5 ग्रॅम माती घ्या अन् दोन मिनिटांमध्ये स्वत:च माती परीक्षण करा ! वाचा सविस्तर

5 ग्रॅम माती घ्या अन् दोन मिनिटांमध्ये स्वत:च माती परीक्षण करा ! वाचा सविस्तर

उत्पादकता वाढवण्यासाठी आणि शेतजमिनीचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी(Soil Test) माती परीक्षण ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. माती परीक्षण प्रयोगशाळेत चाचणीसाठी 1 किलोघेऊन जाणे आणि नंतर काही दिवसांतत्याचा अहवाल देणे अशी संपूर्ण प्रक्रिया होती. परंतु कानपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेने(IIT) माती परीक्षण जलद आणि अधिक अचूक करण्यासाठी पोर्टेबल किट विकसित केले आहे. मोबाईलच्या मदतीने पाच ग्रॅम मातीचा नमुना घेऊन अवघ्या90 सेकंदात मातीचे आरोग्यजाणून घेता येणारआहे.

वेळीची बचत अन् अचूक परीक्षण
काळानुसार सर्वसामान्य शेतकरीही माती परीक्षणावर भर देत आहेत. सुमारे 1 किलो मातीचा नमुना माती परीक्षणासाठीप्रयोगशाळेत न्यावा लागतो. अपेक्षित घटकांवर अवलंबून,निष्कर्ष येण्यास दोन ते सात दिवस लागू शकतात. यात शेतकऱ्यांची वाहतूक, वेळ आणि पैसा खर्च होतो. या समस्येमुळे बहुतांश शेतकरी माती परीक्षकरण्यापासून वंचित आहेत.शेतकऱ्यांची ही समस्या दूर करण्यासाठी आयआयटी कानपूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल इंजिनीअरिंगमधील जयंत कुमार सिंग, पल्लव प्रिन्स, असर अहमद, यास्वी खेमानी आणि मोहम्मद अमीर खान यांनी हे उपकरण विकसित केले आहे.

असे होते परीक्षण
मोबाईलवर झटपटपरीक्षणाचानिष्कर्ष मिळवण्यासाठी‘भू परीक्षक’ नावाचे मोबाईलॲप तयार केले. हे तंत्रज्ञान कंपनीने AgroNXT सर्व्हिसेसकडे हस्तांतरित केले आहे.केवळ पाच ग्रॅम माती नमुना 5 सेंमी लांबीच्या परीक्षानळीसारख्या दिसणाऱ्या उपकरणामध्ये टाकायचा. यानंतर हे उपकरण ब्लूटूथद्वारे मोबाईलशी कनेक्ट करायचे. ब्लूटूथ चालू असल्यास, ते आपोआप कनेक्ट होते. या प्रक्रियेस सुमारे 90 सेकंद लागतात. एकच आयडी क्रमांक असलेल्याभू-परीक्षक नावाच्या खास डिझाईन केलेल्या अॅपमध्येमातीच्या आरोग्याचा अहवाल मोबाईल स्क्रीनवर त्वरित उपलब्ध होतो.

या बाबींचा होतो निष्कर्ष
हे उपकरण जमिनीतील नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश आणि सेंद्रिय पदार्थांसह सहा घटकांचेप्रमाणसमजू शकते. जरपिकाचाउल्लेखकेलेला असेल तर त्या पिकासाठी शिफारस केलेले खत आणिपरीक्षणानुसारकरायचे बदलयानुसार आपल्या शेतासाठीच्या खत शिफारशी सुचविल्या जातात. त्यानुसार पिकांचे खत व्यवस्थापन पीक वाढीसाठी फायदेशीर ठरू शकते. हे अॅप अद्याप बाजारात आले नसले तरी ते यशस्वी झाले असून लवकरच सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कढीपत्ता लागवडीबाबत माहिती

कृषी सुधारणा विधेयकं(MSP) : फायदे व तोटे

_NPK जिवाणू म्हणजे काय?_* *_NPK जीवाणूंचे काम काय ?