ग्राहक म्हणतो : तुमच्या किमती खूप जास्त आहेत_


*_😃ग्राहक म्हणतो : तुमच्या किमती खूप जास्त आहेत_*


📌 या विषयावरचा हा महत्वाचा लेख होऊ शकतो, याचं कारण असं आहे की, ग्राहक याच मुद्द्यावर आपल्यापासून दूर जायला बघतो किंवा आपल्याला ब्लॅकमेल करून किमती कमी करून आपले उत्पादन किंवा सेवा पदरात पाडून घ्यायला बघतो.


आपल्या उत्पादनाचा किंवा सेवेचा दर्जा उच्च प्रतीचा असेल? तर अशा परिस्थितीमध्ये एक विक्रेता म्हणून किंवा एक सामान्य माणूस म्हणून सुद्धा आपला जीव गुदमरतो ....तर अशावेळी आपण या ग्राहकाला कशाप्रकारे हँडल केलं पाहिजे?ते खालील काही स्टेपमध्ये वाचा


*(1) Do not flinch*

 बऱ्याच वेळेला ग्राहक त्याला काहीही माहीत नसताना उगाचच टाकायचा म्हणून अशा प्रकारचा वाईड बॉल टाकतो तो बघतो तुम्ही क्रीजच्या बाहेर येतात किंवा नाही ?तेव्हा ज्यावेळेला ग्राहक अशा प्रकारे आपल्या किंमतीवर ऑब्जेक्शन घेईल त्या वेळी आपल्या चेहर्‍यावरचे हावभाव बिलकुल बदलू देऊ नका, काय होत? समोरचा आपल्याला किंमत कमी करा म्हंटला की आपण नर्वस होतो, आणि ही नर्वसनेस लपत नाही.... टेन्शन असलं तरी रिलॅक्स रहा.


घाबरून जाऊ नका अर्ध्यापेक्षा जास्त ग्राहक फक्त आपल्याला चेक करत असतात, की जमतय का बघू हा खाली येतोय का ??अन जर आपण पटापट डिस्काउंट द्यायला चालू केलं तर त्याचं काम व्हायला लागतं, म्हणून तसं करू नका आपल्या चेहर्‍यावरचे हावभाव आपली बॉडी लैंग्वेज बिलकुल बदलू देऊ नका.


आपल्याला आपल्या किमतीवर, क्वालिटीवर विश्वास असेल? तर उगाचच नर्वस व्हायची गरज नाही


*( 2) Ask Questions*

जेंव्हा ग्राहक म्हणतो, "तुमच्या किमती जास्त आहेत" त्या वेळेला आपण समोरासमोर बसलेलो असतो, आपणही उठून जाणार नाहीत आणि तो सुद्धा लगेच उठून जाणार नाही, त्याला विचारा तुम्हाला काय वाटतं? आमच्या किमती किती जास्त आहेत?


त्याच्याकडून आकडा काढून घ्या, म्हणजे आपल्याला किमान त्याचा तरी अभ्यास कळेल की त्याने खरोखरच आपल्याकडे येण्याअगोदर काही होमवर्क केलेला आहे? किंवा तो उगाचच फेकायचे म्हणून फेकतोय.?


आता या ठिकाणी जो ग्राहक समोर बसलेला आहे त्याने जर आपल्या  स्पर्धाकडून काही कोटेशन्स आणले असतील किंवा काही प्रपोजल आणले असतील तर ते दाखवायची ची मागणी करा,जर त्याने खरोखरच अशा प्रकारचं काही प्रपोजल आणलेलं असेल आणि आपला प्रॉडक्ट आणि त्याचा प्रॉडक्ट सेम असेल तर काही फरकाचे मुद्दे असतात ....ते ग्राहकांसमोर मांडा


काऊंटर अटॅक नाही पण त्यातले लुप होल्स दाखवून दया ! बरं पडतं


*(3) Know your Enemy*

आताही जी स्टेप आहे ती स्टेप ग्राहक  आपल्या समोर येऊन बसण्या अगोदर करायची आहे.


आपल्या स्पर्धकाबद्दल त्याला स्वतः ला सुद्धा माहिती नसेल एवढी माहिती जमवून ठेवा तो कशाप्रकारे त्याच्या किमती सेट करतो? तो किती डिस्काउंट देतो? तो कशा प्रकारच्या ऑफर काढतो ?त्याचे कर्मचारी कशाप्रकारे ग्राहकांना पटवतात? सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत एकदा का आपण आपल्या सगळ्या स्पर्धकांच्या बिझनेस बद्दल होमवर्क आणि त्यांचे स्वभाव गुण जाणून घेतले आणि त्याचा अभ्यास केला की, आपल्या समोर बसलेला ग्राहक कोणत्या स्पर्धाकाबद्दल बोलतोय? आणि तो खरं बोलतोय का? हे आपल्याला लगेचच कळेल, आणि जर तो आपल्याला माहित असलेल्या स्पर्धकाचे वेगळे रेट सांगत असेल, तर समजून घ्या की तो चक्क खोटं बोलतोय.


असं खोटं बोलणाऱ्या ग्राहका समोर आपल्या किमती कमी करायची गरज नाही.


*(4) Defend your Value*

जी गोष्ट खरी असते ती सिद्ध करायला खूप कष्ट पडत नाहीत म्हणून तर ज्या वकिलाची केस खरी असते तो स्ट्राँगली बाजू मांडतो, तसेच आपल्याला जर माहीत असेल की, आपला प्रॉडक्ट हा आपल्या स्पर्धकांपेक्षा जास्तीचा चांगला आहे तर, त्याच्याबद्दल खरं बोलायला काहीही विशेष कष्ट पडणार नाहीत त्यामुळे समोरचा ग्राहक फक्त किंमत मांडत राहील आणि आपण व्हॅल्यू समोर ठेवत रहा, आपला प्रॉडक्ट कसा उजवा आहे ? ते त्याला व्यवस्थित कळलं कि झालं.


*(5) Keep your door Open*

आपण आपली बाजू सांगितली तरी समोरचा त्याच्या कमी किंमत करण्यावर अडून बसला असेल,तर दार उघडं ठेवा ! याचा अर्थ ?


डिल सोडून दयायला तयार रहा !


वरच्या पॉईंटमुळे ग्राहक बऱ्यापैकी विचार करायला लागलेला असतो, पैशासारखा पैसा खर्च करून कोणालाच भंगार वस्तु घरी नेऊ वाटत नाही,तेंव्हा अगदी मोकळेपणाने कोणतही प्रेशर न घेता डिल सोडायला तयार रहा !


समोरचा फार काही आढेवेढे घेत बसणार नाही, आणि आपण सांगितलेली किंमत मान्य करेल


ट्राय करा !


वरिल सरळ उठून जाण्याचा प्रकार खुप व्यापारी वापरतात आणि अहो आश्चर्य समोरचा डिल आपल्या मनासारखी सारखी करतो.


वापरा ! फायदा होईल.


👉 व्यवसाय साक्षर व्हा.....


👉 उद्योजक बना....


🙏🙏🙏🙏😇😇😇😇

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कढीपत्ता लागवडीबाबत माहिती

कृषी सुधारणा विधेयकं(MSP) : फायदे व तोटे

_NPK जिवाणू म्हणजे काय?_* *_NPK जीवाणूंचे काम काय ?