उन्हाळी मूग लागवडीचे तंत्र
*_🌱 उन्हाळी मूग लागवडीचे तंत्र 🌱_*
*_🍇🐓🍅🐄🌾🥦🍉🐛🌶🦗🌹_*
*_ᘞᘝᘞᘝᘞᘝᘞᘝᘞᘝᘞᘝᘞᘝᘞᘝᘞᘝᘞᘝᘞᘝ_*
_कडधान्य पिकातील अल्पावधीत तयार होणारे खरीप व उन्हाळी हंगामातील मूग हे अतिमहत्वाचे पीक असून, महाराष्ट्रात त्याचे सुमारे ३.५ लक्ष हेक्टर क्षेत्र आहे, विविध पीक पद्धतीत मूग पिकाचा समावेश केला जातो. परिणामी, कमी पाण्यात उत्पादन, जमिनीचा पोत टिकून राहणे, नत्राची पूर्तता करणे अशा बाबी साध्य होतात, या पिकानंतर घेण्यात येणाऱ्या पिकासाठी उत्तम बेवड तयार होतो, पीक तयार झाल्यानंतर शेंगा तोडून घेऊन ते जमिनीत गाडल्यास हिरवळीच्या पिकांप्रमाणे परिणाम मिळू शकतात._
_*🌱जमीन :* मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन योग्य ठरते, चोपण, पाणथळ, क्षारयुक्त जमिनीत हे पीक चांगले येत नाही. तसेच आम्लयुक्त जमिनीत मुळांवरील रायझोबिअम जिवाणूंच्या गाठींची वाढ होत नाही. त्यामुळे रोपे पिवळी पडून उत्पादनात घट येते. साधारणतः ६.५ ते ७.५ सामू असलेली जमीन या पिकाला योग्य असते._
_*🌱हवामान :* २१ ते २५ अंश सेल्सिअस तापमान चांगले. मात्र ३० ते ३५ अंश सेल्सिअस तापमानातही हे पीक चांगले येते, खरीप हंगामाच्या तुलनेत उन्हाळी हंगामात स्वच्छ सूर्यप्रकाश, उष्ण हवामान यामुळे मुगावर रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी आढळतो. परिणामी अधिक उत्पादन मिळते._
_*🌱पूर्वमशागत :* पूर्वीच्या पिकाचे जमिनीवरील अवशेष, पालापाचोळा वेचून घेऊन जमीन स्वच्छ करावी. खोल नांगरटीनंतर कुळवाच्या २ पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. पाणी देण्यासाठी योग्य अंतरावर सारा अथवा सरी वरंबा पद्धतीचा अवलंब करून रान बांधणी करावी. जमिनीच्या उताराला काटकोनात सारे अथवा सऱ्या पाडाव्यात, दोन ओळींतील अंतर २२.५ ते ३० सें.मी. ठेवावे._
_*🌱पेरणीची वेळ :* उन्हाळी मुगाची पेरणी २० फेब्रुवारी ते १५ मार्च या दरम्यान करावी. पेरणीस फार उशीर करू नये, अन्यथा पीक मॉन्सूनच्या पावसात सापडण्याची शक्यता असते._
_*🌱बियाण्याचे प्रमाण :* अपेक्षित उत्पादन मिळण्यासाठी हेक्टरी रोपांची संख्या योग्य ठेवणे गरजेचे. त्यासाठी प्रति हेक्टरी योग्य प्रमाणात बियाणे पेरावे._
_*🌱पिकाचा कालावधी (दिवस) :* ६० ते ६५_
_*🌱लागवडीची पद्धत :* सरी वरंबा_
_*🌱हेक्टरी बियाणे (किलो) :* १५ ते २०_
_*🌱लागवड अंतर (सें.मी.) :* २२.५x१० किंवा ३०x१०_
_*🌱शिफारशीत जाती :* विराट, पुसा ९३५१, पुसा विशाल, एस एल एम ६६८, एचयूएम-१६, पंत मूग-५, सम्राट (पी डी एम १३९), मेहा (आय पी एम ९९-१२५), जी ए एम-५, दुर्गा (आर एम जी २६८), फुले चेतक_
_*फुले चेतक* ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केली असून गेल्या वर्षी खरीप हंगामासाठी महाराष्ट्र राज्याकरिता शिफारस केली आहे. मात्र विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर उन्हाळी हंगामात घेतलेल्या पेरणी चाचण्यांमध्ये चांगले उत्पादन मिळाले आहे._
_*🌱बीजप्रक्रिया :* बियाण्याची उगवण चांगली होण्यासाठी, रोपावस्थेत बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया प्रति किलो बियाण्यास थायरम २ ग्रॅम अधिक कार्बेन्डाझीम २ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम यानंतर नत्र स्थिर करणारे रायझोबिअम जापोनिकम व स्फुरद विरघळविणारे पीएसबी प्रत्येकी २५ ग्रॅम. १२५ ग्रॅम गूळ प्रति लिटर कोमट पाणी या द्रावणात मिसळून चोळावे. बियाणे एक तासभर सावलीत सुकवून लगेच पेरणी करावी._
_*🌱खते :* चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट १० ते १५ गाड्या प्रति हेक्टरी पेरणीआधी शेवटच्या कुळवणीच्या वेळी पसरावे, पेरणी करताना मूग पिकास २० किलो नत्र, ४० किलो स्फुरद प्रति हेक्टरी द्यावे._
_*🌱आंतरमशागत :* पीक सुरुवातीपासूनच तणविरहित ठेवावे. पीक २० ते २५ दिवसांचे असताना पहिली, ३० ते ३५ दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी, गरजेनुसार १ ते २ खुरपण्या वेळीच द्याव्यात, तणनाशकाचा वापर करावयाचा असल्यास पेरणीपूर्वी जमिनीवर पेंडीमिथॅलीन ३ मिलि प्रति लिटर पाणी (हेक्टरी ५०० लिटर पाण्यात दीड लिटर तणनाशक) फवारावे._
_*🌱पाणी व्यवस्थापन :* उन्हाळी मुगाकरिता वेळेवर सिंचन करणे गरजेचे असते जमिनीच्या मगदुराप्रमाणे ओलिताच्या साधारणपणे ५-६ पाळ्या लागतात. पेरणीच्या पाण्यानंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे साधारणतः ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाण्याची पाळी द्यावी. पिकाला फुले येताना आणी शेंगा भरताना ओलाव्याची कमतरता भासू देऊ नये. पीक ५०-५५ दिवसांचे झाल्यानंतर पाणी तोडावे, त्यामुळे पीक एकाच वेळी पक्वतेस येऊन उत्पादनात वाढ होईल._
_*🌱पीक संरक्षण :* खरीपाच्या तुलनेत उन्हाळी मुगावर रोग, किडींचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आढळतो मात्र उन्हाळ्यातील कोरड्या व अधिकच्या तापमानात मुगावर प्रामुख्याने पिवळा विषाणू रोगाचा प्रादुर्भाव होतो. या विषाणूचा प्रसार पांढऱ्या माशीद्वारे होतो. या रोगामुळे झाडाची वाढ खुंटते. प्रादुर्भावग्रस्त झाडाच्या कोवळ्या पानांवर पिवळसर लहान ठिपके दिसतात. थोड्याच दिवसांत पानांच्या बऱ्याचशा भागावर अनियमित आकाराचे पिवळे चट्टे दिसू लागतात काही दिवसांनी पाने संपूर्ण पिवळी पडून कर्ब ग्रहण क्रिया मंदावते. शेंगा कमी लागतात. रोगाचा प्रादुर्भाव शेंगांवरही दिसून येतो. रोग नियंत्रणासाठी प्रथम रोगबाधित झाडांचा मुळासकट उपटून नायनाट करावा. त्यानंतर विषाणूचा प्रसार करणाऱ्या_
_*🌱पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी :* डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) १ मिलि किंवा इमिडाक्लोप्रीड (१७.८ टक्के प्रवाही) ०.२ मिलि._
_*मावा किडीच्या नियंत्रणासाठी :* डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) १ मिलि._
_*शेंगा पोखरणारी अळी, केसाळ अळी, पाने खाणारी अळी इ. किडींच्या नियंत्रणासाठी :* क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) १.६ मिलि किंवा स्पिनोसॅड (४५ टक्के प्रवाही) ०.३ मिलि, आवश्यकता भासल्यास ८ ते १० दिवसांनी दुसरी फवारणी करावी._
_*टीप : लेबलक्लेम आहेत*_
_*१)* कीडनाशकांच्या शिफारशी लेबल क्लेमप्राप्त किंवा जॉएंट ॲग्रेस्कोप्राप्त आहेत._
_*२)* फवारणीचे प्रमाण हाय व्हॉल्यूम फवारणी पंपासाठीचे आहे._
_*३)* खरेदीवेळी पक्के बिल घ्यावे._
_*४)* बॅन किंवा 'रेस्ट्रिक्टेड' आहे का पाहावे._
_*५)* लेबल क्लेम वाचावेत._
_*६)* पुरेशा ज्ञानाशिवाय रसायने एकमेकांत मिसळू नयेत._
_*७)* रसायनांचा गट तपासावा._
_*८)* पीएचआय, एमआरएल तपासावेत._
_*९)* पेरणी वा लागवडीपूर्वी संबंधित बियाणांवर कोणती बीजप्रक्रिया केलेली आहे, हे तपासूनच पुढील बीजप्रक्रिया करावी._
_*१०)* मधमाशी, मित्रकीटकांना हानिकारक कीडनाशकांचा वापर टाळावा._
_*११)* पीक फुलोरा अवस्था लक्षात घेऊन कीडनाशकांचा समंजस वापर करावा._
*_▣▬▬▬▬▬●ஜ۩۵•۞•۵۩ஜ●▬▬▬▬▬▣_*
*🌹✳️🏵️🌸❄️🌺🌻🌺❄️🌸🏵️✳️🌹*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा