सुरु ऊस

 *_🎋सुरु ऊस 🎋_*


*_बळीराजा_*


*_खोड कीड :_* _लागवडीपासून मोठ्या बांधणीपर्यंत प्रादुर्भाव होतो. हलकी जमीन, कमी पाणी, हंगामबाह्य लागवड, जास्त तापमानात प्रादुर्भाव वाढतो. उसाचा पोंगा वाळलेला दिसतो. पोंगा हाताने ओढल्यास सहजासहजी उपटून येतो._


*_⭕व्यवस्थापन_*

_◆हलक्‍या जमिनीत उसाची लागवड टाळावी. सुरू उसाची लागवड १५ फेब्रुवारीपूर्वीच करण्याचे नियोजन करावे._

_◆बेणेमळ्यातील निरोगी व किडीविरहीत बेण्याची निवड करावी. वाढ जोमदार व फुटवे जास्त प्रमाणात येणाऱ्या वाणांवर या किडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात येतो._

_◆फार प्रादुर्भाव झाल्यास शेत विरळ दिसते. अशा वेळेस एकरी रोपांची योग्य प्रमाण राखण्यासाठी लागवडीबरोबर प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये पुरेसे रोपे तयार करून ठेवावीत. योग्यवेळी विरळ जागी ही रोपे लावावीत._

_◆लावणीच्या ४०-४५ दिवसांनी बाळबांधणी करावी._

_◆मका, ज्वारी ही आंतरपिके न घेता कांदा, लसूण, कोथिंबीर, पालक ही आंतरपिके घ्यावीत._

_◆पुरेशा प्रमाणात पालाशयुक्त खते वापरल्यास या किडींचा प्रादुर्भाव कमी होतो._

_◆लागवडीनंतर ४०-४५ दिवसांनी एकरी २ ट्रायकोकार्ड १० ते १५ दिवसांच्या अंतराने तीनवेळा वापरावीत._

_◆एकरी २ कामगंध सापळे (ई.एस.बी. ल्यूर) लावावेत._

_◆खोडकीडग्रस्त ऊस देठ मुळासह उपटून अळीसह नष्ट करावा._

_◆खोडकिडीमुळे शेंडे वाळत असल्यास, गरजेनुसार क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (०.४ जीआर) ७.५ किलो किंवा फिप्रोनिल (०.३ जीआर) १० किलो प्रति एकरी द्यावे. अन्यथा क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.३७५ मि.लि. किंवा क्लोरपायरीफॉस (२० ईसी) २ मि.लि. प्रति लिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी._

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कढीपत्ता लागवडीबाबत माहिती

कृषी सुधारणा विधेयकं(MSP) : फायदे व तोटे

_NPK जिवाणू म्हणजे काय?_* *_NPK जीवाणूंचे काम काय ?