रासायनिक खत वापरामध्ये 10 टक्के बचतीची मोहीम सन 2021-22*

*रासायनिक खत वापरामध्ये 10 टक्के बचतीची मोहीम सन 2021-22*

"एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनाचे तंत्र, हाथ साधत उत्पादनाचा मंत्र"



महाराष्ट्र शासनामार्फत यावर्षी रासायनिक खत वापरामध्ये दहा टक्के बचतीची मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेमध्ये महाराष्ट्र जिल्ह्यातील शेतक-यांनी सहभागी व्हावे, या मोहिमेच्या अनुषंगाने रासायनिक खतामध्ये बचत करण्याकरिता खालील उपाययोजनांचा अवलंब करावा असे आवाहन करण्यात येत आहे.

1. माती परीक्षणानुसार किंवा जमीन सुपीकता निर्देशांकानुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे किंवा आपल्या ग्रामपंचायतीमध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या गावाच्या जमीन सुपीकता निर्देशांकानुसार खतांचा वापर करावा.
🔰 2. रासायनिक खतांबरोबर शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत तसेच जीवाणू खतांचा एकात्मिक रित्या वापर करावा.

🔰 3. युरिया या नत्रयुक्त खताचा संतुलित व कार्यक्षमपणे वापर करण्याकरिता या खताचा एकदाच वापर न करता टप्प्याटप्प्याने (split doses) वापर करावा.

🔰 4. नत्रयुक्त खतांची बचत करण्याकरिता अझोटोबॅक्टर, रायझोबियम यासारखी जिवाणू खते तसेच हिरवळीची खते ताग, धेचा इत्यादींचा वापर करावा.

🔰 5. ऊस पिकामध्ये येणे प्रक्रियेच्या वेळी असेटोबॅक्टर जिवाणूचा शिफारशीनुसार वापर केल्यास ५० टक्क्यांपर्यंत नत्राची बचत होते.

🔰 6. स्फुरद व पालाश खातांमधील बचत करण्याकरिता अनुक्रमे स्फुरद विरघळविणारे जिवाणू तसेच के. एम. बी. यासारख्या जिवाणूसंवर्धकांचा बीजप्रक्रियेसाठी वापर करावा. त्यामुळे 20 ते 25 टक्के रासायनिक खतामध्ये बचत होते.  🔰7. रासायनिक खतांच्या कार्यक्षम वापराकरिता ठिबक सिंचनाच्या माध्यमातून विद्राव्य खतांचा वापर करावा.
त्या मुळे रासायनिक खतांच्या वापरामध्ये 20 ते 25 टक्के बचत होते.

8. ऊस पिकामध्ये काढणीनंतर पाचट कुट्टी करून शेतामध्येच कुजवावे. 
9. ज्या जिल्ह्यामधील जमिनीत प्रामुख्याने लोह व जस्त या दोन सूक्ष्म मूलद्रव्यांची कमतरता आढळते यादृष्टीने प्रती हेक्टरी वीस ते पंचवीस किलो झिंक सल्फेट व बीस ते पंचवीस किलो फेरस सल्फेट चा वापर करावा. सोयाबीन पिकासाठी खतांसोबत हेक्टरी 25 किलो सल्फरची मात्रा देण्यात यावी.

10. सूक्ष्म मूलद्रव्यांचा वापर शेणखतातून करावा.

"एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनाचे तंत्र, हाथ साधत उत्पादनाचा मंत्र"




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कढीपत्ता लागवडीबाबत माहिती

कृषी सुधारणा विधेयकं(MSP) : फायदे व तोटे

_NPK जिवाणू म्हणजे काय?_* *_NPK जीवाणूंचे काम काय ?