केळी लागवड

 *_केळी लागवड


_भारतामध्ये आंब्यानंतर केळीच्या लागवडीचा दुसरा क्रमांक असून केळीची लागवड बाराही महिने करतात. परंतु बदलत्या मार्केटच अभ्यास करता केळीची लागवड योग्य वेळी केल्यास फायदेशीर ठरते. कारण ऑक्टोबरमध्ये दसर्‍याच्या सुमारास मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात केळीची आवक झाल्याने भाव घसरतात. दसर्‍यानंतर केळीचे दर घसरतात ते मार्चपर्यंत कमीच राहतात. एप्रिल, मे, जून महिन्यामध्ये केळीला दर जास्त मिळतो. तेव्हा मंदीचा काळ लक्षात घेऊन २ -३ महिने उशिरा म्हणजे डिसेंबर जानेवारीमध्ये लागवड केल्यास भरपूर नफा मिळतो._ 


*_जमीन :_*

_भारी कसदार, भुसभुशीत, पाण्याचा चांगला निचरा होणारी, सेंद्रिय पदार्थयुक्त गाळाची सुपीक जमीन केळीस मानवते. केळीची मुळे फार खोलवर जात नसल्याने मध्यम ते कमी खोलीच्या जमिनीत देखील लागवड करता येते. मात्र हे पीक खादाड असल्याने कमी खोलीच्या जमिनीतूनही चांगले उत्पादन घेण्यासाठी अन्नद्रव्याचा भरपूर पुरवठा करणे गरजेचे असते, त्यासाठी जास्तीत जास्त सेंद्रिय खताचा वापर करावा. सेंद्रिय खतामुळे जमिनीत ओलावा धरून ठेवण्याची क्षमता वाढते. खडकाळ किंवा जांभ्या खडकाच्या जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण कमी असल्याने अशा जमिनीत लागवड केली जात नाही किंवा कमी प्रतिच्या मानल्या जातात. खारवट जमिनी केळीला चालत नाहीत. क्षारांचे शेकडा प्रमाण ८.०५ च्या वर गेलेल्या जमिनी केली लागवडीस अयोग्य आहेत. जमिनीतील थोड्या प्रमाणातील चुनखडी केळीला उपयुक्त ठरते. सामू थोडा अल्कलीयुक्त असल्यास चालतो._

     _विभागवार केळीबाबत जमिनीची निवड सांगायचेच झाल्यास जळगाव जिल्ह्यात तापी खोर्‍यातल्या मध्यम खोलीच्या काळ्या जमिनीत लागवड मोठ्या प्रमाणात करता येते. कोकण भागातील जांभ्या जमिनी केळीसाठी योग्य समजतात. ठाणे जिल्ह्यात समुद्र काठाची रेताड जमीन दख्खनमध्ये आढळणार्‍या खोल व तळाशी मुरमाड जमिनी मध्यम काळ्या नरम तांबड्या जमिनी तसेच गुजरातच्या खोल परंतु हलक्या गाळाच्या जमिनीत केली यशस्वीरित्या येते._


 *_हवामान :_*

_केळी हे उष्ण कटिबंधातील फळपीक असून त्यास उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. केळीच्या पानांच्या चांगल्या वाढीसाठी २३ ते २८ डिग्री सेल्सिअस तापमान आणि केळीच्या घडाच्या वाढीला थोडे अधिक २९ ते ३० डिग्री सेल्सिअस तापमान अधिक फायदेशीर ठरते. २९ ते २२ डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी तापमानात लोह सोडून सर्वच अन्नद्रव्याचे ग्रहण करण्याचे प्रमाण कमी होते अधिक तापमानात केळीच्या मुळ्या बोरॉन हे १० पटीने जास्त ग्रहण करतात. पालाश, सोडियम, चुना, लोह आणि जस्त ३ ते ४ वेळा जास्त ग्रहण करतात. नत्र, स्फुरद, मॅग्नेशियाम, मँगनीज, तांबे जास्त ग्रहण झाले तर थंड हवामान केळी तयार होण्याचा कालावधी वाढतो. शिवाय कायम स्वरूपी केळीचे पीक घेतले जाते त्या भागात पिले बाहेर पडणे महत्त्वाचे असते. परंतु त्या ठिकाणी पिले कमी बाहेर पडतात._


*_जाती :_*

_३०-३५ वर्षापुर्वी केळी दोन आणे डझन होती ती केळी साधारण १५ ते ३० रू. डझन या चढ्या भावाने विकली तरी केळीचे क्षेत्र वाढविण्याच्या मर्यादा आहेत. कारण लागवडीसाठी होणारा भरपूर खर्च, पाण्याची वाढती गरज टिकावूपणामुळे मागणी जरी वाढली तरी उत्पन्न घटत चालले आहे. त्याचप्रमाणे महत्त्वाचे कारण म्हणजे उत्पादक शेतकर्‍यापासून ते प्रत्यक्ष गिर्‍हाईकापर्यंत पोहचविताना होणारा दलालीचा अफाट खर्च यामुळे उत्पादक शेतकर्‍याला भाव कमी मिळतो आणि ग्राहकाला जादा दराने केळी खरेदी करावी लागते._



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कढीपत्ता लागवडीबाबत माहिती

कृषी सुधारणा विधेयकं(MSP) : फायदे व तोटे

_NPK जिवाणू म्हणजे काय?_* *_NPK जीवाणूंचे काम काय ?