पालाशच्या कमतरतेची लक्षणे
*🥀@ पालाशच्या कमतरतेची लक्षणे 🥀*
*_🍇🐓🍅🐄🌾🥦🍉🐛🌶🦗🌹_*
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
प्रामुख्याने परिपक्व पानांवर दिसून येतात. जोमाने शाकीय वाढ होणा-या द्राक्षवेलींमध्ये पोटॅशच्या कमतरतेमुळे पाने आतल्या बाजूने वळतात व त्यामुळे ती वाट्यांच्या (cupping) आकाराची झालेली बहुतेक वेळा पहावयास मिळतात पाने बाहेरील कडेच्या भागापासून पिवळी पडण्यास सुरुवात होतात व पिवळसरपणा हळूहळू तो आतील भागापर्यंत सरकत जातो. पिवळी पडलेली पाने कालांतराने फिक्कट रंगाची होणे ही पोटॅशच्या कमतरतेची प्रमुख लक्षणे आहेत. मोठ्या प्रमाणावर पोटॅशच्या कमतरतेमुळे पिवळी पानांच्या कडा जळाल्यासारख्या दिसू लागतात.
@ खारवट/ चुनखडीच्या व हलक्या मुरमाड जमिनीमध्ये लावलेल्या द्राक्षबागांमध्ये पोटॅशच्या कमतरतेची लक्षणे मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादनात घट येते. भारी चिकन मातीच्या जमिनीमध्ये होणारे पोटॅशचे स्थिरीकरण (fixation), कॅल्सियम कार्बोनेटचे जास्त प्रमाण, आदी कारणामुळे पोटॅशची उपलब्धता कमी होते व द्राक्ष वेलीना कमतरता भासते. मालकाडी पक्व होणे, फुटी विकसित होणे, द्राक्ष मण्यामध्ये पाणी उतरणे व द्राक्ष घड पक्व होणे या अवस्थांमध्ये पोटॅशच्या कमतरता भासते. त्यामुळे या अवस्थांच्या सुरुवातीलाच पोटॅशची मात्रा जमिनीतून किंवा ड्रीपच्या साहाय्याने देणे आवश्यक असते. साधारणपणे ६६० किलो K2O प्रति हेक्टरी देणे गरजेचे आहे. परंतु एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेणे गरजेचे आहे की द्राक्षवेली ह्या क्लोरीन/ क्लोराईड ला अति संवेदनशील असल्यामुळे क्लोराईडमुक्त खते उदा. पोटॅशियम सल्फेट किंवा पोटॅशियम नायट्रेट चाच वापर करावा.
@ क्लोराईडयुक्त खतांचा जसे की पोटॅशियम क्लोराईड/ म्युरेट ऑफ पोटॅश वापर करू नये. नियमित वेळेत खतांची मात्रा फर्टीगेशनद्वारा किंवा विभागून देताना अधिक फायदेशीर ठरते. त्यामुळे पोटॅशचे स्थिरीकरण व निचरा इ. द्वारा होणारा अपव्यय टळतो. द्राक्षवेलींमधील पोटॅशच्या योग्य नियोजनासाठी १० टक्के मात्रा ही खरड छाटणीच्या अगोदर विश्रांतीच्या काळात फर्टीगेशनद्वारा दिली जाणे आवश्यक आहे. ३० टक्के मात्रा ही खरड छाटणीनंतर ६०-१२० दिवसादरम्यान द्यावी. उर्वरित ६० टक्के मात्रा ही मणी वाढ व विस्तार आणि द्राक्ष घड पक्व होण्याच्या काळात देणे गरजेचे आहे. पाने.
@ आतल्या बाजूने वळून ती वाट्यांच्या (cupping) आकाराची झालेली दिसू लागताच ०.५ टक्के पोटॅशियम सल्फेट किंवा पोटॅशियम नायट्रेटची फवारणी केल्यास पोटॅशची कमतरता त्वरित व तापुरात्या स्वरूपात भरून येण्यास मदत होते. परंतु फवारणीच्या द्रावणाचे हेच प्रमाण १.० टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास द्राक्षवेलीच्या पानाना इजा होऊ शकते. कायमस्वरूपी पोटॅशच्या पूर्ततेसाठी फवारणीनंतर लगेचच पोटॅशयुक्त खतांची मात्रा जमिनीतून देणे गरजेचे आहे.@@ माहिती संकलित आहे.
🥀🥀आपला शेतकरी मित्र.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा