ह्यूमिक ऍसिड बनवा घरच्या घरी: ह्युमिक ऍसिड कसे बनवायचे
ह्यूमिक ऍसिड बनवा घरच्या घरी: ह्युमिक ऍसिड कसे बनवायचे
🛡️ ह्यूमिक ऍसिड हे खत नसून खूप कमी प्रमाणातील सूक्ष्म अन्नद्रव्य व मुख्य अन्नद्रव्य असून ते जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी वापरले जाते. तसेच पिकांच्या पांढऱ्या मुळ्यांची वाढ होण्यासाठी ह्यूमिक ऍसिड महत्वाचे असते.
🛡️ सध्या पीक उत्पादन वाढीच्या स्पर्धेमध्ये रासायनिक खतांचा वापर वाढल्याने जमिनीतील सूक्ष्मजीवांची संख्या आणि जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी झाला आहे, तसेच शेतीच्या खर्चात वाढ झालेली आहे. त्यासाठी घरच्या घरी कमी खर्चात तयार करता येईल आणि जमिनीचे आरोग्य सुधारतील अशा विविध पर्यायांपैकी एक आहे ते ह्यूमिक ऍसिड. हे घरच्या घरी कसे करायचे ते पाहुयात –
➡️ आवश्यक साधने –
⭕ ५-७ किलो गाईच्या शेणाच्या गोवऱ्या, ४० लिटर पाणी २०० ग्राम बेसन पीठ, १ किलो दही , १ किलो गूळ , ४० लिटर क्षमतेचा ड्रम
➡️ तयार करण्याची पद्धती –
1️⃣ २० लिटर पाण्यात शेणाच्या गोवऱ्या टाका, त्यामध्ये १ किलो दही, १ किलो गुळ, २०० ग्राम बेसन पीठ मिसळून घ्या.
2️⃣ राहिलेले पाणी त्यामध्ये मिक्स करून त्या ड्रमचे झाकण लावून घ्या.
3️⃣ हा ड्रम सावलीमध्ये १०-१५ दिवसापर्यंत ठेवावा. दिवसातून एकदा ते मिश्रण गोलाकार ढवळा.
4️⃣ १०-१५ दिवसांनी ते मिश्रण कापडाच्या साहाय्याने गाळून तुम्ही आळवणीसाठी वापरू शकता.
⭕ १-२ लिटर प्रति एकर या प्रमाणात ड्रीप वाटे किंवा पाटाच्या पाण्यावाटे पिकाला द्यावे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा