जनावरे खरेदी करताना घ्यावयाची काळजी
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
जनावरे खरेदी करताना घ्यावयाची काळजी
1) जनावराची त्वचा ही तजेलदार व मऊ असावी, अंगावर जास्त केस असता कामा नये.
2) जनावर हे शक्यतो करून पहिल्या वेताचे घ्यावे.
3) जनावर हे रुंद व भरदार छातीचे असावे.
4) जनावराचे वय हे 2 ते 4 वर्षाचे असावे.
5) जनावर हे जास्त लठ्ठ असू नये, तसेच त्याच्या शरीरावर व मानेच्या भागावर जास्त चरबी नसावी.
6) जनावराची कास ही मऊ, मोठी असावी, सड समांतर सारख्या आकाराची असावेत.
7) खात्रीलायक विक्रेत्याकडून जनावरांची खरेदी करावी.
8) जनावराची खरेदी करताना त्याची एकदा तरी धार काढून बघावी, त्यामुळे त्याचे सर्वसाधारणपणे दूध देण्याचे प्रमाण लक्षात येते.
9) जनावरांची खरेदी सरकारी नोंदणीकृत डेअरी फार्म मधून केल्यास त्याची संपूर्ण माहिती योग्य प्रकारे मिळते.
10) जनावरांची खरेदी करत असताना त्याच्या सवयी, दूध देण्याचे प्रमाण व वेताची संपूर्ण माहिती त्याच्या पूर्वीच्या मालकाकडून घ्यावी.
11) जनावराच्या खरेदीपूर्वी पशुवैद्य यांच्याकडून तपासणी करून घ्यावी व त्याचे प्रमाणपत्र घ्यावे.
12) गाभण जनावर विकत घ्यावयाचे झाल्यास त्याची तपासणी पशुवैद्य यांच्याकडून करून घ्यावी.
13) जनावर खरेदी करताना त्याचे डोळे पाणीदार आहे याची खात्री करावी, तसेच शिंगाची तपासणी करावी त्यामुळे शिंगाचा कर्करोग आहे किंवा नाही हे समजते.
14) जनावरांची वय हे त्याच्या पुढील दातावरून काढता येते.
15) जनावर खरेदी करत असताना, त्याला पूर्वी कोण- कोणत्या रोगप्रतिबंधक लसीचे लसीकरण केले आहे याची माहिती घ्यावी.
16) जनावर खरेदी करत असताना त्याची किंमत अनुभव व्यक्तीकडून किंवा पशुवैद्य यांच्याकडून करून घ्यावी.
17) जनावराची खरेदी एखाद्या डेअरी फार्म मधून करणार असेल तर त्या जनावराची संपूर्ण माहिती घ्यावी तसेच त्याचे आरोग्याची दाखले घ्यावेत.
18) म्हैस विकत घेताना त्याच्या अंगावरून हात हा पाण्याने ओला करून फिरवावा त्यामुळे म्हैशीच्या अंगावर किंवा शिंगावर कलप केला आहे किंवा नाही हे समजते,कारण म्हैस ही काळीभोर दिसण्यासाठी काळा रंग देतात.
19) जनावर खरेदी करताना शक्यतो करून व्यालेले खरेदी करावे, त्यामुळे त्याच्या दुधाचा अंदाज लवकर येतो.
20) जनावर खरेदी करताना अतिशय बारकाईने निरीक्षण करून खरेदी करावे. लेखन-
श्रीविनायक दिलीपराव यादव-पाटील-उंडाळकर
B.Sc.Agri.,
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा