*फवारणी केल्यानंतर पाऊस आला तर पुन्हा फवारणी करावी का ?*
💧🌨️🌧️🌨️💧🌨️🌧️🌨️
*◻️ पावसाळ्यात रोगांचा प्रादुर्भाव तुलनेने इतर हंगामांपेक्षा जास्त असतो. त्यात झडीचा व संततधार पाऊस रोगांचे नियंत्रण ठेवणे अवघड बनवतो. बऱ्याच वेळा फवारणी केल्यानंतर लगेचच पाऊस येतो त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात पुनर्फवारणी विषयी संभ्रम निर्माण होतो.*
*पुनर्फवारणी ही खालील घटकांवर अवलंबून असते*
▫️▫️▫️▪️▪️▪️▫️▫️▫️
*फवारणीनंतर किती वेळाने पाऊस आला ?*
👇👇👇👇👇👇👇
♦️फवारणीनंतर साधरणतः ३-४ तास पाऊस नको असतो.
♦️रसायन जर आंतरप्रवाही असतील तर ३-४ तासात शोषली जातात, व जर स्पर्शीय असतील तर कीटक व किडींवर ५०-६०% परिणाम केलेला असतो. अशावेळी पुनर्फवारणीची करू नये.
*कोणत्या रसायनाची फवारणी केली*
👇👇👇👇👇👇👇
ऍसिफेट सारख्या रसायनांना परिणाम करण्यासाठी १२-१४ तास लागतात त्यामुळे संततधार पाऊस चालू असेल तर ऍसिफेट ची फवारणी टाळावी. डायमेथोऍट हे सर्वाधिक जलद काम करते, मात्र लागोपाठ वापर टाळावा.
*पावसाची तीव्रता व वेग*
👇👇👇👇👇👇👇
♦️फवारणीनंतर लगेचच २० मिनिटांपेक्षा जास्त वेळ रिमझिम पाऊस चालला तर ५०-६० % फवारा धुवून जातो. अशावेळी दुसऱ्या दिवशी फवारणी करणे गरजेचे असते.
♦️फवारणीनंतर एक तासाने १५-२० मिनिटांसाठी रिमझिम पाऊस आला तर तिसऱ्या दिवशी फवारणी केली तरी चालते.
♦️थेंबाचा आकार मध्यम किंवा मोठा असेल व फवारणीनंतर १५-२० मिनिटे पाऊस चालला तर ९५% फवारा धुवून जातो. अशावेळी हवामानाचा अंदाज बघून २-३ तासानंतर फवारणी करावी. पावसाळ्यात फवारणी शक्यतो सकाळी करावी.
*फवारणी करताना घ्यावयाची काळजी*
👇👇👇👇👇👇👇
♦️हवामानाचा अंदाज बघून पाऊस येण्याआधी फवारणी टाळावी.
♦️फळबागांवर पावसाळ्यात ३ दिवसांतून एकदा बुरशीनाशकांची फवारणी आवश्यक असते.
किटकनाशकापेक्षा बुरशीनाशकांचा अधिक वापर करावा.
♦️पावसानंतर लगेच फवारणी टाळावी.कारण तुम्ही फवारलेले रसायन झाडावर पाणी असल्याने जमिनीवर पडते. परिणामी वाया जाते व जमिनीत झिरपल्याने मित्रजिवाणू मारले जातात. त्याचबरोबर विहिरीत मिसळण्याचा धोकाही असतोच.
♦️पावसाळ्यात फवारणी करताना स्टिकर, इमल्शन (चिकट द्रावण) चा उपयोग करावा, जेणेकरून रिमझिम पावसाचा फवाऱ्यावर कोणताही परिणाम होणार नाही.
*♦️*श्री समर्थ कृषी केंद्र.रिगणगांव*♦️*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा