शेतीविषयक महत्त्वाच्या बातम्या*
*💥 शेतीविषयक महत्त्वाच्या बातम्या*
*🎯 टोमॅटो उत्पादकांना २५ कोटी रुपयांचा फटक, पंधरा दिवसापासून बंद आहेत बाजार समित्या*
*👉 नगर जिल्ह्यातील* अकोले, संगमनेर, भागात टोमॅटोचं मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. पण येथील बाजार समित्या बंद असल्याने किलोमागे चार ते पाच रुपयांनी दर खाली आले आहेत.
*💁♀️ यामुळे पंधरा* दिवसात सुमारे २५ कोटींपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
*🎯 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत व इस्त्राईल यांच्यात ३ वर्षासाठी कृषी करार*
*👉 इस्त्राईल आणि भारत* यांच्यात कृषी क्षेत्रातील वाढती भागीदारी पुढे नेताना, दोन्ही सरकारांनी शेतीमधील सहकार्य वाढविण्यास सहमती दर्शविली.
*💁♂️ तसेच कृषी सहकार्यात* विकासासाठी तीन वर्षांच्या कार्य कार्यक्रम करारावर स्वाक्षरी केली, आणि सतत वाढणार्या द्विपक्षीय भागीदारीची पुष्टी केली आणि मान्यता दिली. *द्विपक्षीय संबंधात कृषी आणि जल क्षेत्र याचा समावेश असेल.*
*🎯 नाशिक जिल्ह्यात शेतकरी अपघात विमा योजना लागू; जाणून घ्या काय आहे योजना*
*👉 शेतकऱ्यांना* एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा शेतात काम करीत असताना एखादी इजा झाली किंवा त्याचा मृत्यू झाला तर संबंधित शेतकऱ्याच्या कुटुंबाला मदत व्हावी या उद्देशाने.
*👨🌾 महाराष्ट्र शासनाच्या* कृषि विभागाकडून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबवण्यात मान्यता देण्यात आली आहे.
*🎯 ग्राम बीजोत्पादन मोहिमेच्या माध्यमातून कृषी विभागाने गोळा केली ३० लाख क्किंटल सोयाबीन बियाणे*
*👉 मागच्या वर्षी* आपण पाहिले की सोयाबीनची पेरणी झाल्यानंतर अनेक ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या होत्या की, टाकलेली बियाणे उगवलेच नाही.
*💁♀️ सोयाबीनची पेरणी* ही वेळ वर, तसेच योग्यप्रकारे मशागत घेऊन केली गेली होती. तरी सोयाबीन बियाणे उगवण्याच्या प्रक्रियेत अनेक अडचणी आल्या.
*🎯 शेतकऱ्यांना FRP न देणाऱ्या या १० कारखान्यांवर होणार कारवाई*
*👉 शेतकऱ्यांना* उसाची रास्त व किफायतशीर किंमत (एफआरपी) न देणाऱ्या कारखानदारांचे धाबे दणाणले आहेत.
*💁♀️ कारण दहा कारखान्यांना* महसुली वसुली प्रमाणपत्र (आरआरसी) नोटिसा पाठवण्यात येणार असून आतापर्यंत १९ कारखान्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.
*💁♂️ या कारखान्यांकडून* सुमारे ६५६ कोटी रुपये वसूल होतील, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे.
_कृपया ही माहिती शेअर करा ज्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांनाही फायदा होईल...!_*आणि कृषिविषयक नवनवीन माहिती साथी या https://omkaragri.blogspot.com/?m=1 ला भेट देेत रहा
धन्यवाद
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा