बटाटा रोग व कीड
*🥔बटाटा रोग व कीड :-*
*🥔रोग :-*
*१)करपा :-* पानवर काळे ठिपके पडून पाने गळतात. बटाट्यावर खोलगट चट्टे पडतात.
*👉🏻उपाय :-* डायथेनएम ३० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
*२)मर :-* मोठी झाडे पिवळी व मलूल दिसतात. बुंध्याजवळ जमिनीलगतच्याभागावर बुरशीची वाढ झालेली दिसते. पिकांची फरपालट आणि नियमित पाण्याच्या पाळ्या देऊन रोग आटोक्यात अंत येतो. जमिनीत नँप्थलीन किंवा फॉरमँलिन(१:५०) मिसळून दिल्यास रोगाचे बीज मरते.
*३)चारकोल राँट किंवा खोक्या रोग :-* या रोगाचा प्रसार जमिनीतून होतो. जमिनीचे तापमान ३२ सेल्सिअस पेक्षाअधिक असल्यास ते रोगजतूना पोषक ठरते. या रोगामुळे साठवणीतील बटाटे नसतात. जमिनीचे तापमान ३२ सेल्सिअस च्या वर चढण्यापूर्वी बटाट्याचीकाढणी करावी किंवा पाणी देऊन जमिनीचे तापमान कमी ठेवावे.
*🥔🐛कीड :-*
*१)देठ कुडतरणारी अळी :–* राखी रंगाची अळी असून रात्रीचे वेळी खोडाजवळील भाग कुरतडतात. पाने व कोवळे देठ खातात.
*👉🏻उपाय :-* या किडीच्या बंदोबस्तासाठी क्लोरेड एम ५ % पावडर हेक्टरी ५० किलो जमिनीवर सायंकाळी धुराळावी
*२)मावा व तुडतुडे :-* या किडीत पानातील अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे पाने पिवळी पडतात.
*👉🏻उपाय :-* लागवडीनंतर १५ दिवसांनी मिथिल डिमेटाँन १० मिली १० लिटर पाण्यात मिसळून किंवा फाँस्फोमिडाँन ८५ डब्लू एमसी १० मिलि १० लिटर पाण्यात फावरावे.
*३)बटाट्यावरील पंतग :-* हि किड बटाट्याचे अतोनात नुकसान करते. या किडीची सुरवात शेतातूनहोते. परंतुनुकसान हे साठवणुकीच्या काळात दिसून येते. या किडीच्या आळया पानात देठात व खोडात शिरून पोखरतात. आळया बटाट्यात शिरून आतील भाग पोखरून खातात.
*👉🏻उपाय :-* या किडीच्या बंदोब्स्तासाठी कार्बारील ५० डब्लू.पी. १.५ किलो ७५० पाण्यात मिसळून फावरावे.
शेतकरी हितासाठी शेतकरी सुखासाठी
शेअर करा.....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा