जाणून घ्या ! काय आहे प्रिसिजन फार्मिंग, वाचा सविस्तर

जाणून घ्या ! काय आहे प्रिसिजन फार्मिंग, वाचा सविस्तर

शेती आता दिवसेंदिवस आधुनिकतेच्या महामार्गावर सुसाट वेगाने धावते आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण आता शेतामध्ये विविध प्रकारच्या टेक्नोलॉजीचा वापर होताना दिसत आहे जसे की, शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी शेतामध्ये सुपर कम्प्युटर, सॅटॅलाइट, स्मार्ट डिव्हाइसेस इत्यादी तंत्रज्ञानाचा वापर होताना दिसत आहे.
शेताच्या निविष्ठा वापरल्या जातात त्यांनी सर्वांचा योग्य प्रमाणात आणि योग्य ठिकाणी वापर करून शाश्वत उत्पादन वाढवणे तसेच खते, कीटकनाशके इत्यादी निविष्ठांचा शास्त्रशुद्ध व अचूक वापर करून पारंपारिक शेतीला छेद देत पारंपरिक शेती या तुलनेने पिकांचे उत्पादन व उत्पादकता वाढवणे, या सगळ्या प्रक्रियेला प्रिसिजन फार्मिंग असे म्हणता येईल.
काय आहे प्रिसिजन फार्मची संकल्पना
 या संकल्पनेचा जर विचार केला तर निसर्गावर कुठल्याही प्रकारच्या अतिक्रमण न करता तसेच आपल्या जवळ उपलब्ध साधनसामग्रीचा नियोजनबद्ध वापर करून अखिल मानव जातीच्या गरजा कशा पूर्ण करता येथील या मुल तत्त्वावर ही संकल्पना आधारलेली आहे. आपल्या देशामध्ये छोट्या सीमांत शेतकऱ्यांची संख्या जास्त प्रमाणात आहे. अशा लहान शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळवण्यासाठी प्रिसिजन फार्मिंग महत्वाचा रोल पार पाडू शकते. कृत्रिम पद्धतीने त्याचा वापर करून उत्पादन खर्च कमी व शेती उत्पादनामध्ये शाश्‍वतता आणणे हे प्रमुख उद्देश प्रिसिजन फार्मिंगचे आहेत.

प्रिसिजन फार्मची साधने
सेंसर टेक्नॉलॉजी- इलेक्ट्रो मॅग्नेटिक, कण्डक्टिविटी, अल्ट्रासाउंड, फोटो इलेक्ट्रिसिटी इत्यादी वर आधारित संसार तंत्रज्ञानाच्या मदतीने हवेचा वेग, हवेतील बाष्पाचे प्रमाण, आद्रता, हवेचे तापमान तसेच वनस्पतींचे शाखीय वाढ इत्यादी समाजास मदत होते. सुदूर संवेदन तंत्रज्ञानामुळे पिकाच्या जाती, पिकांमध्ये निर्माण झालेला ताण, पिकांवरील कीड व त्यांची ओळख, दुष्काळसदृश्य परिस्थिती नियोजन, जमीन व पिकांची स्थिती समजून घेण्यास या तंत्रज्ञानाने मदत होते. सेंसर तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रचंड प्रमाणात डाटा एनालिसिस सह उपलब्ध होतो. या डेटाचे अनालिसिस करून शेतकऱ्यांना पीक नियोजन करणे सोपे होते.
जीपीएस सिस्टिम- जीपीएसच्या मदतीने शेताची स्थान निश्चिती अक्षांश-रेखांश असल्याबद्दल माहिती मिळण्यास मदत होते. जमिनीचा प्रकार, किडींचा प्रादुर्भाव, तणाचे वाढते प्रमाण इत्यादी माहितीचे पृथक्करण स्थाननिश्चिती सह जीपीएसच्या मदतीने केले जाते.

ग्रिड सोईल सॅम्पल आणि व्हेरी बल रेट टेक्नॉलॉजी- शेताचा आकार जर मोठा असेल तर संपूर्ण गावांमधील ग्रीड अशा पद्धतीने माती नमुने काढून त्यांचे परीक्षण अहवाल कम्प्युटरच्या मदतीने जीआयएस नकाशात नोंदवले जातात. संगणक जीआयएस नकाशे यांच्या वापराने शेतीमधील निविष्ठा वापराचे प्रमाण नियंत्रित केले जाते. त्यासाठी जीपीएस यंत्रणा उपयोगात आणली जाते.
सॉफ्टवेअर- प्रिसिजन फार्मिंग करताना शेतीमधील विविध कामे पार पाडण्यासाठी सॉफ्टवेअरचा वापर करावा लागतो. म्हणजे विविध संस्थांकडून आलेली माहिती एनालिसिस करणे, जीआयएस आधारित नकाशे तयार करणे, सर्व प्रक्रियेच्या प्रकरणांमधून तयार झालेली माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचवणे ही सर्व प्रकारची कामे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पार पाडली जातात.

दर नियंत्रक - पिकांना घ्यावयाची खत, तणनाशके, कीटकनाशके हे स्वयंचलित यंत्रणेच्या मार्फत देताना वेगवेगळ्या दर नियंत्रक संयंत्राचा वापर केला जातो.

पिकांचे व्यवस्थापन- सॅटेलाईट द्वारे प्राप्त झालेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना पीक आणि जमीन इत्यादींची संरचना समजून घेण्यास मदत होते. या प्राप्त माहितीच्या आधारे शेतकरी शेती उत्पादनामध्ये महत्त्वाची भूमिका असणाऱ्या बियाणी, खते, औषधे, पाणी इत्यादी निविष्ठांचा योग्य वेळी, योग्य प्रमाणात योग्य ठिकाणी अचूक रित्या वापर करू शकतो.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कढीपत्ता लागवडीबाबत माहिती

कृषी सुधारणा विधेयकं(MSP) : फायदे व तोटे

_NPK जिवाणू म्हणजे काय?_* *_NPK जीवाणूंचे काम काय ?