डाळिंब

 *डाळिंब*



झाडाच्या मुळांवर असणाऱ्या गाठी ही सूत्रकृमीच्या प्रादुर्भावाची लक्षणे आहेत. यामध्ये झाडाच्या पानांवर अन्नद्रव्यांच्या कमतरतेसारखी लक्षणे दिसून येतात. अशा झाडांमध्ये फूलधारणेचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे दिसून येते. प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असल्यास झाडांना दीर्घ कालावधीमध्ये (एक वर्षापेक्षा जास्त) फूलधारणा होत नाही. अशी झाडे ‘मेलेडोगाइनी इनकाँग्नीटा’ नावाच्या सूत्रकृमीने प्रादुर्भावग्रस्त असतात. डाळिंबामध्ये रॉटिलेनक्लस, अफेलेनकेक्लस आणि हेलीवटोंनक्लस या परजीवीचा आढळही काही प्रमाणात दिसून येतो. सूत्रकृमींचा प्रादुर्भाव हा मर रोगांच्या प्रमुख्य कारणांपैकी एक आहे. शेणखतासोबत पॅसिलोमायसीस लीलासीनस ४ ते ५ किलो प्रति एकर, अॅस्परजिलस नाइजर (एएन २७) १ किलो प्रति एकर, मायकोरायझा १ ते ५ किलो प्रति एकर अशा उपयुक्त जिवाणूंचा वापर कुजलेले शेणखत किंवा गांडूळखतामध्ये मिसळून लागवडीपासून दर ६ महिन्यांच्या अंतराने केल्यास सूत्रकृमींवर नियंत्रण मिळण्यास मदत होते. त्याचबरोबर अॅझाडिरेक्टीन (१%) ३ मि.लि. प्रतिलिटर पाणी या प्रमाणातील द्रावणाची वर्षातून किमान दोनवेळा ड्रेंचिंग करावी. बागेतील दोन झाडांमधील अंतरामध्ये आफ्रिकन झेंडू उदा. पुसा नारंगी आणि पुसा बसंती अशा जातींची लागवड करावी. उत्तम परिणामाकरिता झेंडूंची वाढ ५ ते ६ महिन्यांपर्यंत होऊ द्यावी. सूत्रकृमीनाशक फ्ल्युन्सल्फोन (२ जीआर) ४० ग्रॅम प्रति झाड या प्रमाणात सुरवातीच्या अवस्थेमध्ये वापर केल्यास सूत्रकृमीवर प्रभावी नियत्रंण मिळवता येऊ शकते. हिरवळीची खत पिके उदा. ताग, धैंचा ही सापळा पीक म्हणून फायदेशीर ठरतात.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कढीपत्ता लागवडीबाबत माहिती

कृषी सुधारणा विधेयकं(MSP) : फायदे व तोटे

_NPK जिवाणू म्हणजे काय?_* *_NPK जीवाणूंचे काम काय ?