उन्हाळ्यात फळबागा कशा जगवाल ?

उन्हाळ्यात फळबागा कशा जगवाल ? राज्यात मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून कमाल आणि किमान तापमानात वाढ होत आहे. सकाळी व सायंकाळी थोडसा गारवा तर दिवसाचे सर्वसाधारण तापमान 35 ते 38 अंश सेल्सिअस पर्यंत नोंदवले गेले आहे. दिवसागणिक तापमानात वाढ होताना दिसत आहे. राज्यात गेल्या वर्षी एप्रिल-मे महिन्यात सर्वसाधारणपणे 42 ते 45 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले आहे. गेल्या वर्षी अपुर्या पावसाने सध्या राज्यात बहुतांश ठिकाणी दुष्काळाच्या झळा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. पाण्याचे मोठ्या प्रमाणात दुर्भिक्ष असल्याने फळबागा व जित्राब जगवायची कशी असा प्रश्न शेतकर्यास पडला आहे. राज्यात दुष्काळी पट्ट्यात चारा छावण्या सुरु झाल्या आहेत. प्रस्तुत लेखात येत्या उन्हाळी हंगामात फळबागा जगवायच्या कशा यावर उहापोह केला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर, पाण्याचे दुर्भिक्ष मोठ्या प्रमाणावर जाणवत असल्याने त्याचा परिणाम फळबागेवर होत असतो. सूर्यप्रकाश, गरम वारे, कोरडी हवा याचा विपरीत परिणाम नवीन लावलेल्या फळझाडांवर तसेच फळे देणार्या झाडांवर होत असतो. यामुळे मुख्यत्वे कोवळी फुट करपणे, खोड तडकणे, फळगळ होणे, फळां...