरावी. १ महिनाभर जमिनीस उन्हाची ताप द्यावी. पुन्हा १ आडवी नांगरणी करावी. ढेकळे फोडण्यासाठी व जमीन समपातळीत आणण्यासाठी कुळवाच्या दोन तीन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी, जमिनीत हेक्टरी ५० गाड्या चांगले कुजलेले शेणखत पसरावे.


लागवडीचा हंगाम


बटाट्याची लागवड खरीप हंगामात जून, जुलै महिन्यात करतात व रब्बी हंगामात ऑक्टोंबर, नोव्हेंबर महिन्यात करतात.


वाण


कुफरी लवकर – ही ६५ ते ८० दिवसात तयार होणारी जात असून खरीप व रब्बी हंगामात घेतली जाते. या जातीचे बटाटे पांढरे शुभ्र आकर्षक व मोठे असतात. या जातीचा बटाटा साठवणुकीत चांगला टिकतो. हेक्टरी उत्पादन २०० ते २५० क्विंटल असते.


कुफरी चंद्रमुखी – ही जात ९० ते १०० दिवसात तयार होते. या जातीचे बटाटे लांबट गोल व फिकट पांढरे असतात. साठवणुकीस ही जात उत्तम आहे. हेक्टरी उत्पादन २५० क्विंटल पर्यंत मिळते.


कुफरी सिंदुरी – ही जात १२० ते १३५ दिवसात तयार होते. या जातीचा रंग फिकट तांबडा असून बटाटे मध्यम व गोल आकारचे असतात. ही जात साठवणुकीस उत्तम आहे. हेक्टरी उत्पादन ३०० क्विंटल पर्यंत मिळते.


या शिवाय कुफरी बादशाह, कुफरी कुबेर, कुफरी ज्योती, अलंकार, कुफरी चमत्कार या जाती लागवडीस योग्य आहेत.


बियाणाचे प्रमाण


बियाणे उत्तम दर्जाचे असावे. हेक्टरी १५ ते २० क्विंटल बियाणे लागवडीस पुरेसे असते. लागवडीपूर्वी बियाणे *सुदर्शन* ३० ग्रॅम आणि बविस्टीन १० ग्रॅम १० लिटर पाण्यात ५ मिनिटे बुडवून व नंतर लागवडीसाठी वापरावी.


लागवड


सरासरी बेण्याचे वजन जास्तीत जास्त २५ ते ३० ग्रॅम असावे. बेण्याचा आकार म्ध्याम असून बटाट्याचे आकारमानानुसार दोन ओळीतील अंतर ४५ ते ६० सेंमी आणि दोन बियांमधील अंतर १५ ते २० सेंमी ठेवावे. ट्रँक्टरच्या सह्हायाने सरी वरंबापद्धतीने लागवड करावी.


खते व पाणी व्यवस्थापन


बटाटा पिकास लागवडीपूर्वी हेक्टरी १०० किलो नत्र, ६० किलो पालाशाची आवश्यकता असते. लागवडीनंतर १ महिन्याने ५० किलो प्रती हेक्टर नत्र खताची दुसरी मात्रा द्यावी. बटाट्याची मुळे जमिनीत वरच्या थरात वाढत असल्यामुळे या पिकास पाण्याच्या पातळीच्या वेळेस कमी पाणी द्यावे. लागवडीनंतर पहिले पाणी हलके द्यावे. जमिनीला लगतच्या फांद्या वाढून त्यांची टोके फुगीर होऊ लागल्यावर व बटाटा पोसण्याच्या वेळेस ६ ते ८ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पिकाची वाढ पूर्ण झाल्यावर पाण्याच्या पाळ्या कमी कराव्यात.

*सम्राट प्लस/अंकुश/सुदर्शन/स्फूर्ती/सोना प्लस/सुपर पॉवर/संग्राम ड्रीप/प्रिन्स/संग्राम/संग्राम लिक्वीड सिलिकॉन* ह्या जैविक औषधांच्या वेळोवेळी फवारण्या कराव्यात ज्यामुळे उत्पादन वाढते.


आंतरमशागत


बटाट्याच्या आंतरमशागतीत तण काढणे व खुरपणी या बरोबर भर देणे हे महत्वाचे काम आहे. तीन चार वेळा खुरपणी करून जमीन भुशभूशित ठेवावी. खताचा दुसरा हप्ता देताना झाडांना मातीची भर द्यावी.


रोग व कीड

रोग


करपा – पानवर काळे ठिपके पडून पाने गळतात. बटाट्यावर खोलगट चट्टे पडतात.


उपाय


डायथेनएम ३० ग्रॅम आणि *सुदर्शन* २० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.


मर – मोठी झाडे पिवळी व मलूल दिसतात. बुंध्याजवळ जमिनीलगतच्या भागावर बुरशीची वाढ झालेली दिसते.


उपाय


पिकांची फेरपालट आणि नियमित पाण्याच्या पाळ्या देऊन रोग आटोक्यात आणता येतो. जमिनीत नँप्थलीन आणि *सुदर्शन* मिसळून दिल्यास रोगाचे बीज मरते.


चारकोल राँट किंवा खोक्या रोग – या रोगाचा प्रसार जमिनीतून होतो. जमिनीचे तापमान ३२ सेल्सिअस पेक्षा अधिक असल्यास ते रोगजतूना पोषक ठरते. या रोगामुळे साठवणीतील बटाटे नासतात.


उपाय


जमिनीचे तापमान ३२ सेल्सिअस च्या वर चढण्यापूर्वी बटाट्याची काढणी करावी किंवा पाणी देऊन जमिनीचे तापमान कमी ठेवावे.


कीड


देठ कुडतरणारी अळी – राखी रंगाची अळी असून रात्रीचे वेळी खोडाजवळील भाग कुरतडतात. पाने व कोवळे देठ खातात.


उपाय


या किडीच्या बंदोबस्तासाठी क्लोरेड एम ५ % पावडर हेक्टरी ५० किलो जमिनीवर सायंकाळी धुराळावी तसेच *सम्राट प्लस* ची फवारणी करावी.


मावा व तुडतुडे – या किडी पानातील अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे पाने पिवळी पडतात.


उपाय


लागवडीनंतर १५ दिवसांनी मिथिल डिमेटाँन १० मिली आणि *सम्राट प्लस* २० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.


बटाट्यावरील पंतग – हि किड बटाट्याचे अतोनात नुकसान करते. या किडीची सुरवात शेतातून होते. परंतु नुकसान हे साठवणुकीच्या काळात दिसून येते. या किडीच्या आळया पानात देठात व खोडात शिरून पोखरतात. आळया बटाट्यात शिरून आतील भाग पोखरून खातात.


उपाय


या किडीच्या बंदोब्स्तासाठी कार्बारील ५० डब्लू.पी. १.५ किलो आणि *अंकुश* १५०० मिली ७५० पाण्यात मिसळून फवारावे.


काढणी व उत्पादन


सर्व सुधारित तंत्राचा उपयोग करून बटाट्याचे पिक घेतल्यास लवकर तयार होणार्या जातीचे उत्पादन हेक्टरी २०० क्विंटल व उशिरा तयार होणा-या जातीचे उत्पादन हेक्टरी २५० ते ३०० क्विंटल पर्यंत होऊ शकते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कढीपत्ता लागवडीबाबत माहिती

कृषी सुधारणा विधेयकं(MSP) : फायदे व तोटे

_NPK जिवाणू म्हणजे काय?_* *_NPK जीवाणूंचे काम काय ?