रानडुकरामुळे हैराण असाल तर अशा पद्धतीने करा पिकांचे संरक्षण

रानडुकरामुळे हैराण असाल तर अशा पद्धतीने करा पिकांचे संरक्षण

वन्य प्राण्यांपासून बऱ्याचदा शेतात असलेल्या पिकांचे अतोनात नुकसान होत असते. कारण वन्य प्राण्यांचा उपद्रव हा दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा वन्य प्राण्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी अनेक प्रकारचे देशी तंत्रज्ञान पद्धतीचा वापर केला जात आहे. पारंपारिक पद्धतीने आपण वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण निश्चितच करू शकतो.

परंतु या पद्धतींचा अवलंब करताना शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी हेतितकेच महत्वाचे असते.रानडुकरांच्या बंदोबस्तासाठी असलेल्या काही परंपरागत पद्धती आणि त्या पद्धती वापरताना घ्यायची काळजी याविषयी या लेखात माहिती घेऊ.

रानडुकरांच्या बंदोबस्तासाठी असलेल्या काही पद्धती

मानवी केसांचा वापर- रानडुकरांचा ज्ञानेंद्रियांचा विचार केला तर त्यांची दृष्टी आणि श्रवण हे दोन्हीही कमकुवत असतात. या ज्ञानेंद्रियांच्या मदतीने ते अन्नाचा शोध घेत असतात. त्यासाठी स्थानिक केस कापण्याच्या दुकानातून मानवी केस गोळा करून आपण रानडुकरांचा प्रभावीपणे बंदोबस्त करू शकतो. यामध्ये पिकामध्ये हे मानवी केस विस्कटून सर्वदूर पसरवील्याने अन्नाच्या शोधात येणार्‍या रानडुकरांच्या श्वासनलिकेत केस अडकतातआणि ते सैरावैरा पळायला लागतात. ही पद्धत वेगळी वाटत असली तरी तेवढीच फायदेशीर आहे. शिवाययाला खर्चही कमी आहे.

रंगीत साड्यांचा वापर- या पद्धतीमध्ये रानडुकरांच्या वर्तणूक पार्श्वभूमीचा वापर केला जातो. यामध्ये विविध रंगाच्या साड्या पिकांच्या भोवती बांधल्या जातात. त्यामुळे लोकांना शेतात कोणीतरी मानव असल्याचा भास होतो व साहजिकच ते शेतात प्रवेश करण्यास घाबरतात. या पद्धतीचा वापर माणसांची ये-जा जास्त असलेल्या ठिकाणी जास्त प्रमाणात करण्यात येतो.या पद्धतीमुळे रानडुकरां पासून होणाऱ्या नुकसानीचे प्रमाण 40 ते 50 टक्‍क्‍यांपर्यंत कमी करता येते. भुईमूग, मका या पिकांभोवती हा प्रयोग करता येतो.

शेणाच्या गवऱ्यांचाधूर-स्थानिक डुकरांच्या विष्ठेपासून तयार केलेल्या गवऱ्यामातीच्या भांड्यात जाळून त्यापासून धूरकरून आपण रानडुकरांनापळू शकतो.
यापद्धतीने धुराचा वास येताच शेतात प्रवेश केलेल्या डुकरांना अगोदरच उपस्थित असलेल्या डुकरांचा अंदाज येतो त्यामुळे एकत्र न येता रानडुकरे पळ काढतात. या पद्धतीत आपल्या अगोदर शेतामध्ये कोणीतरी आहे हे भासवून देण्याची ही पद्धत आहे.

मोठ्या आवाजाचा वापर- फटाक्यांचा वापर, रिकामा ड्रम, पत्र्याचे भांडे, जोरात ओरडणे इत्यादी पद्धतींचा वापर करून देखील रानडुकरांचा विचलित केले जाते. तसेच बाजारामध्ये वेगवेगळ्या आवाजाचेयंत्र ही उपलब्ध आहेत.यंत्रे एकदा रात्री सुरू केले की पहाटेपर्यंत सुरू राहतात. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक कष्ट करावे लागत नाही. 
लेखक: पाटील रत्नाकर अशोक

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कढीपत्ता लागवडीबाबत माहिती

कृषी सुधारणा विधेयकं(MSP) : फायदे व तोटे

_NPK जिवाणू म्हणजे काय?_* *_NPK जीवाणूंचे काम काय ?