खोडवा ऊस
*_🎋खोडवा ऊस 🎋_*
*_बळीराजा_*
*_खोडवा पीक घेताना विचारात घ्यावयाच्या बाबी_*
_◆सर्वसाधारणपणे १५ फेब्रुवारीपर्यंत तुटलेल्या ऊसाचाच खोडवा ठेवावा. त्यानंतर घेतलेल्या खोडवा ऊसावर खोड किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो._
_◆लागवडीच्या ऊसाचे उत्पादन एकरी ४० टन आणि ऊस संख्या एकरी ४० हजारपेक्षा जास्त असलेल्या ऊसाचाच खोडवा ठेवावा. पीक विरळ झाल्यास रोपे लावून नांग्या भराव्यात._
_◆खोडवा ठेवावयाची जमीन सुपिक आणि निचर्याची असावी. खोडवा पीक हे हलक्या, कमी खोलीच्या तसेच निचरा न होणाऱ्या क्षारपड, चोपण जमिनीत घेऊ नये._
_◆खोडवा पीक १२ ते १४ महिने वयाचे असताना ऊसाची तोड होणार असेल, तरच खोडवा ठेवावा._
_◆शिफारशीत ऊस जातीचाच खोडवा ठेवावा._
_◆काणी व गवताळ वाढ या रोगांचा खोडवा ऊसातील प्रादुर्भाव टाळण्यासाठी उष्ण बाष्प प्रक्रिया केलेल्या त्रिस्तरीय बेणेमळ्यातील शुद्ध बेणे बावीस्टीनची बीजप्रक्रिया करून ऊस लागणीसाठी वापरावे, दर ३-४ वर्षांनी बेणे बदल करावा._
_◆खोडव्यामध्ये पाचटाचा आच्छादन म्हणून प्रभावीरित्या वापर करण्यासाठीची पूर्वतयारी ऊस लागणीपासूनच करायला हवी. यासाठी उसाच्या दोन सर्यांमधील अंतर कमीत कमी १.२ मीटर (४ फूट) असावे किंवा जमिनीच्या मगदुरानुसार रुंद सरी अथवा जोडओळ पद्धतीने ऊसाची लागण करावी. म्हणजे, पट्ट्यात पाचट चांगले बसते व फूट चांगली होते._
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा