फळबाग बागायतदारासांठी मदतगार आहे भाऊसाहेब फुंडकर योजना
फळबाग बागायतदारासांठी मदतगार आहे भाऊसाहेब फुंडकर योजना
अनेक शेतकरी पांरपारिक शेतीकडून वळत फळबागा घेत आहेत. फळ बागामुळे शेतकऱ्यांना एक स्थायी प्रकारचे कमाई मिळत असते. विशेष म्हणजे राज्य सरकारही फळबागाकडे शेतकऱ्यांनी वळावे यासाठी प्रोत्साहन देत आहे. शेतकऱ्यांनी फुल, फळबागाचे क्षेत्र वाढावावे यासाठी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसेही आग्रही आहेत. दरम्यान फळबाग लागवड करणाऱ्यासाठी सरकार आर्थिक मदत करत आहे. यासाठी एक योजनाही राबवली जात आहे. आज आपण याच योजनेविषयी माहिती घेणार आहोत. ही योजना आहे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, १९९० पासून ही योजना लागू करण्यात आली आहे
या योजनेसाठी काय आहे पात्रता
शेतकऱ्याच्या नावे स्वतःचा सातबारा असणे आवश्यक .
जर सातबारा उताऱ्यावर लाभार्थी संयुक्त खातेदार असेल तर सर्व खातेदारांचे फळबाग लागवडीसाठी संमतीपत्र आवश्यक.
जर सातबाऱ्यावर कुळाचे नाव असेल तर कुळाचे संमतीपत्र आवश्यक.
ज्या शेतकऱ्यांची कुटुंबाची उपजीविका केवळ शेतीवर चालू मन असेल अशांना प्रथम प्राधान्य त्यानंतर अन्य शेतकऱ्यांचा विचार करण्यात येईल
क्षेत्र मर्यादा
किमान 0.20 हे. व कमाल 6.00 हेक्टर पर्यंत लाभ घेता येईल
या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारचे शंभर टक्के अनुदान आहे. मिळणारे अनुदान हे तीन वर्षाच्या कालावधीत मिळणार.
अनुदान मिळताना पहिल्या वर्षी 50 टक्के, दुसऱ्या वर्षी 30 टक्के, तिसऱ्या वर्षी 20 टक्के याप्रमाणे अनुदान देय राहील. दरम्यान या योजनेसाठी अर्ज तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे करावा.
लागवड कालावधी
या योजने अंतर्गत फळबाग लागवड कालावधी हा जून ते मार्च आहे. या योजनेनुसार शेतकरी त्यांच्या आवश्यकतेनुसार सर्व फळपिकांच्या कलमा रोपांची लागवड करता येईल.
फळबाग लागवडीसाठी शेतकरी यांना कृषी विद्यापीठ रोपवाटिका, राष्ट्रीय बागवानी मंडळ मार्फत मानांकित खाजगी रोपवाटिका तसेच कृषी विभागाच्या परवानाधारक रोपवाटिकेतून कलम रोपे खरेदी करता येतील.
शेतकऱ्यांनी त्यांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर फळबाग लागवड करावी.
प्रति हेक्टरी लागवड अंतर व मिळणारे अनुदान
आंबा कलम(10 बाय10मी. )- 53 हजार 900 रुपये
पेरू कलमे(6 बाइ 6 मी. )= 62 हजार 472 रुपये
संत्रा मोसंबी व कागदी लिंबू कलम(6बाइ 6मी. ) 62 हजार 578 रुपये
सिताफळ कलम(5 बाइ 5 मी. ) 72 हजार 798 रुपये
चिकू कलमे= 55 हजार 355 रुपये.
धन्यवाद माहीती बद्दल😊
उत्तर द्याहटवा