विद्राव्य खते म्हणजे नेमके काय ?(water soluble fertilizer)
विद्राव्य खते म्हणजे नेमके काय ?(वाटर soluble fertilizer)
पिकांना योग्य वाढीसाठी आवश्यक प्रमाणात अन्नद्रव्ये लागतात. ही अन्नद्रव्ये विद्राव्य खतांमार्फत जलद आणि सोप्या पद्धतीने देता येतात. आज आपण पाहुयात की विद्राव्य खते म्हणजे काय ?
विद्राव्य खते –
पिकांना आवश्यक अन्नद्रव्ये पुरविणारी आणि पाण्यात संपूर्ण विरघळणारी खते म्हणजे विद्राव्य खते होय.
यांचा वापर कसा करावा ?
- फवारणी द्वारे
- ठिबक सिंचन पद्धतीने
यांच्या वापराचे फायदे काय ?
- पिकांना जलद गतीने अन्नद्रव्ये मिळतात.
- अतिपाऊस किंवा पावसाचा मोठा खंड यामध्ये विद्राव्य खतांचा वापर फायद्याचा ठरतो.
- पिके पानांद्वारे अन्नद्रव्ये शोषून घेतात.
- खताची नासाडी होत नाही.
विशेष बाब –
- पिक फुल किंवा फलधारणा अवस्थेत असल्यावर याचा वापर फायदेशीर असतो.
काही महत्त्वाची विद्राव्य खते –
- १९:१९:१९
- ०:५२:३४
- १२:६१:०
- ०:०:५०
- १३:०:४५
- ०:०:५०:१८
- १३:४०:१३
- २४:२८:०
१९:१९:१९
- पिकाच्या सुरुवातीच्या काळात वापरावे.
- पिकाच्या सर्वांगीण वाढीसाठी हे वापरतात.
- एन पी के हे घटक सम प्रमाणात असतात.
- १२:६१:०
- याच्या वापराने पिकाची मुळे वाढ होण्यास मदत होते.
- फुलधारणा, पिकावर फुलांची संख्या वाढविण्यासाठी याचा वापर करावा.
- ०:०:५०
- शेवटच्या अवस्थेत याचा वापर करावा.
- यामुळे फळांची गुणवत्ता सुधारते तसेच पिकातील दाणा चांगला पोसतो.
- १३:०:४५
- याला पोटॅशियम नायत्रेट सुद्धा म्हणतात.
- याच्या वापराने पिकांना दुष्काळ स्थितिशी लढण्यास बळ मिळते.
- ०:५२:३४
- सर्वाधिक लोकप्रिय खतफुलांचे फळात रूपांतर होण्यास मदत होते.
- फुल किंवा फलधारणा अवस्थेत वापरावे.
- अश्या अनेक प्रकारची विद्राव्य खते बाजारात उपलब्ध आहेत.
ही खते वापरताना कोणती काळजी घ्यावी ?
खते चांगली विरघळण्यासाठी पाणी स्वच्छ असणे गरजेचे आहे.
१ किलो खते व्यवस्थित विरघळण्यासाठी सरासरी १५ ते २० लिटर पाणी लागते.
ठिबक सिंचनाद्वारे खते दिल्यानंतर जास्तीत जास्त १० मिनिटे झाडांना पाणी द्यावे.
दोन खते एकमेकात मिसळताना ती खते मिसळण्याची शिफारस कृषी विभागाने केली आहे का याची योग्य माहिती घ्यावी.
खते देताना पिकाची अवस्था, वापसा, वातावरण याचा नीट अभ्यास करणे गरजेचे आहे.
ठिबक सिंचनाचा वापर करत असताना फिल्टर, लॅटरल पाइप यांचा दाब योग्य आहे का याची तपासणी करा.
सर्व ड्रीपर्स समान पातळीवर असणे गरजेचे आहे यामुळे सर्व पिकाला योग्य प्रमाणात खते मिळतात.
ठिबक सिंचन संचात कोठेही लिकेज असता कामा नये.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा