_गहू_

 *_गहू_*


*_बळीराजा_*


*_पाणी व्यवस्थापन_*

_पेरणी शेत ओलावून वाफसा आल्यावर करावी. पेरणीनंतर साधारणपणे दर १८ ते २१ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. मध्यम ते भारी जमिनीत पीक तयार होण्यासाठी चार ते पाचवेळा पाणी द्यावे लागते. तुषार सिंचनाच्या माध्यमातून पाणी दिल्यास २५% पाण्याची बचत होते. मात्र ओंब्या बाहेर पडल्यानंतर पिकास तुषार सिंचन पद्धतीने पाणी देऊ नये, त्यामुळे गव्हाच्या दाण्यांची चकाकी कमी राहून दर्जात घट होते._

_💧पीकवाढीच्या अवस्थेनुसार पाणी नियोजन_

_मुकुटमुळे फुटण्याची अवस्था - पेरणीनंतर १८ ते २१ दिवसांनी_

_कांडी धरण्याची अवस्था - पेरणीनंतर ४० ते ४२ दिवसांनी_

_फुलोरा आणि चीक भरण्याची अवस्था - पेरणीनंतर ६० ते ६५ दिवसांनी_

_दाणे भरण्याची अवस्था - पेरणीनंतर ८० ते ८५ दिवसांनी_

_💧अपुऱ्या पाणीपुरवठा परिस्थितीतील सिंचन पाण्याचा तुटवडा असल्यास शेततळ्याच्या माध्यमातून गव्हाच्या पिकास संरक्षित पाणी द्यावे. त्यामध्ये एकच पाणी देणे शक्‍य असल्यास ते ४० ते ४२ दिवसांनी कांडी धरण्याच्या अवस्थेत द्यावे. गहू पिकास पेरणीनंतर दोन पाणी देणे शक्‍य असल्यास, पहिले पाणी २० ते २२ व दुसरे पाणी ६० ते ६५ दिवसांनी द्यावे. गव्हास एकच पाणी दिले, तर पुरेशा पाण्यापासून आलेल्या उत्पादनाच्या तुलनेत ४१% घट येते. दोन पाणी दिले, तर उत्पादनात २०% घट येते. तीन पाणी देणे शक्‍य असल्यास, पहिले पाणी २० ते २२ दिवसांनी, दुसरे पाणी ४० ते ४२ आणि तिसरे पाणी ६० ते ६५ दिवसांनी द्यावे._

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कढीपत्ता लागवडीबाबत माहिती

कृषी सुधारणा विधेयकं(MSP) : फायदे व तोटे

_NPK जिवाणू म्हणजे काय?_* *_NPK जीवाणूंचे काम काय ?