बोअर खोदणाऱ्या शेतकऱ्यांनो सावधान

 *_बोअर खोदणाऱ्या शेतकऱ्यांनो सावधान_* 


_प्रथम सावकाश वाचा_


_राम राम शेतकरी बंधूंनो,_

*_बोरवाले_* _एजंट शेतकऱ्याला कसे फसवतात ते पहा._

_आपण बोर वाल्याकडे जातो व विचारतो बोर काय फुट घेता तो आपल्याला सांगतो ५७ रुपये फूट व किसिंग २०० रुपये फूट पण आपण त्याला विचारत नाही की सहा इंचीचा किती व ९ इंचीचा किती पण सहा इंचीचा भाव तो सांगतो ५७ रुपये आणि किसिंगचा भाव सांगतो दोनशे रुपये आता दोनशे रुपयाची फोड आशी आहे की पीव्हीसी पाईपचा भाव आहे. ७०/९० रुपये फूट आता २०० मधून ८० रुपये गेले तर खाली राहिले १२० रुपये १२० रुपये फूट नऊ इंची बोर खोदण्याचे असतात._

*_उदाहरण :_* _आपण बोर घेतला दोनशे पन्नास फूट त्याला किसिंग लागला साठ फूट आपण हिशोब करायला जातो त्यावेळेस आपल्याला हिशोब दिला जातो २५० फुटाचे ५७ रुपये व किसिंग साठ फूट दोनशे रुपये प्रमाणे हिशोब केला जातो. आता मला सांगा आपण बोर घेतला दोनशे पन्नास फूट आणि आपण पैसे दिले ३१० फुटाचे म्हणजे आपण पैसे द्यायला पाहिजे होते १९० फुटाचे ५७ रुपये आणि साठ फुटाचे दोनशे रुपये म्हणजे आपल्याला फसवले गेले ६० फूट ५७ रुपये ३४२० रुपये म्हणजे किसिंगच्या साठ फुटी खोदायचे पैसे दोनशे रुपयांमध्ये आहेत._

     _नऊ इंची खोदायचे दोनशे रुपये मधले १२० रुपये आणि ५७ रुपये म्हणजे नऊ इंची बोर खोदायचे १७७ रुपये फूट आपण देत आहोत तरीही शेतकऱ्यांनी जागृत व्हावे म्हणजे आपली फसवणूक होणार नाही तरी हा मेसेज शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी इतर ग्रुप वर फॉरवर्ड करावा व शेतकऱ्याची फसवणूक थांबवावी._

*🌀✳️🌀✳️🌀✳️🌀✳️🌀✳️🌀*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कढीपत्ता लागवडीबाबत माहिती

कृषी सुधारणा विधेयकं(MSP) : फायदे व तोटे

_NPK जिवाणू म्हणजे काय?_* *_NPK जीवाणूंचे काम काय ?