वाफसा म्हणजे काय ?
वाफसा म्हणजे काय ?
जमिनीच्या पृष्ठभागाखालि मुळयाच्या परिसरात , दोन माती कणाच्या मध्ये ज्या पोकळया असतात त्या पोकळयामध्ये पाण्याचे अस्तित्व नको तर पोकळयामध्ये 50 % पाण्याची वाफ व 50 % हवा यांचे मिश्रण हवे . या स्थितिला ” वाफसा ” म्हणतात .
उदा :- 1) गादी वाफ्यात कांदे किंवा लसुण लावतो . वाफ्याच्या काटाचे कांदे मोठे होतात कारण तेथे वाफसा असतो .
2) उंच सखल भाग – त्यात तूर पेरली – सखल भागातील तूर खुरटी व उंच भागातील तूर जोमदार दिसेल कारण वाफसा .
जेव्हा आपण सिंचनाचे पाणी देतो आणि पुढे 15 दिवस पाणी ( पाळी ) येणार नाही म्हणुन जास्ती पाणी पाजतो तेव्हा दोन मातीच्या कणामध्ये ज्या पोकळया असतात त्या सर्व पाण्याने भरून जातात व तेथील हवा निघुन जाते. वाफा पाण्याने गच्च भरतो तेव्हा बुड- बुड असा जो आवाज येतो तो त्या निघुन जाणाऱ्या हवेचा असतो . परीणामी मुळया व जीवानुना ऑक्सिजन मिळत नाही आणि जीवाणु मरतात व मुळया कुजतात .
मुळाकडुन अन्नाचि होणारी उचल ( Mineral Uptake ) थांबते त्यामुळे पाने पिवळी पडू लागतात , वाढ खुंटते अर्थातच उत्पादनात घट .
म्हणून पाणी एवढे दिले पाहिजे की , मातीच्या दोन कनामधिल पोकळयात पाणी साठणार नाही , तर त्या पाण्याची वाफ जमिनीतील उष्णतेने होईल ( जास्त पाणी दिले तर जमीन थंड पड़ते व वाफ बनत नाही ) व त्या पोकळयामध्ये 50 % पाण्याची वाफ व 50 % हवा यांचे मिश्रण होईल एवढेच पाणी द्यावे.
समजा जमिनीत अंगभुत उष्णता आहे जेणेकरुन त्या उष्णतेने प्रति मिनट 2 ली पाण्याची वाफ होते तेव्हा 2 ली पाणी दिले तर वाफसा होईल . पण जर आपण 2 ली ऐवजी 4 ली पाणी दिले तर 2 ली पाण्याची वाफ बनेल व 2 ली पाणी तसेच राहील व वाफसा राहणार नाही . म्हणून जमिनीला एवढेच पाणी दिले पाहिजे जेणेकरून मुळीजवळ वाफसा राहील व अतिरिक्त पाणी गांडूळनि पाडलेल्या छिद्रातुन भूजल साठ्याकडे निघुन जाईल व वाफसा कायम राहील.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा