रब्बी ज्वारी
*_रब्बी ज्वारी_*
*_बळीराजा_*
*_✨आरोग्यदायी ज्वारी_*
_◆ज्वारीचे पदार्थ खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते, हृदयरोग्यांमध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होण्यास मदत होते._
_◆भूक वाढते, ग्लायसेमिक इंडेक्स कमी केला जातो._
_◆पचनसंस्थेतील वायुदोष कमी होतात, अॅसिडीटी कमी होते._
_◆आतड्यांच्या कॅन्सरचे प्रमाण कमी करणे शक्य_
*_✨प्रति १०० ग्रॅम ज्वारीतील महत्त्वाचे घटक_*
_●ज्वारीच्या दाण्यात ओलावा (आर्द्रता) ८ ते १० टक्के, प्रथिने ९.४ ते १०.४ टक्के, तंतूमय घटक १.२ ते १.६ टक्के_
_●खनिज द्रव्ये १.० ते १.६ टक्के,_ _●उष्मांक ३४९ किलो कॅलरीज_
_●कॅल्शिअम २९ मिलिग्रॅम,_
_●किरोटीन (प्रो-व्हिटॅमीन ए) ४७,_
_●थायमीन ३७ मिलिग्रॅम_
_लायसीन, मिथीलोअमाईन ही आवश्यक अमिनो आम्ल मर्यादित प्रमाणात आढळतात._
*_✨ज्वारीचे पदार्थ -_* _हुरडा, रवा, लाह्या, पोहे, घुगऱ्या, दशमी, थालीपीठ, उत्तप्पा, डोसा, इडली, कुरडई, चकली, आप्पे, चिवडा, खाकरा, अंकित, भातवड्या, पापड, आंबील, मसाल्याचे वडे, बिस्किट, कुकीज, केक, शंकरपाळी, नानकटाई, मिल्टिंग मोमेंट, बिवड्या, सिरप/काकवी, गूळ, अल्कोहोल_
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा