ट्रायकोग्रामा ः परोपजीवी मित्र कीटक

 ट्रायकोग्रामा ः परोपजीवी मित्र कीटक

ट्रायकोग्रामा हे परोपजीवी कीटक शेतामध्ये सोडले जातात. ते पतंगवर्गीय हानिकारक किडींची अंडी शोधून त्यात आपली अंडी घालतात. ही अंडी १६ ते २४ तासांत उबतात. अंड्यातून निघालेली ही ट्रायकोग्रामाची अळी यजमान किडींच्या अंड्यातील गर्भाचा भाग खाऊन ३ ते ४ दिवस कोषावस्थेत जाते.

 



ट्रायकोग्रामा हे परोपजीवी कीटक शेतामध्ये सोडले जातात. ते पतंगवर्गीय हानिकारक किडींची अंडी शोधून त्यात आपली अंडी घालतात. ही अंडी १६ ते २४ तासांत उबतात. अंड्यातून निघालेली ही ट्रायकोग्रामाची अळी यजमान किडींच्या अंड्यातील गर्भाचा भाग खाऊन ३ ते ४ दिवस कोषावस्थेत जाते.


निसर्गामध्ये सजीवांची अन्नसाखळी असते. “जीवो जीवस्य जीवनम्” म्हणजेच एक जीव दुसऱ्या जिवाला खातो. हे परोपजीवी, परभक्षी आणि सूक्ष्म जीव हे सतत निसर्गामध्ये कार्यरत असल्यामुळे अनेक हानिकारक किडींच्या उद्रेकाला अटकाव होण्यास मदत होते. त्यातील परोपजीवी मित्र कीटकांपैकी ट्रायकोग्रामा हा एक महत्त्वाचा मित्रकीटक आहे. तो हानिकारक किडींच्या बंदोबस्तासाठी भारत व इतर देशांत सरस ठरला आहे.

 


ट्रायकोग्रामाची ओळख 

ट्रायकोग्रामा हा कीटक गांधीलमाशीच्या वर्गातील असून, आकाराने अतिशय लहान आहे. त्याची लांबी ०.४ ते ०.७ मिमी व जाडी ०.१५ ते ०.२५ मिमी एवढी असते.


ट्रायकोग्रामाचे जीवनक्रम 


ट्रायकोग्रामाचा जीवनक्रम ८ ते १० दिवसांत पूर्ण होतो. हिवाळ्यात त्याचा जीवनक्रम ९ ते १२ दिवसांपर्यंत असतो.

अंडी अवस्था १६ ते २४ तास असते.

अंडी उबल्यानंतर अळी अवस्था २ ते ३ दिवसांत पूर्ण होते.

कोषाची पूर्वअवस्था २ दिवसांत, तर कोषावस्था २ ते ३ दिवसांत पूर्ण होते.

प्रौढ २ ते ३ दिवस जगतात. प्रौढ अवस्थेत ट्रायकोग्रामाची एक मादी १०० अंडी घालू शकते.


ट्रायकोग्रामामुळे नियंत्रण कसे होते?

ट्रायकोग्रामा गांधीलमाशीच्या अनेक प्रजाती जगभरात आढळतात. भारतामध्ये ट्रायकोग्रामाच्या २६ प्रजाती आढळून येतात. ट्रायकोग्रामा चिलोनीस, ट्रायकोग्रामा जॅपोनिकम, ट्रायकोग्रामा बॅक्ट्री, ट्रायकोग्रामा ब्राझीलेन्सीस, ट्रायकोग्रामा प्रिटीओसम या महत्त्वाच्या प्रजाती आहेत. या कपासीवरील बोंड अळ्या, उसावरील खोडकिडा, मक्यावरील लष्करी अळी व खोडकिडा, टोमॅटोवरील अळी यांचे प्रभावी नियंत्रण करू शकतात.


ट्रायकोग्रामा हे परोपजीवी कीटक शेतामध्ये सोडले जातात. ते पतंगवर्गीय हानिकारक किडींची अंडी शोधून त्यात आपली अंडी घालतात. ही अंडी १६ ते २४ तासांत उबतात. अंड्यातून निघालेली ही ट्रायकोग्रामाची अळी यजमान किडींच्या अंड्यातील गर्भाचा भाग खाऊन ३ ते ४ दिवस कोषावस्थेत जाते. अशा प्रकारे ट्रायकोग्रामाच्या अंडी, अळी व कोष या तिन्ही अवस्था यजमान किडींच्या अंड्यातच पूर्ण होतात. यानंतर अंड्याना छिद्र पाडून ट्रायकोग्रामाचे प्रौढ बाहेर पडतात. प्रौढ २ ते ३ दिवस जगतात. अशाप्रकारे ट्रायकोग्रामा हानिकारक किडींच्या अंड्यामध्येच आपली अंडी घालत असल्यामुळे नुकसान करणारी अळी तयारच होत नाही.


ट्रायकोग्रामाची निर्मिती कशी करतात?

ट्रायकोग्रामा निसर्गात असले तरी त्यांची संख्या प्रयोगशाळेत गुणन करून वाढवता येते. त्यांचा वापर करता येते. भारतात ट्रायकोग्रामा वाढविण्यासाठी तांदळावरील पतंगाची (Corcyra cephalonica) अंडी वापरली जातात. त्यासाठी तांदळावरील पतंगाची अंडी शास्त्रीयदृष्ट्या प्रयोगशाळेत उत्पादित केली जातात.


ट्रायकोकार्ड 


ट्रायकोकार्डची साठवण करता येते का ?

प्रयोगशाळेत कार्डवर तांदळावरील पतंगाच्या अंड्याचे परोपजीवीकरण झाल्यानंतर ऋतुमानानुसार साधारणत: ७ ते ९ दिवसात ट्रायकोग्रामाचे पूर्ण वाढ झालेले प्रौढ बाहेर पडतात. पूर्णपणे काळे पडलेले ट्रायकोकार्ड हे बाहेर पडण्यापूर्वी किडींच्या नियंत्रणासाठी वापरणे आवश्यक असते. मात्र त्वरित वापर करणे शक्य नसल्यास हे कार्ड १० अंश सेल्सिअस तापमानास फ्रीजमध्ये १० ते १५ दिवसापर्यंत साठवता येतात. वापरण्यापूर्वी फ्रीजमधून काढून थोडावेळ सामान्य तापमानाला ठेवल्यानंतरच त्यांचा शेतात वापर करावा.


ट्रायकोकार्ड कसे वापरावे?

 


ट्रायकोकार्डवर परोपजीवीकरण दिनांक, ट्रायकोग्रामा बाहेर पडण्याचा अपेक्षित दिनांक व कार्ड वापरण्याचा अंतिम दिनांक इ. माहिती दिलेली असते. कार्डच्या मागील बाजूने वापरण्यासंबंधीच्या


महत्त्वाच्या सूचना दिलेल्या असतात. त्या वाचून ट्रायकोकार्डवरील आखलेल्या १० पट्ट्या कात्रीने हळुवार कापून घ्याव्यात. या ट्रायकोकार्डचे १० तुकडे होतात. त्यानंतर झाडाच्या पानाच्या खालील बाजूस पट्टीचा रिकामा भाग स्टॅपलरने किंवा टाचणीने टोचाव्यात. प्रत्येक ८ ते १० मीटर या समान अंतरावर लावावेत. कापूस, ज्वारी, मका, ऊस, टोमॅटो, भेंडी या पिकांमध्ये पेरणीपासून ४० ते ४५ दिवसांनी प्रादुर्भाव दिसून येताच शिफारशीप्रमाणे प्रति एकरी वापरावे.

 


वापरासंबधी सूचना 


ट्रायकोकार्ड हे कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ किंवा शासकीय प्रयोगशाळेकडून विकत घ्यावे.

खरेदी करताना परोपजीवी कीटक बाहेर पडण्याची तारीख बघून घ्यावी. मुदतीपूर्वीच वापरावे.

वापरण्याआधी त्यावर दिलेल्या वापरासंबंधीच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.

प्रखर सूर्यप्रकाश, कीटकनाशके, मुंग्या व पालीपासून कार्ड दूर ठेवावे.

काही काळ ठेवायचे असल्यास ट्रायकोकार्ड फ्रीजमध्ये अथवा थंड ठिकाणी सुरक्षित ठेवावे.

ट्रायकोकार्ड सकाळी किंवा संध्याकाळी शेतात लावावे.

शेतात ट्रायकोकार्डचा वापर केल्यानंतर १० ते १५ दिवस रासायनिक कीटकनाशकांचा वापर करू नये.


फायदे 

ट्रायकोग्रामा हे नैसर्गिकरीत्या हानिकारक किडींचे नियंत्रण करत असल्यामुळे पर्यावरणासाठी पूरक ठरते. अन्य मित्र कीटकांवर विपरीत परिणाम होत नाही.

किडींची अंडी शोधून नष्ट केली जात असल्याने हानिकारक किडींचे प्रभावी नियंत्रण होते.

कीटकनाशकांच्या तुलनेत पीक संरक्षणावर कमी खर्च होतो.


- डॉ. अमोल काकडे, ९४०४१४४५६५

(विषय विशेषज्ञ -पीक संरक्षण), कृषी विज्ञान केंद्र, परभणी)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कढीपत्ता लागवडीबाबत माहिती

कृषी सुधारणा विधेयकं(MSP) : फायदे व तोटे

_NPK जिवाणू म्हणजे काय?_* *_NPK जीवाणूंचे काम काय ?