प्रत्येक शेतकऱ्याकडे ‘हे’ भन्नाट मोबाईल अ‍ॅप्स असायला हवेच!

प्रत्येक शेतकऱ्याकडे ‘हे’ भन्नाट मोबाईल अ‍ॅप्स असायला हवेच!

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अनेक मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्स सुरु केले गेले आहेत. या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीच्या नव्या पद्धती, तंत्रज्ञान आणि योजनांविषयी माहिती पुरवली जात असते. सध्याची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांनाही हे अ‍ॅप्स वापरणे सोपे आहे. अशीच काही महत्वपूर्ण अ‍ॅपची माहिती आज पाहूयात…!

किसान सुविधा अ‍ॅप : या अ‍ॅपवर तुम्हाला शेतीसंबंधीच्या माहितीसोबतच इतर बरीच माहिती मिळते आहे. या अ‍ॅपवर पुढील पाच दिवसांच्या हवामानाचा अंदाज तुम्ही पाहू शकता. तसेच पिकांचा बाजारभाव, शेतीविषयक सल्ले, पीक संरक्षण आदी गोष्टींविषयीही देखील माहिती मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांचे नियोजन आणि बाजारात पीक कधी विकायचे? याचा अंदाज येतो. याशिवाय, या अ‍ॅपवर कृषी तज्ज्ञ आणि जाणकरांकडून सल्लेही दिले जात असतात.
केळ्याची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीचे अ‍ॅप : हे अ‍ॅप भारतीय कृषी अनुसंधान परिषद आणि राष्ट्रीय केळी अनुसंधान केंद्राकडून केळीची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी चालविले जाते. या अ‍ॅपचे नाव बनाना प्रॉडक्शन टेक्नॉलॉजी असे असून हे अ‍ॅप सध्या हिंदी, इंग्रजी आणि तामिळ भाषेत काम करते. या अ‍ॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामान, माती, केळीची रोपे, त्यांना पाणी कसे द्यायचे? आदी बाबींची सविस्तर माहिती दिली जाते.

मेघदूत मोबाईल अ‍ॅप : या अ‍ॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत शेतीविषयीची माहिती मिळते. यामध्ये हवामान, पिकं आणि पशुपालनाच्या समस्यांवर मार्गदर्शन केले जाते. हे अ‍ॅप भारतीय हवामान विभाग, भारतीय उष्णकटीबंधीय हवामान विभाग आणि राष्ट्रीय कृषी समिती यांच्याकडून संयुक्तपणे चालविले जाते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कढीपत्ता लागवडीबाबत माहिती

कृषी सुधारणा विधेयकं(MSP) : फायदे व तोटे

_NPK जिवाणू म्हणजे काय?_* *_NPK जीवाणूंचे काम काय ?