आपल्या पिकावर चुकून तणनाशक फवारले गेले....?

प्रिय शेतकरी बंधु,
आपल्या पिकावर चुकून तणनाशक फवारले गेले....? चिंता करू नका,तर खालील प्रयोग करा. आंतरप्रवाही तणनाशक मारले गेले असल्यास त्या पिकावर पाणी फवारू नये पाणी फवारल्यास संपूर्ण झाड पाणी शोषून घेते व तणनाशकांचा परिणाम दुप्पट जाणवतो तसेच स्पर्षजन्य तणनाशक असेल तर संपूर्ण झाड पाण्याच्या फवारणी धुवून टाकले तर चालते , त्यामुळे आपण फवारलेल्या तणनाशकांची तीव्रता निश्चितच कमी होते . चुकून तणनाशक फवारले गेल्यास त्यावर एकच रामबाण उपाय आहे तो म्हणजे , *15 लिटर च्या पंपासाठी 75 ग्रॅम सेंद्रिय गूळ आणि 60 ग्रॅम डी ए पी ( डायअमोनियम फॉस्फेट ची झाड ओले होईल अशी फवारणी करणे* .
टीप- डी ए पी 2 तास भिजवून वस्त्रगाळ करून घेणे . गुळ आणि डी ए पी चे द्रावण बाधित पिकावर 7-7 तासाच्या अंतराने 4 वेळा फवारणी केल्यास 90 ते 95 % तणनाशकांचा पिकांवर झालेला परिणाम कमी होतो . बाजारात बाधित पिकावर फवारणी करण्यासाठी कोणतेच औषध नाही याची नोंद घ्यावी.
आपलाच,
कृषि महाराजा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कढीपत्ता लागवडीबाबत माहिती

कृषी सुधारणा विधेयकं(MSP) : फायदे व तोटे

_NPK जिवाणू म्हणजे काय?_* *_NPK जीवाणूंचे काम काय ?