आला उन्हाळा पिकांचे आरोग्य सांभाळा…! उन्हाळी सोयाबीनवर कीड, तर हरभरा काढणीच्या अवस्थेत, वाचा तज्ञांचा सल्ला |

आला उन्हाळा पिकांचे आरोग्य सांभाळा…! उन्हाळी सोयाबीनवर कीड, तर हरभरा काढणीच्या अवस्थेत, वाचा तज्ञांचा सल्ला | पीक व्यवस्थापन हरभरा : वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या हरभरा पिकाची काढणी करून घ्यावी. उशीरा पेरणी केलेल्या हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत व 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम किंवा क्लोरॅंट्रानिलीप्रोल 18.5% 3 मिली किंवा फलुबेंडामाईड 20% 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गहू : लवकर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या गहू पिकाची काढणी करून घ्यावी. उशीरा पेरणी केलेल्या गव्हाच्या पिकात उंदरांचा प्रादुर्भाव दिसून असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी झिंक फॉस्फाईड 1 भाग + गुळ 1 भाग + 50 भाग गव्हाचा भरडा व थोडसे गोडतेल मिसळून हे मिश्रण उंदराच्या बिळात टाकुन बिळे बंद करावीत. उन्हाळी सोयाबीन : उन्हाळी सोयाबीन पिकात अंतरमशागतीची कामे करावीत व पिका...