पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

निंबोळी पावडरचे शेतीमधील कार्य.

इमेज
निंबोळी पावडरचे शेतीमधील कार्य. निंबोळी पावडर हे संपूर्ण नैसर्गिक स्वरुपामधील निंबोळी पावडर असल्याने जमिनीमधील कोणत्याही उपयुक्त जिवाणुंना हानी पोहचत नाही. निंबोळी पावडर हे रासायनिक खतांमध्ये मिसळून वापरल्याने रासायनिक खतांमधील नत्र टिकून राहते. निंबोळी पावडर पिकांचे सूक्ष्मकृमींच्या, सुत्रकृमींच्या प्रादुर्भावापासून १००% संरक्षण करते. निंबोळी पावडर मर रोगाच्या प्रमाणामध्ये घट करते.  निंबोळी पावडरच्या वापरामुळे जमिनीमधील मातीचे कण एकमेकांना चिटकत नाहीत. यामुळे जमिनीमध्ये हवा खेळती राहते. निंबोळी पावडर जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते. तसेच मातीमधील ह्युमसचे प्रमाण वाढवून पिकांच्या पांढऱ्या मुळांची वाढ होण्यास मदत होते. निंबोळी पावडरच्या वापरामुळे जमिनीचा सामू चांगला राखला जातो. परिणामी ऊत्पादन व गुणवत्ता वाढते. निंबोळी पावडरच्या वापराचे प्रमाण सर्व पिकांमध्ये वापरास योग्य असणारी ही निंबोळी पावडर एकरी १५० किग्रॅ वापरण्याची शिफारस आहे फळबागेमध्ये वापर करायचा असल्यास २०० ग्रॅम प्रति झाड(१ वर्ष) या प्रमाणामध्ये चांगल्या कुजलेल्या शेणखतासोबत द्यावे सेंद्रिय, रेसिड्य...

विहीर पुनर्भरण करा आणि वाढवा भूजल साठा

इमेज
विहीर पुनर्भरण करा आणि वाढवा भूजल साठा सध्या पिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी विहीर आणि बोरवेल मधून अमर्यादित स्वरूपात पाण्याचा उपसा करण्यात येतो.त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात खालावत आहे.ज्या वेगाने पाण्याचा उपसा होतो त्याच वेगाने पाण्याचे पुनर्भरण करण्यासाठी प्रयत्न केले जात नाही. परिणामी भूजल साठा कमी होऊनविहीर आणि बोरवेल ची पाणी पातळी लक्षणीयरीत्या घटली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यावर सर्वात उत्तम उपाय म्हणजे जलपुनर्भरण हे होय.या लेखात आपण विहीर पुनर्भरणाचे तंत्र जाणून घेणार आहोत. विहीर पुनर्भरणाचे तंत्र या तंत्रामध्ये पावसाळ्यात शेत जमिनीतून वाहणारे पावसाचे पाणी एकत्रितपणे वळवून विहिरीजवळ आणावे.या वळलेल्या पाण्याचा उपयोग विहीर पुनर्भरणासाठी करावा. यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे वाहणारे पाणी सरळ विहिरीत सोडू नये. कारण त्यामुळे वाहणाऱ्या पाण्यासोबत आलेली माती आणि गाळ विहिरीत साठवू शकतो. कोरडवाहू शेती संशोधन केंद्राने विहीर पुनर्भरण तंत्रज्ञान विकसित केले आहे.या तंत्रामध्ये दोन प्रकारच्या गाळण यंत्रणा आहेत.त्...

रब्बीच्या तोंडावर 'डीएपी' खताचा तुटवडा मग चिंता कशाला हे आहेत पर्याय

इमेज
रब्बीच्या तोंडावर 'डीएपी' खताचा तुटवडा मग चिंता कशाला हे आहेत पर्याय खरीपातील उत्पादन घटण्याचे दु:ख बाजूला सारुन बळीराजा पुन्हा रब्बी हंगामाच्या तयारीला लागला आहे. पुर्वमशागतीचे कामेही पूर्ण झाली आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या समस्या संपण्याचे नाव घेत नाहीत. (Rabi Season) रब्बीतील पिकांची जोमात वाढ होण्यासाठी बाजारात केवळ (DAP fertilizer shortage) डीएपी (डायमोनेम फॅास्फेट) 18:46 या खताचा तुटवडा भासू लागला आहे. हे काय यंदाचीच समस्या नाही. कोणताही हंगाम सुरु झाला की ज्या खतांची मागणी अधिक असते त्याच खताचा तुटवडा हे ठरलेले आहे. सध्या शेतकरी याच खतासाठी कृषी केंद्रावर हेलपाटे मारत आहे. पण खत नसल्याने निराशा होत आहे. मात्र, शेतकऱ्यांनीही याच खताचा अट्टाहास न घेता उत्पादन वाढीसाठी अनेक खत बाजारात आहेत. त्याच्याच बाबतीत आज आपण माहिती घेणार आहोत. खऱीपातील नुकसान भरुन काढण्यासाठी पुन्हा एकदा बळीराजा सज्ज झाला आहे. यंदा अधिकच्या पावसामुले पोषक वातावरणही आहे. शिवाय हरभऱ्याचे उत्पादन वाढणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे वाफसा झाला असेल तर केवळ डीएपी या खतासाठी शेतकऱ्या...

शेती चा कसं कमी का झाला व कश्या मुळे होतो?

इमेज
शेती चा कसं कमी का झाला व कश्या मुळे होतो? याचे प्रमुख कारण म्हणजे वातावरणात अचानक होनारे बदल , रासायनिक खते व औषधे यांना प्रभावी पर्याय नसल्याने त्यांचा होनारा भरमसाट वापर त्यामुळे जमीन व पाणी विषाक्त बनली आहे.आजच्या दिवसांत पिकावरील नवं नवीन रोग व तनांंचा बंदोबस्त न होने , भरपूर खते टाकूनही ती लागु न पडणे परिणामी पिके रोगराई मुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे शेतकरी पुर्णपणे हताश व निराश झालेला आहे. मंडळी हे कशामुळे घडते आहे माहीत आहे का ?   तर याचे मुख्य कारण म्हणजे शुद्ध गावरान भाषेत जमिनीचा किंवा मातीचा कस कमी झाला आहे. जमिनीचा कस म्हणजे काय ?  जमिनीत ह्युमसचे म्हणजे आँरगँनिक कार्बनचे व पोषक द्रव्यांची माती सोबतअसलेले प्रमाण म्हणजे कस. सेंद्रीय कर्बाची पातळी भरून काढण्यासाठी हिरवळीचे खते, जिवाणू संवर्धक जिवामृताचा वापर,शेनखत वापरतो पण आपल्या जसे पाहीजेत तसे परीनाम मिळत नाही यांचे कारण काय असेल आता थोडं लक्षात घेऊ आपल्या मागच्या पिढिने आपल्याला शेती सुपिक व उपजाऊ ही भेट केली होती कर्बाचे प्रमाण हि वाढल होत त्या नंतर अचानक हरीत कांती ची चाहूल लागली आपन ...

काय आहेत रासायनिक खतांचे दुष्परिणाम? जाणून घ्या

इमेज
काय आहेत रासायनिक खतांचे दुष्परिणाम? जाणून घ्या  रासायनिक खतांचा अतिरेकी वापर केला की त्याचे परिणाम पिकांवर होत असतात. त्यातून तयार होणारी धान्ये, भाज्या, फळे यांच्यामध्ये रासायनिक खतातल्या रसायनांचे अंश उतरतात आणि ती धान्ये, फळे आणि भाज्या खाण्याच्या लायक रहात नाहीत. त्यामुळेच भारतातून यूरोप खंडात पाठवल्या जाणाऱ्या या अशा उत्पादनांची तिथे गेल्यानंतर कडक परीक्षा केली जाते. शक्यतो रासायनिक खतांचा वापर न करता आणि कसलीही जंतूनाशके न वापरता निव्वळ सेंद्रीय शेती केली असेल तर त्या शेतातलाच माल कटाक्षाने विकत घेतला जातो आणि या उपरही खतांचा आणि औषधांचा वापर केलाच असेल तर त्या खतांचे आणि औषधांचे काही अंश फळांमध्ये आणि भाज्यांमध्ये उतरलेले तर नाहीत ना, याची खातरजमा केली जाते. तसे ते उतरले नसतील तरच तो माल घेतला जातो. अन्यथा तो माल परत पाठवला जातो. या बाबत ही दक्षता घेण्याचे कारण असे की, खताचे अंंश उतरलेले खाद्य पदार्थ खाल्ले तर ते खताचे रासायनिक अंश आणि औषधातील विषारी अंश आपल्या खाण्यातून रक्तात पोचत असतात. याबाबत पंजाबमध्ये दोन विदारक अनुभव आले आहेत. पंजाबमध्ये सर्वत्र समृद्धी अ...

कापूस वेचणी, प्रतवारी आणि साठवणूक करतांना घ्यावयाची दक्षता

इमेज
कापूस वेचणी, प्रतवारी आणि साठवणूक करतांना घ्यावयाची दक्षता कापसाला मिळणारा बाजारभाव हा सर्वस्वी कापसाच्या प्रतिवर अवलंबून असतो. कापसाची प्रत राखण्याकरिता वेचणी करतांना काळजी घेणे आवश्यक आहे. वेचणी सुरु झाल्यापासून साधारणतः ३ ते ४ वेचणीत बराचसा कापूस गोळा होतो. आपल्याकडे वेचणी करताना काळजी न घेतल्यामुळे ३० ते ३५ टक्के पालापाचोळा व इतर केरकचरा रुइमध्ये आढळतो. या बाबींचा धाग्याच्या गुणधर्मावर परिणाम तर होतोच त्याचबरोबर कापड गिरणीमध्ये प्रतवारी टिकवण्यास अडचण निर्माण होते. कापसाची वेचणी करतांना घ्यावयाची काळजी :- कापूस वेचणी ठराविक कालावधीत केल्यास चांगल्या प्रतीचा कापूस मिळतो. जास्त दिवस कापूस झाडावर राहिल्यास त्याला पालापाचोळा, हवेतील धुळीचे कण, बोंड जमिनीवर पडल्यास मातीचे कण चिकटतात व त्यामुळे कापसाची प्रत खराब होते. वेचणी हि सकाळी किंवा दुपारी उशिराने करावी, जेणेकरून कापसाला पालापाचोळा चिकटून येणार नाही, बोंडे वेचतांना पालापाचोळा चिकटल्यास त्याचवेळी काढावे व स्वच्छ कापूस गोळा करावा. अपरिपक्व व अर्धवट उमललेल्या बोंडातील कापसात पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे अशा बोन्डा...

हवामान अंदाजा विषयी शेतकऱ्यांमध्ये विश्वासाच नाव आहे पंजाबराव डख, जाणून घेऊय त्यांच्याबद्दल

इमेज
हवामान अंदाजा विषयी शेतकऱ्यांमध्ये विश्वासाच नाव आहे पंजाबराव डख, जाणून घेऊय त्यांच्याबद्दल भारतामध्ये हवामानाचा अंदाज व या बाबतीत अभ्यासासाठी भारतीय हवामान खाते आहे. हवामानविषयक सगळी माहिती हवामान विभागा द्वारे प्रसारित केली जाते. परंतु हवामान विभागाच्या अंदाजावर कोणाचा किती विश्वास आहे हा एक संशोधनाचा विषय आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये एक नाव असे आहे की ज्यांच्यावर महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड प्रमाणात विश्वास ठेवतात. या विश्वासामध्ये कारणही तसेच आहेत. ते विश्वासाचं नाव आहे पंजाबराव डख. त्यांच्याबद्दल या लेखात माहितीघेऊ. कोण आहेत पंजाबराव डख ?  आपल्याला माहित आहेच कि पंजाबराव डक हवामान तज्ञाचे नाव आहे. आज महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज व्हाट्सअप आणि युट्युब वर कधी येतील याची आतुरतेने वाट बघत असतात.कारण त्यांनी केलेल्या अंदाजामुळे लाखो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान टळलेआहे तसेचअनेकांना फायदा देखील झाला आहे.  पंजाबराव डख परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील गुगळी धामणगाव येथे अंशकालीन शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना लहानपणापासून हवामानाबद्दल क...

साठवलेल्या धान्याला अजिबात किडे लागणार नाही, हे करून बघा

इमेज
साठवलेल्या धान्याला अजिबात किडे लागणार नाही, हे करून बघा  बऱ्याच घरांमध्ये एकत्र कुटुंब पद्धतीने राहत असल्यामुळे, त्यांना धान्याची मोठ्या प्रमाणावर साठवणूक करावी लागते. ही साठवणूक केल्यानंतर किडे किंवा अड्या धान्यांमध्ये होत असतात. त्याला जाळी लागू नये, म्हणून त्यामध्ये औषध किंवा गोळ्यांचा वापर बहुतेक जण वापर करत असतात. शेतकऱ्यांनी शेतातील उत्पादन काढल्यानंतर ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, मक्का, हरभरे हे काढल्यानंतर शेतकरी धन्याला जोपर्यंत चांगला भाव मिळत नाही. तोपर्यंत आपल्याकडे साठवून ठेवत असतो. कारण की त्याला व्यवस्थित भाव मिळत नाही तोपर्यंत शेतकरी धन्य विक्रीला काढत नाहीत आणि ही साठवणूक करत असताना शेतकऱ्यांच्या मनात एक भीती दडलेली असते. हे धान्य साठवल्यानंतर त्याला वेगवेगळे किडे लागतात. त्यामुळे धान्याची नासाडी व्हायला लागते किंवा साठवलेल्या धान्यामध्ये सुंडे होतात. कडधान्याचा आपण विचार केला तर हरभरे किंवा तूर असेल तर ते किडे आत मध्ये जाऊन बसतात. कितीही प्रयत्न केले तरी ते बाहेर निघत नाही आणि सर्व कडधान्य पोकळ करून टाकतात. तसेच या धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी त्याला वेग...

शेतात पिकांना युरिया वापरतात, तर जाणून घ्या युरियाच्या अतिवापराचे परिणाम

इमेज
शेतात पिकांना युरिया वापरतात, तर जाणून घ्या युरियाच्या अतिवापराचे परिणाम युरिया खत हे इतर खतांच्या तुलनेत स्वस्त आहे. तसेच कुठल्याही खतापेक्षा पटकन परिणाम देणारेखत आहे. त्यामुळे शेतकरी बंधू युरियाच्या वापराला अधिक पसंती देतात. जर आपण खतांचा विचार केला तर नत्रयुक्त रासायनिक खतांमध्ये युरिया चा वापर सर्वाधिक केला जातो. युरिया मध्ये 46 टक्के नत्र अमाईड नत्र असते. युरिया हा पाण्यात पूर्णपणे विरघळणारा असतो. युरियाचे रासायनिक संरचना पाहिली तर युरिया मध्ये 20.6 टक्के ऑक्सिजन, 20 टक्के कार्बन,सात टक्के हायड्रोजन आणि एक ते दीड टक्के बाय युरेट असते. या लेखात आपण युरियाचे अतिवापराचे परिणाम जाणून घेणार आहोत. हे आहेत युरियाच्या अतिवापराचे परिणाम पिकांमध्येनत्रयुक्त खतांचा वापर केला तर पिकांची शाकीय वाढ होते. त्यामुळे पिकांमध्ये किडींचा प्रादुर्भाव वाढतो त्यामुळे उत्पादनात घट येते. युरियाच्या अतिवापराने पिकांमध्ये लुसलुशीत पणा राहून खोड नाजुक राहते. त्यामुळे पीक जमिनीवर लोळतेतसेच पिकाचा कालावधी वाढतो. युरिया चा अति वापर केल्याने त्याचा परिणाम हा जमिनीच्या आरोग्यावर होतो.जमिनीतील कर्ब आ...

हिरवळीची खते"जमिनीची सुपीकता तसेच पिक उत्पादन वाढविण्यासाठी सेंद्रिय उपाय...

इमेज
हिरवळीची खते"जमिनीची सुपीकता तसेच पिक उत्पादन वाढविण्यासाठी सेंद्रिय उपाय...  हिरवळीचे खते: सेंद्रिय पध्दतीने शेती करण्यात हिरवळीच्या खतांचे प्रयोग :- हिरवळीची खते सेंद्रिय पदार्थ तसेच पिकांच्या अन्नद्रव्यांचा जमिनीतील साठा वाढावा यासाठी हिरवे पिक जमिनीत गाडण्याची प्रक्रिया पार पाडली जाते. अशा प्रक्रियेतून तयार झालेल्या खतांना हिरवळीचे खत वा बिवड म्हणतात. पावसाळ्यातील पहिल्या पावसात हिरवळीच्या खताचे बी पेरले जाते, व तयार झालेले पिक जमिनीत गाडले जाते. बरयाचदा करंज, भेंड, अंजन व ग्लीरीसिदिया या वनस्पतीची पानेही जमिनीत गाडली जातात. हिरवळीचे खत तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी पिके/वनस्पती व त्यातील नत्राचे प्रमाण : पिकाचे नाव नत्राचे शेकडा प्रमाण ताग (भोरू) ०.४६ चवळी ०.४२ गवार ०.४९ सुर्यफुल ०.४५ हरभरा ०.५० सोयाबीन ०.७१ उडीद ०.४७ मटकी ०.३५ लसून घास ०.७३ करंज २.६१ अंजन १.४२ ऐन २.०४ भेंड २.९० गिरिपुष्प २.७४ हिरवळीचे खत तयार करताना घ्यावयाची काळजी : पिक लवकर भरपूर वाढणारे असावे. पिक रसरशीत व तंतूचे असावे ज्यायोग्य ते लवकर कुजते. पिक कोणत्याही जमिनीत वाढणारे व शक्यतो शेंगाकुल...

जाणून घ्या फळबागांवर पडणारा थंडीचा परिणाम आणि उपाय योजना

इमेज
जाणून घ्या फळबागांवर पडणारा थंडीचा परिणाम आणि उपाय योजना कोणत्याही वनस्पतीच्या वाढीवर हवामानाचा कमी-जास्त प्रमाणात परिणाम होत असतो. फळबाग पिकांमध्ये तापमान बदलाचा निश्चित परिणाम होतो. हिवाळ्यामध्ये दहा अंश सेंटिग्रेड तापमान कमी झाले तर त्याचा पीक वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. हे टाळण्यासाठी हिवाळ्यात फळबागांची विशेष काळजी घ्यायला हवी. कमी तापमानामुळे झाडाची वाढ मंदावते, जमिनीचे तापमान कमी होते तसेच वनस्पतींच्या पेशीमरतात. फळबागांमध्ये फळे तडकतात यामध्ये प्रामुख्याने द्राक्ष, केळी, डाळिंब, पपई इत्यादी फळपिकांचा समावेश असतो.अशा फळांना योग्य बाजारभाव मिळत नाही. केळी पिकामध्ये घड बाहेर पास्त नाही. रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढतो.  उष्ण हवामानात वाढणाऱ्या फळझाडांच्या मोहराला शितल लहरी मुळे जास्त नुकसान पोहोचत आंब्याचा मोहोर जळतो. सदाहरित झाडे ही पानगळ होणाऱ्या झाडांपेक्षा लवकर आणि जास्त प्रमाणात नाजूक असून थंडीच्या दुष्परिणामस बळी पडतात.तापमान दोन अंश सेंटिग्रेड च्या खाली गेल्यास पपईची वाढ थांबते. फळांची प्रत बिघडते तसेच जास्त थंडीमुळे झाडे मरतात. केळीच्या बाबतीत तापमान चार ते...

झिंक विषयी जाणून घेऊया

इमेज
झिंक विषयी जाणून घेऊया झिंकचे पिका मधिल कार्य – • ऑक्झिन्स च्या निर्मितीमध्ये गरजेचे अन्नद्रव्य. प्रामुख्याने इंडॉल असेटिक असिडच्या निर्मितीत सहकार्य करते, ज्यामुळे पिकाची शेंड्याची वा जोमदार होण्यात मदत मिळते. • प्रथिनांच्या निर्मितीसाठी गरजेच्या एन्झाईम्सची निर्मिती करते. तसेच पिकामधिल शर्करेच्या वापरासाठी गरजेचे आहे. • झिंक पिकामध्ये स्टार्च तयार करणे आणि मुळांच्या वाढीसाठी गरजेचे आहे. • झिंक बिज (सीड) आणि खोडाच्या पक्वतेवर परिणाम करते. • झिंक हरीतलवक आणि कर्बोदकांच्या निर्मितीत गरजेचे आहे. • पिकाच्या पेशीमधिल योग्य प्रमाणातील झिंक च्या उपस्थितीमुळे पिक कमी तापमानात देखिल तग धरुन राहते. झिंकच्या उपल्धतेवर परिणाम करणारे घटक- • जमिनीचा सामु- मातीचा सामु जास्त असल्यास झिंक ची कमतरता जाणवते. मात्र हा नियम सर्वच ठिकाणी लागु होत नाही, असिडीक स्वरुपातील झिंकचा वापर करुन हि कमतरता दुर करता येते. • झिंक आणि स्फुरद (फॉस्फोरस) चे गुणोत्तर – जास्त प्रमाणातील स्फुरद मुळे झिंक ची कमतरता जाणवते. • नत्राची कमी प्रमाणातील उपल्बधता पिकाच्या वाढीवर करित असलेल्या दुष्परिणांमुळे ईतर अन्नद्रव...

ई पीक पाहणी न केल्यास शेतकऱ्यांचा सातबारा कोरा राहणार का?

इमेज
ई पीक पाहणी न केल्यास शेतकऱ्यांचा सातबारा कोरा राहणार का? शेतकरी आता स्वत: शेतातल्या पिकांची नोंद सातबारा उताऱ्यावर करू शकणार आहेत. यासाठी कृषी आणि महसूल विभागानं संयुक्तपणे ई-पीक पाहणी नावाचा उपक्रम हाती घेतला आहे. याशिवाय रब्बी हंगामातील पिकांची नोंदणी शेतकरी 16 ऑक्टोबरपासून करू शकणार आहेत, असंही त्यांनी सांगितलं आहे. एखादा शेतकरी काही तांत्रिक किंवा इतर अडचणींमुळे पीक पाहणी करू शकला नाही, तर त्याचा सातबारा उतारा कोरा राहणार नाही आणि त्याला सरकारी योजनांपासून वंचित ठेवलं जाणार नाही, असंही जगताप यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, ई-पीक पाहणी उपक्रम काय आहे, त्याचे फायदे काय आहेत, शेतकऱ्यांना पीक पाहणी करताना कोणत्या अडचणी येत आहेत आणि त्यावर सरकारचं काय म्हणणं आहे, या सगळ्यांवर बीबीसी मराठीनं महाराष्ट्र राज्याच्या ई-फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा संपादित अंश इथं देत आहोत . प्रश्न - ई- पीक पाहणी प्रकल्प नेमका काय आहे? उत्तर - शेतकऱ्यानं स्वत: आपल्या शेतातल्या पिकांची नोंद ऑनलाईन पद्धतीनं नोंदवणं याला ई-पीक पाहणी असं म्हटलेलं आहे...

गांडूळखत शेतीस वरदान

इमेज
गांडूळखत शेतीस वरदान  देशाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता शेतकरी बांधवांना अन्नधान्याची पूर्तता करण्यासाठी अधिकाधिक पिके घेणे तसेच त्याच जमिनीवर प्रति हेक्टरी उत्पादन वाढविणे अनिवार्य आहे. परंतु असे असले तरी ज्या पद्धतीने रासायनिक खतांचा बेसुमार वापर वाढला आहे, त्याचा विपरीत परिणाम पर्यावरणावर दिसून येत आहे. दिवसेंदिवस जमिनीची उपजाऊक शक्ती कमी होत आहे. जमिनीतील सूक्ष्मजीवांची संख्या घटून त्या मृतप्राय झालेल्या आहेत. शेतजमिनीची भौतिक, रासायनिक व जैविकदृष्टय़ा अपरिमित हानी होत आहे.. म्हणूनच सेंद्रिय खताचा अधिकाधिक वापर शेतीत केला पाहिजे. गांडूळ खत हे आज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत आहे. त्यावर यापुढील काळात भर देण्याची नितांत गरज आहे. गांडूळ खत म्हणजे काय ? गांडूळ हा ओलसर मातीत राहणारा, लांब शरीर असणारा, सरपटणारा प्राणी आहे.तो जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खातो. ते खाल्ल्यानंतर त्याच्या शरीराला आवश्यक असा भाग सोडून उर्वरित भाग विष्ठा म्हणून शरीरातून बाहेर टाकतो, त्यालाच गांडूळ खत किंवा वर्मिकंपोस्ट असे म्हणतात.गांडूळ जैविक पदार्थांचे सुपिक मातीत रुपांतर करतो...

दुधाळ जनावरे घेताना कशी घ्यावी काळजी

इमेज
दुधाळ जनावरे घेताना कशी घ्यावी काळजी दुग्ध व्यवसायासाठी बाजारातून जनावरे विकत घेताना अनेक गोष्टींवर लक्ष देणे आवश्यक आहे.त्यात महत्त्वाचे म्हणजे पशुपालकांची गरज,त्याचे आर्थिक क्षमता,पाणी व हिरव्या चाऱ्याची उपलब्धता या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याकडील उपलब्ध परिस्थितीत दुधा जनावराची कोणती जात नफा देऊ शकेल अशी जात निवडावी. जर फक्त दूध उत्पादन हाय पशुपालकाचे हेतू असेल तर म्हैस पालन करणे कधीही उत्तम ठरते. या लेखात आपण दुधाळ जनावरांची निवड करताना कोणती काळजी घ्यावी याविषयी माहिती घेऊ. दुधाळ जनावरांची निवड कशी करावी? जनावराचा पाठीचा कणा वाकलेला असू नये. जनावरांची पहिली बरगडी दिसते स्वाभाविक असले तरी तिसरा बरगडी पर्यंत दिसणारी जनावरे अशक्त या प्रकारात मोडतात. गाईच्या पोटाचा तसेच छातीचा भाग लांब, खोल आणि रुंद असावा. उत्तम खाद्य पचवण्याची क्षमता असलेल्या जनावरांची निवड करावी. कास आणि सडाची तपासणी करावी. कासेची खोली मापक व क्षमता पुरेशी असावी. सड काशेच्या प्रत्येक चतुर्थांश प्रमाणबद्ध असावी. काटकोनात स्थित असावेत.मागील कास रुंद, उंच व घट्टपणे शरीराशी  संलग्न असावी. किंचित व...

जमीन सजीव सुपीक कशी ठेवावी

इमेज
जमीन सजीव सुपीक कशी ठेवावी   १ ) कोणत्याही पिकाच्या उत्पादन वाढीसाठी जमीन सजीव असण फार महत्वाच आहे . जमीन निर्जीव असेल तर किती पण खते वापरा येणार उत्पादन फारच कमी येते . २ ) उन्हाळ्यात जमीणीची नांगरट करून चांगली तापु द्यावी . उन्हाळ्यात जमीन तापल्याने काही महत्वाच्या घटना घडतात . उन्हाची किरणे जमीणीतील ढेकळांना भेदुन आतपर्यंत जातात . त्यामुळे पुर्वी दिलेल्या खतापैकी जमीनीत घट्ट स्थीरावलेले अन्नघटकांचे बंदीस्त कण मोकळे होतात .जमीण तापल्यानंतर मातीतले अॅक्टीनोमायसेस्ट व इतर उपयुक्त जिवाणु तापले जातात . अशा तापलेल्या मातीवर वळवाचा पाऊस पडताच ते कार्यान्वीत होतात . व त्यावेळी त्या मातीचा सुगंध दरवळु लागतो . जमीणीत असणाऱ्या अळ्या .ऊपद्रवी किंडी . कोष हे बाहेर येतात व मरतात . काही पक्षांचे भक्षक होतात . ३ ) पिकांचे फेर पालट करणे फार गरजेचे आहे .एकच पिकपद्धती मुळ अपेक्षीत उत्पादन तर निघत नाहीच पण जमीणीचे आरोग्य फार बिघडते . उदा . आपण रोज एकच भाजी खाऊ लागलो तर आपल्याला तिचा कंटाळा येवु लागतो . तसच पिकाच पण आहे . आपण बोलु शकतो पण जमीण आपल्याला सांगु शकत नाही . म्हणुन तिच आरोग्य...

पशुधन विमा योजना; जनावरांच्या मृत्यूनंतर सरकार देईल आर्थिक मदत

इमेज
पशुधन विमा योजना; जनावरांच्या मृत्यूनंतर सरकार देईल आर्थिक मदत  भारताचा प्रमुख व्यवसाय शेती असून बहुतांश शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करतात. पशुपालन त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावले आहे. परंतु बऱ्याच वेळेस नैसर्गिक आपत्ती जसे की अतिवृष्टी, पूर, विजा पडणे इत्यादी कारणांमुळे जनावरे दगावतात. तसेच एखाद्या गंभीर आजारामुळे देखील जनावरे मृत्यू पावतात. त्यामुळे पशुपालकांना जबर आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते.यासाठी सरकारने पशुधन विमा योजना आणली आहे. या योजनेमध्ये जनावरांच्या मृत्यूमुळे नुकसानीची भरपाई करून सरकार गुरांच्या मालकांना आर्थिक मदत देते  या योजनेद्वारे विमा कसा काढावा?  या योजनेअंतर्गत विमा काढण्यासाठी सर्वप्रथम जनावरांच्या मालकांना त्यांच्या जिल्ह्याच्या जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात विमा काढणे बाबत संपूर्ण माहिती द्यावी लागते. त्यानंतर तेथे जनावरांची आरोग्य तपासलेजाते.त्यानंतर आरोग्य प्रमाणपत्र दिले जाते. या विम्याच्या प्रक्रियेदरम्यान प्राण्यांच्या कानावर 1टेग लावला जातो.त्यानंतर पशुधन मालकांना पशु विमा पॉलिसी जारी केली जाते...

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत बदल, जाणून घेऊया योजनेबद्दल सविस्तर

इमेज
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत बदल, जाणून घेऊया योजनेबद्दल सविस्तर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी ची फार महत्वाची योजना आहे. शेतकरी शेतात काम करत असताना जर विज पडणे, सर्पदंश, पूर, विंचू दंश, विजेचा शॉक लागणे नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात तसेच रस्त्यावरील अपघात, वाहन आपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे तर शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवला किंवा काहींना अपंगत्व येते  घरातील कर्त्या व्यक्तीच्या झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन आर्थिक अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशावेळी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अशा शेतकऱ्यांना व शेतकरी कुटुंबांना लाभदायक ठरते.  अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबांना आर्थिक लाभ देण्याकरता कुठल्याही प्रकारची स्वतंत्र विमा योजना नसल्यामुळे ही योजना फायद्याची ठरते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते.  या योजनेत अंशतः झालेला बदल अपघातग्रस्त, मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत आर्थिक मदत या योजनेच्या माध्...

शेतीसाठी क्षारयुक्त पाण्याचे व्यवस्थापन

इमेज
शेतीसाठी क्षारयुक्त पाण्याचे व्यवस्थापन नदीकाठचे तसेच कॅनॉल काठच्या सिंचनाखालील क्षेत्रातील जमिनीचे आरोग्य बिघडत चालले आहे. त्यामुळे अशा सिंचन क्षेत्रातील परिसरात भूगर्भातील पाण्यात क्षारांचे प्रमाण वाढल्याने पाणी क्षारयुक्त झाल्याचे दिसते. विहीर किंवा बोरवेलला पाणी असूनही मनुष्यास/जनावरास पिण्यायोग्य राहिले नाही आणि शेतीला वापरताना काळजी घेतली नाही तर जमिनी क्षारपड होतात त्यामुळे शेतकऱ्यांनी सिंचनाचे पाणी तपासून शेतीसाठी नियोजन करावे. पाणी पृथ:करणानुसार शेतीसाठी सामू हा 6.5 ते 8.0 पर्यंत असावा तर विद्युत वाहकता म्हणजे पाण्याची क्षारता ही 0.75 डेसीसायमन प्रति मीटर पेक्षा कमी असावी. ठिबक सिंचनासाठी पाण्याची विद्युत वाहकता (क्षारता) ही ३.१२ डेसीसायमन प्रति मीटर (किंवा टीडीएस 2000 पीपीएम) पेक्षा जास्त असल्यास अयोग्य समजले जाते. त्यामुळे ठिबक सिंचनाच्या तोटयामध्ये क्षारांचे खडे होऊन ठिबक संचाची कार्यक्षमता कमी होते. शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याची प्रतवारी (तक्ता क्र. 1) मध्ये दिली आहे. पाणी क्षारयुक्त होण्याची कारणे: सिंचनासाठी पाण्याचा शेतीसाठी अमर्याद वापर, एकसारखी पिक प...

काळ्या गव्हाची शेती ठरतेय शेतकऱ्यांना फायदेशीर; या शेती लागवडीतून अधिक उत्पन्न

इमेज
काळ्या गव्हाची शेती ठरतेय शेतकऱ्यांना फायदेशीर; या शेती लागवडीतून अधिक उत्पन्न काळ्या गव्हाची शेती (Black wheat farming) पाहिली का? होय काळ्या गव्हाची शेतीही (Black wheat farming) फायदेशीर ठरत आहे. शेतकऱ्यांचा कल काळ्या गव्हाच्या शेतीकडे वळताना दिसत आहे. सामान्य गव्हापेक्षा काळ्या गव्हाचे उत्पन्नही (Yield of black wheat) चांगले होते. जास्त उत्पादनासाठी शेतकरी वेगवेगळे प्रयोग करत असतो. यामध्ये आता काळ्या गव्हाच्या शेतीसाठी (For the cultivation of black wheat) प्रयत्न चालू असताना दिसत आहे. या काळ्या गव्हाच्या शेतीविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.. काळ्या गव्हाचे फायदे – अटॅक,कॅन्सर, डायबिटीज, मानसिक ताणतणाव, गुडघ्यातील दुखणे, ॲनिमिया या सारख्या रोगांवर रामबाण उपयोगी आहे. हा गहू (Wheat) सामान्य गव्हापेक्षा चवीला थोडा वेगळा आहे. या गव्हाची लागवड – सामान्य गव्हा सारखीच या गव्हाची लागवड (Wheat cultivation) केली जाते. गव्हाची लागवड (Wheat cultivation) रब्बी हंगामात होते. याप्रमाणे या गव्हाच्या लागवडीसाठी नोव्हेंबर महिना चांगला ठरेल. या काळात शेतांमध्ये चांगल्या प्रकारे ओलावा असतो,...

ब्रिमॅटो या अनोख्या वनस्पतीचा शोध; यापासून मिळणार टोमॅटो आणि बटाट्याचे एका झाडावर उत्पादन

इमेज
ब्रिमॅटो या अनोख्या वनस्पतीचा शोध; यापासून मिळणार टोमॅटो आणि बटाट्याचे एका झाडावर उत्पादन  शेती क्षेत्रामध्ये आणि वनस्पती या संशोधनामध्ये दिवसेंदिवस वेगवेगळ्या संशोधन होऊननवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने कृषी क्षेत्राच्या उत्पादनात वाढ होत आहे. कृषी क्षेत्रामध्ये कृषी विद्यापीठे, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे सारख्या संस्थांनी विविध तंत्रज्ञान विकसित करण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे.भारतीय कृषी संशोधन परिषद अर्थात आयसीएआरने ब्रिमॅटोयानावाचे नवीन वनस्पतीचा शोध लावलाआहे. या बद्दल या लेखात माहिती घेऊ.   भाज्यांची उत्पादकता वाढवणे  भाजीपाल्याचे उत्पादन वाढवण्यासाठी कलम करणे हे तंत्रज्ञान पुढे आले आहे.यामध्ये एकाच वनस्पती मध्ये दोन भाज्यांची रोपे कलम केले जातात.यामधूनएकच वनस्पती पासून दोन फळे मिळतील.या तंत्रज्ञानामुळे कमी जागेत कमी वेळात भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाऊ शकत नाही.  याबाबतीत आयसीएआर ने केलेले संशोधन  या संशोधनामध्ये आयसीएआर आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हेजिटेबल रिसर्च या दोन संस्थांनी बटाटा टोमॅटो यांचे कलमी पद्धतीने...

आरोग्यदायी ड्रॅगन फळ व प्रक्रियायुक्त पदार्थ

इमेज
आरोग्यदायी ड्रॅगन फळ व प्रक्रियायुक्त पदार्थ ड्रॅगन फळ हे २१ व्या शतकातील आश्चर्यकारक फळ म्हणून ओळखले जाऊ लागले असून त्याने भारतीय फलोत्पादनामध्ये सद्यस्थितीत एक क्रांती घडवून आणली आहे. शेतकरी आणि ग्राहकांना एक वरदान ठरले आहे. ड्रॅगन फ्रूट या फळाचे मध्य अमेरिका, मलेशिया, व्हिएतनाम, श्रीलंका येथे व्यावसायिक उत्पादन केले जाते. अलीकडे भारतामध्येही या पिकाची लागवड सुरू झाली आहे. ड्रॅगन फ्रूट ही निवडुंग प्रकारातील वेल वनस्पती आहे. हायलोसेरेयस ही त्याची प्रजाती आहे. याच्या जातींमध्ये विविधता आढळते. वरून गुलाबी रंग व आतील गर पांढरा, वरून पिवळा व आतील गर पांढरा व वरून गुलाबी व आतून गर गुलाबी अशा तीन प्रकारांत हे फळ येते. या फळाला आशियाई देशात पिताहाया किंवा पिताया म्हणतात. वेल छत्रीसारखी दिसते. साधारणतः या वेलीची आयुष्य मर्यादा १७ ते २० वर्षे एवढी असते. वाढीसाठी व आधारासाठी स्तंभ (पोल) व गोल कड्यांचा वापर होतो. कोणत्याही जमिनीत हे पीक येत असले तरी पोषक जमीन, नियंत्रित व नियमितपणे खते दिल्यास त्याच्यापासून चांगले उत्पादन मिळते. या वेलाची फुले रात्री उमलतात. त्यांचे पराग सिंचन नि...