चला खरीप, रब्बी आणि उन्हाळी पिके व हंगामाबद्दल जाणून घेऊया*

*चला खरीप, रब्बी आणि उन्हाळी पिके व हंगामाबद्दल जाणून घेऊया*



जसं की आपणांस ठाऊक आहे की,आपला भारत हा कृषिप्रधान देश आहे व भारताची जवळपास 70% जनसंख्या ही शेती व शेतीनिगडित कामाशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या संबंधित आहे.शेती हा जीवन जगण्यासाठीचा प्राथमिक  व्यवसाय आहे.शेती ही एक अशी प्राथमिक गतिविधी आहे

ज्यात मनुष्यासाठी आवश्यक असणाऱ्या अन्नाची गरज भागवली जाते.शेती म्हणजे, अन्न, गवत, कापडाचे तंतू, प्राणी, मध तसेच वनस्पती यांचे व्यवस्थापित उत्पादन. पिकांची लागवड प्रामुख्याने हवामान आणि मातीच्या परिस्थितीवर अवलंबून असते. पिकांची लागवड ही तीन हंगामात विभागली गेली आहे ते तीन हंगाम म्हणजे खरीप, रब्बी आणि उन्हाळी. आज आपण या लेखात या तीन हंगामाविषयीं व त्या हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांविषयी जाणुन घेणार आहोत.

*पिकांचे प्रकार*

*खरीप (पावसाळी)हंगाम:*
पावसाच्या पाण्यावर घेण्यात येणारी पिके. महाराष्ट्रात सर्वात जास्त खरिपाचे क्षेत्र अकोला जिल्ह्यात तर सर्वात कमी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. भारतीय उपखंडामध्ये खरीप पिके ही जून-जुलैमध्ये पेरणी केली जातात आणि ऑक्टोबरच्या आसपास काढले जातात.

खरीप पिके,पावसाळी पिके किंवा शरद ऋतूतील पिके पावसाळ्यात पिकविली जातात.पावसाळ्याच्या सुरूवातीला शेतकरी बियाणे पेरतात आणि हंगामाच्या शेवटी त्यांची कापणी करतात,म्हणजे सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान. खरीप पिकांना योग्य वाढीसाठी भरपूर पाणी आणि उबदार हवामान आवश्यक आहे.

 


 
*खरीप पिकेः*

भात, तांदूळ, तूर,बाजरी, मका, कापूस, भुईमूग, रताळे, उडीद, मूग,चवळी, ज्वारी, तीळ, ग्वार, जूट,हरभरा, ऊस, सोयाबीन, भेंडी इ.

*रब्बी (हिवाळी)हंगाम :*

रब्बी म्हणजे अरबी भाषेत वसंत होय. हिवाळ्याच्या हंगामात [ऑक्टोबर ते डिसेंबर] आणि वसंत ऋतू [एप्रिल-मे] मध्ये पिकविले जाणाऱ्या पिकास रब्बी पिके असे म्हणतात.  या पिकांना उगवण आणि बियाण्याच्या परिपक्वतासाठी उबदार हवामान आणि त्यांच्या वाढीसाठी थंड वातावरण आवश्यक आहे.  हिवाळ्यातील पावसाने रब्बी पीक खराब होतात परंतु खरीप पिकासाठी चांगला आहे.

 *रब्बी पिके:* गहू, बार्ली, हरभरा, मोहरी, वाटाणे, बिरसीम, रिझका, मसूर, बटाटे, राई, तंबाखू, ओट्स, बडीशेप इ.

*उन्हाळी हंगाम :*

खरीप व रब्बी हंगामाच्या मध्ये उन्हाळी हंगामाची पिके घेतली जातात, म्हणजे मार्च ते जून दरम्यान.तीव्र वाढीसाठी त्यांना गरम, कोरडे हवामान आवश्यक असते.आणि फुलांसाठी दिवस मोठे असतात त्यामुळे ते फायदेशीर ठरते.उन्हाळी पीक हे शेतकर्‍यांसाठी महत्त्वाचे आहे कारण यामुळे शेतकऱ्यांना चांगला नफा मिळतो आणि खरीप व रब्बी या दोन मुख्य पिकांमधील अंतर-भराव म्हणून देखील ह्या हंगामास ओळखले जाते.

*उन्हाळी पिके*: भोपळा, खरबूज, टरबूज, लौकी, मूग, काकडी, मिरची, टोमॅटो, सूर्यफूल, ऊस, भुईमूग, डाळी, कडू, काकडी इ

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कढीपत्ता लागवडीबाबत माहिती

कृषी सुधारणा विधेयकं(MSP) : फायदे व तोटे

_NPK जिवाणू म्हणजे काय?_* *_NPK जीवाणूंचे काम काय ?